होळकर नगरात दांपत्यास लोखंडी रॉडने मारहाण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 6, 2021 13:25 IST2021-04-06T13:24:17+5:302021-04-06T13:25:45+5:30
Crime News Kolhapur-किरकोळ करणांवरुन चिडून दांपत्यास लाथाबुक्यांनी व लोखंडी रॉडने बेदम मारहाण करुन घरावर हल्ला करुन नुकसान केल्याचा प्रकार फुलेवाडी रिंगरोडवर ब्रोंद्रेनगर नजीक अहिल्याबाई होळकर नगरात घडला. राजेंद्र हरिश्चंद्र राख (वय ५०) त्याची पत्नी बबीता राख (४६ दोघेही रा. अहिल्याबाई होळकर नगर) अशी जखमींची नावे आहेत. या प्रकरणी जुना राजवाडा पोलिसांनी सहा जणांवर गुन्हा नोंदवला असून आशितोष विकास चाबूक (वय २८ रा. बाळूमामा तालीम मंडळनजीक, फुलेवाडी रिंगरोड, कोल्हापूर) याला अटक केली.

होळकर नगरात दांपत्यास लोखंडी रॉडने मारहाण
कोल्हापूर : किरकोळ करणांवरुन चिडून दांपत्यास लाथाबुक्यांनी व लोखंडी रॉडने बेदम मारहाण करुन घरावर हल्ला करुन नुकसान केल्याचा प्रकार फुलेवाडी रिंगरोडवर ब्रोंद्रेनगर नजीक अहिल्याबाई होळकर नगरात घडला. राजेंद्र हरिश्चंद्र राख (वय ५०) त्याची पत्नी बबीता राख (४६ दोघेही रा. अहिल्याबाई होळकर नगर) अशी जखमींची नावे आहेत. या प्रकरणी जुना राजवाडा पोलिसांनी सहा जणांवर गुन्हा नोंदवला असून आशितोष विकास चाबूक (वय २८ रा. बाळूमामा तालीम मंडळनजीक, फुलेवाडी रिंगरोड, कोल्हापूर) याला अटक केली.
पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, फुलेवाडी रिंगरोडवर अहिल्याबाई होळकर नगरात राजेंद्र राख व विशाल जगताप हे शेजारी राहतात. राजेंद्र हे घरात असताना समोरील घरातील विशाल यांच्या घरातील होमथिएटरचा आवाज कमी करा असे राजेंद्र याने सांगितले. या रागातून विशाल याच्यासह एकूण सहाजणानी राजेंद्र व त्याच्या पत्नीला शिवीगाळ करुन लोखंडी रॉडने, लाथाबुक्यांनी मारहाण केली.
याबाबत आशितोष चाबूक याला सोमवारी रात्री उशीरा जुना राजवाडा पोलिसांनी अटक केली. तर इतर पाचजणांचा पोलीस शोध घेत आहेत. त्यानंतर हल्लेखोरांनी घराच्या काचा फोडून साहित्याची तसेच दारातील दुचाकीचीही मोडतोड केली. जखमी दांपत्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरुं आहेत. याबाबत जुना राजवाडा पोलिसात तक्रार नोंद झाली आहे.