शहरं
Join us  
Trending Stories
1
आता उद्धव ठाकरेंनी सांगितले, मविआ राज्यात किती जागा जिंकणार; दोन आकड्यांतून संकेत...
2
हे बळी नव्हे तर खून...! घाटकोपर दुर्घटनेवरून देवेंद्र फडणवीसांचा उद्धव ठाकरेंवर घणाघात
3
आज बरसणार शब्दबाण! महायुती दाखवेल शिवाजी पार्कवर दम; बीकेसीत ‘इंडिया’ करणार शक्तिप्रदर्शन
4
Diabetes पासून हार्ट डिजीज पर्यंतचे उपचार करणं होणार स्वस्त; सरकारनं ४१ औषधांच्या किंमती केल्या कमी
5
आजचे राशीभविष्य १७ मे २०२४; आजचा दिवस अनुकूल, आनंदाचे वातावरण राहिल
6
अखेर भावेश भिंडे जेरबंद, उदयपूरच्या रिसॉर्टमधून घेतले ताब्यात; ६० तासांनंतर बचावकार्य थांबले
7
"बच्चन घराण्याचे संस्कार", हात फ्रॅक्चर असलेल्या आईला सांभाळताना दिसली आराध्या, ऐश्वर्याच्या लेकीचं होतंय कौतुक
8
भावेश भिंडेची १०० कोटींची कमाई? निविदा १० वर्षांसाठी मंजूर, पण दिली ३० वर्षांची परवानगी
9
रेल्वेने मुंबई महापालिकेचे थकविले ५७२ कोटी; २२ वर्षे पाणीपट्टी, मालमत्ता कर भरलाच नाही
10
काँग्रेस आणि आपमध्ये दुरावा वाढला? राहुल गांधीच्या सभेचे केजरीवालांना निमंत्रण नाही
11
ज्यांना ‘नकली भाजप’ मान्य नाही त्यांनी आम्हाला मत द्यावे, हिंमत असेल तर...: उद्धव ठाकरे
12
बजेट धर्मावर आधारित कधीच नसते, जातींचा विचार करुन देश चालत नाही: शरद पवार
13
शरद पवार गटाच्या नेत्यांना जमावबंदीच्या नोटिसा; १५ ते १९ मे कुठेही फिरु नका, पोलिसांचा आदेश
14
...तर ईडी आरोपीला अटक करू शकत नाही; सुप्रीम कोर्टाचा निकाल, जामिनासाठी अर्ज अनावश्यक 
15
आज पंतप्रधान मोदींची शिवाजी पार्कवर सभा; वाहतूक वळविली, पाहा, महत्त्वाचे बदल
16
कोकण रेल्वेच्या मार्गातील अडथळे होणार दूर, तिन्ही मागण्या पूर्ण करु: रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव
17
काँग्रेसच्या धोरणांनी गरिबी वाढली; नितीन गडकरी यांची टीका
18
शक्तिप्रदर्शनाला महिला बचतगट लाभार्थींची ताकद; खासदारांबरोबरच आमदारांचीही कसोटी
19
निवडून आल्यावर काय करणार? नागरी प्रश्नांना वर्षा गायकवाड यांच्या ‘न्यायपत्रा’ने हमी
20
ढिगाऱ्याखाली कोणी उरले नाही, काम थांबले; महापालिका आयुक्तांची माहिती

‘गणिताचे अडले घोडे, कसे म्हणावे पाढे’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 28, 2019 11:16 AM

गणिताचे अडले घोडे कसे म्हणावे पाढे, बालभारतीची बाल बुद्धी, संख्यावाचन पद्धती पूर्ववत झालीच पाहिजे... अशा घोषणा देत गुरुवारी दुसरीच्या नव्या संख्यावाचन पद्धतीबद्दल कोल्हापूर जनशक्तीच्या वतीने शिक्षण उपसंचालक कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आली. या पद्धतीमुळे मराठी भाषेचेही अध:पतन, तसेच व्यवहारात मोठा गोंधळ निर्माण होणार आहे, तरी संख्यावाचनातील पद्धत पूर्वीप्रमाणेच कायम ठेवावी, अशी मागणी करण्यात आली.

ठळक मुद्दे‘गणिताचे अडले घोडे, कसे म्हणावे पाढे’संख्यावाचन पद्धतीविरोधात कोल्हापूर जनशक्तीची निदर्शने

कोल्हापूर : गणिताचे अडले घोडे कसे म्हणावे पाढे, बालभारतीची बाल बुद्धी, संख्यावाचन पद्धती पूर्ववत झालीच पाहिजे... अशा घोषणा देत गुरुवारी दुसरीच्या नव्या संख्यावाचन पद्धतीबद्दल कोल्हापूर जनशक्तीच्या वतीने शिक्षण उपसंचालक कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आली. या पद्धतीमुळे मराठी भाषेचेही अध:पतन, तसेच व्यवहारात मोठा गोंधळ निर्माण होणार आहे, तरी संख्यावाचनातील पद्धत पूर्वीप्रमाणेच कायम ठेवावी, अशी मागणी करण्यात आली.यावेळी शिष्टमंडळाने दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, आपण संस्कृतसारखी भाषा देशाच्या अभ्यासक्रमात आणण्याचा निर्णय घेतो आणि दुसरीकडे मराठीतील जोडाक्षरे वाचायला लागू नयेत म्हणून संख्यावाचन पद्धतच बदलतो, हा प्रचंड विरोधाभास आहे. कन्नड, तमिळ, तेलगू, मल्ल्याळम या धर्तीवर बदल करत असताना त्या भाषांत अनेक संख्यांना उचित शब्दच नसल्याने त्यांची वाचनपद्धती अपूर्णावस्थेत आहे. याउलट मराठीत प्रत्येक संख्येला यथोचित शब्द वापरले आहेत.मात्र बालभारतीने केलेल्या नव्या बदलांमुळे मुलांच्या शिक्षणात सावळा गोंधळच माजण्याची शक्यता जास्त आहे. सदरचा निर्णय घेताना विचारवंत, साहित्यिक व शिक्षण तज्ज्ञांना विश्वासात घेणे गरजेचे होते. तसेच या बदलाबाबतची पूर्वतयारी व शिक्षकांनाही योग्य प्रशिक्षण देणे गरजेचे असताना, अशी कोणतीही कृती झालेली नाही.

एकीकडे मराठी शाळांकडे विद्यार्थी, पालकांचा ओढा वाढविण्यासाठी शासकीय, सामाजिक व संस्थात्मक पातळीवर प्रयत्न सुरू असताना, अशा पद्धतीचे बदल संभ्रमावस्था वाढविणारे आहेत, तरी संख्यावाचनाची पद्धत पूर्ववत करण्यात यावी. शिष्टमंडळात समीर नदाफ, अरुण अथणे, विश्वास नाईक, तय्यब मोमीन, दिलीप पाटील, बाबासाहेब मुल्ला, राजेश माने, लहुजी शिंदे, बाबा वाघापूरकर, रियाज कवठेकर यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.

 

 

टॅग्स :Education Sectorशिक्षण क्षेत्रkolhapurकोल्हापूर