शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! RBI कडून पेटीएमचा बँकिंग परवाना कायमचा रद्द; युजर्सवर काय परिणाम होणार...
2
इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांना कर्करोग! खुद्द स्वतःच केला धक्कादायक खुलासा; आता कशी आहे तब्येत?
3
आप फुटली, भाजपाची ताकद वाढली! राज्यसभेत आता कोणत्या पक्षाचे किती खासदार?
4
'आप'ला भगदाड, खासदारांचा मोठा गट फुटला! अरविंद केजरीवाल म्हणाले, "भाजपाने पुन्हा..."
5
नेपाळमध्ये भारतीय भाविकांच्या बसला अपघात; २१ जण जखमी, ६ वर्षांच्या चिमुरडीसह एका महिलेचा मृत्यू
6
तरुणीला 'हाय' केले अन् वाद पेटला; लग्नातील वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात, एकाचा मृत्यू ८ जण जखमी, विकासकाविरुद्ध गुन्हा 
7
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
8
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांना हटवण्याची मागणी; ७३ खासदारांचे सभापतींना पत्र
9
९०% मार्क्स, आयआरएससोबत वडिलांची ओळख अन् लक्झरी लाईफचं वेड; हुशार राहुल मीणा गुन्हेगार कसा झाला?
10
Raghav Chadha: राघव चड्ढा, हरभजनसिंग भाजपात! आम आदमी पार्टीत उभी फूट, राज्यसभेच्या १० पैकी ७ खासदारांचा पक्षाला 'राम-राम'
11
Raghav Chadha : राघव चड्ढांनी २१ दिवसांपूर्वीच दिले होते 'आप'मधील फुटीचे संकेत; भाकीत ठरलं खरं
12
“रिक्षा-टॅक्सी, ओला-उबेर, रॅपिडो चालकांनी मराठीत संवाद साधलाच पाहिजे”: मंत्री प्रताप सरनाईक
13
एकदम फिट दिसणाऱ्यांना का येतोय हार्ट अटॅक? डॉक्टरांनी सांगितलं 'ते' खरं कारण
14
'नरक' म्हणणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांना चीनचे भारताचा झेंडा पोस्ट करत उत्तर; 'शब्द विरून जातात, पण...'
15
LPG Subsidy : तुमच्या सिलिंडरचं अनुदान खात्यात जमा होतंय का? घरबसल्या स्टेटस तपासण्याची सोपी पद्धत
16
दमदार इंजिनसह BMW ने भारतात लॉन्च केली सर्वात स्वस्त बाईक, जाणून घ्या किंमत अन् फीचर्स...
17
इन्स्टाग्राम युजर्सना मोठा धक्का! रंगीत फोटो झाले काळे-पांढरे; मिनिटांत करा दुरुस्त, फॉलो करा या सोप्या स्टेप्स
18
"मी त्याच्याशीच लग्न करणार...", बिग बॉस विजेती तन्वी कोलतेने केला खुलासा; प्रेमाबद्दल म्हणाली...
19
राजकारणात येण्यापूर्वी काय करायचे राघव चड्ढा; आपने ग्लॅमरस मोहरा गमावला... 
20
सावधान! फळ आणि भाज्या खाल्ल्याने वाढतोय कॅन्सरचा धोका? नव्या रिसर्चने सर्वच हादरले
Daily Top 2Weekly Top 5

ऐनी येथे घर,गोठ्यास आग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 30, 2021 04:21 IST

ऐनी, ता. राधानगरी येथील आठ शेतकऱ्यांच्या काही घरांना व गोठ्यास आग लागून दहा लाखांचे आर्थिक नुकसान झाले. ग्रामस्थांच्या ...

ऐनी, ता. राधानगरी येथील आठ शेतकऱ्यांच्या काही घरांना व गोठ्यास आग लागून दहा लाखांचे आर्थिक नुकसान झाले. ग्रामस्थांच्या प्रसंगसावधानाने यामध्ये दोन म्हशींना आगीची झळ बसून किरकोळ जखमी झाल्या आहेत. यामध्ये कोणतीही जीवितहानी झाली नाही. गोठ्यातील सर्वच जनावारांचे दोर कापून जवळपास १५ म्हशींचा जीव वाचला.

घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी : शनिवारी पहाटे तीन वाजता अचानक प्रथम एका घरवजा गोठ्याला आग लागली. या घरामध्ये गवत पिंजर, लाकडे,शेणी भरलेल्या असल्यामुळे आगीने रौद्र रूप धारण केले आणि बघताबघता आग इतर सात शेतकऱ्यांचा घराकडे ती पसरली. आगीचे लोट असताना देखील ग्रामस्थांनी धैर्य दाखवत जनावरांचे दोर कापले. आसपासचे सर्वच ग्रामस्थ जागे झाले आणि पुढे होणारा अनर्थ टळला.

यामध्ये शंकर भिवा बावकर, संदीप जोती पाटील, मारुती जोती पाटील, भिकाजी सखाराम पाटील, रंगराव सखाराम पाटील, बाबुराव सखाराम पाटील, सुखदेव हरी पाटील व संगीता पांडुरंग पाटील या शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. आग ग्रामस्थांनी व बिद्री साखर कारखान्याचा दोन बंबांनी चार तासांच्या अथक परिश्रमाने आटोक्यात आणली. नेमके आगीचे कारण समजले नसून या आगीत प्रापंचिक साहित्य व शेतीसाहित्याचे मोठे नुकसान झाले आहे.

घटनास्थळी आमदार प्रकाश आबिटकर,ए. वाय. पाटील, विजयसिंह मोरे,सरपंच शोभा आडसूळ,बळवंत पाटील, मारुती तोडकर यांनी भेटी दिल्या तर मंडल अधिकारी शिवाजी कोळी,तलाठी प्रकाश गुरव,ग्रामसेवक दीपक पाटील,पोलीस पाटील विश्वास पाटील,कोतवाल दत्तात्रय देऊलकर यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला.

२९ एेनी आग

फोटो ओळ-

ऐनी ता.राधानगरी येथे घरवजा गोठ्यास लागलेल्या आगीत नुकसान झालेले घर