गडहिंग्लजमध्ये नव्या शैक्षणिक धोरणाची होळी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 7, 2020 13:12 IST2020-09-07T13:08:21+5:302020-09-07T13:12:50+5:30

केंद्राचे नवे शैक्षणिक धोरण राजर्षी शाहू महाराजांचे शैक्षणिक धोरण आणि भारतीय संविधानातील मूल्यांच्या विरोधी असल्याचा आरोप करून त्याची येथील प्रांतकार्यालयासमोर होळी करण्यात आली.

Holi of new educational policy in Gadhinglaj | गडहिंग्लजमध्ये नव्या शैक्षणिक धोरणाची होळी

गडहिंग्लज प्रांतकचेरीसमोर शिक्षण वाचवा नागरी कृती समितीतर्फे निदर्शने करण्यात आली. यावेळी नगराध्यक्षा स्वाती कोरी, बाळेश नाईक,उज्वला दळवी शिवाजी होडगे, साताप्पा कांबळे, गंगाराम शिंदे,रफिक पटेल आदी उपस्थित होते.

ठळक मुद्देगडहिंग्लजमध्ये नव्या शैक्षणिक धोरणाची होळीप्रांतकचेरीसमोर निदर्शने : विविध सामाजिक संघटनांचा सहभाग

गडहिंग्लज : केंद्राचे नवे शैक्षणिक धोरण राजर्षी शाहू महाराजांचे शैक्षणिक धोरण आणि भारतीय संविधानातील मूल्यांच्या विरोधी असल्याचा आरोप करून त्याची येथील प्रांतकार्यालयासमोर होळी करण्यात आली.


शिक्षक दिनानिमित्त कोल्हापूर जिल्हा शिक्षण वाचवा नागरी कृती समिती आणि गडहिंग्लज तालुक्यातील पुरोगामी संघटना व समाजवादी प्रबोधिनीतर्फे प्रांत कचेरीसमोर निदर्शने करण्यात आली.यावेळी केंद्र सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.


यावेळी अ‍ॅड.दशरथ दळवी, शिवाजी होडगे, अनिल उंदरे, उज्वला दळवी, काशिनाथ तनंगे, अविनाश कुलकर्णी,रफिक पटेल, उर्मिला कदम,गंगाराम शिंदे, ज्ञानराजा चिघळीकर,पुंडलिक रक्ताडे, शिवाजी गुरव, सतीश तेली, विनायक नाईक,भावेश शिंदे, कृष्णा पाटील यांची भाषणे झाली.

आंदोलनात नगराध्यक्षा प्रा.स्वाती कोरी, प्रकाश कांबळे, गणपतराव पाटोळे, साताप्पा कांबळे, रमजान अत्तार, संपत सावंत, तानाजी कुरळे, राजेंद्र खोराटे, नंदकुमार वाईंगडे , सुनिता नाईक आदी सहभागी झाले होते.

या संघटनांचा सहभाग


राष्ट्रसेवा दल, अंनिस,समाजवादी प्रबोधिनी, जिजाऊ ब्रिगेड,सखी व अंबिका महिला मंडळ,सलोखा परिषद,पालक संघटना, सुटा, फास्टा,शाळा कृती समिती, कास्ट्राईब, विद्यार्थी वाचवा संघटना, पोलीस पाटील संघटना, क्रीडा शिक्षक संघटना, प्राथमिक शिक्षक संघ व समिती, वकील संघटना, दलित महासंघ,कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक संघटना, माध्यमिक शिक्षक व मुख्याध्यापक संघटना इत्यादी संघटना उपस्थित होते.

 

Web Title: Holi of new educational policy in Gadhinglaj

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.