आंब्यातील सह्यगिरी महिला बचत गटाला हिरकणी पुरस्कार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 23, 2021 04:24 IST2021-01-23T04:24:22+5:302021-01-23T04:24:22+5:30
तालुका व्यवस्थापक रणदीप भिलवडेकर यांनी प्रास्तविक केले. तालुका स्तरावर १० बचत गटांना हिरकणी पुरस्काराने गौरवले. जिल्हास्तरावर आंबा येथील सह्यगिरी ...

आंब्यातील सह्यगिरी महिला बचत गटाला हिरकणी पुरस्कार
तालुका व्यवस्थापक रणदीप भिलवडेकर यांनी प्रास्तविक केले. तालुका स्तरावर १० बचत गटांना हिरकणी पुरस्काराने गौरवले. जिल्हास्तरावर आंबा येथील सह्यगिरी महिला गटाच्या रानफळावरील प्रक्रिया उद्योगाला हिरकणी पुरस्कार मिळाला. उद्योजिका सायली लाड व उपाध्यक्षा शुभांगी वायकूळ यांनी पुरस्कार स्वीकारला. तालुका स्तरावर ५० हजार, तर जिल्हा स्तरावर दोन लाख रुपये अशी प्रोत्साहनपर बक्षीस रक्कम मिळाली. यावेळी माजी सभापती सुनीता पारळे, स्नेहा जाधव, शिवसेनेचे तालुकाप्रमुख दत्तात्रय पवार, विजय खोत, अमर खोत, दिलीप पाटील, गटविकास अधिकारी अनिल वाघमारे, आदी प्रमुख उपस्थित होते.
पुरस्कारप्राप्त बचत गट असे : श्री ज्योतिबा महिला बचत गट- बर्की, विघ्नहर्ता गट- येळवण जुगाई, सतीमाता गट- पणुंद्रे, रणरागिणी गट- बांबवडे, स्वामी समर्थ गट - येळाणे, भिमाई गट - डोणोली, जिजामाता गट - मांजरे व शिरादेवी गट - मांजरे, श्रद्धा गट - सरूड या बचत गटांना प्रत्येकी ५० हजार रुपयांचे बक्षीस मिळाले. या बक्षिसातून महिलांनी उद्योग वृद्धी, विक्री व्यवस्थापन करता येणार आहे. दिगंबर सावंत यांनी आभार मानले.
फोटो ओळी शाहूवाडी : हिरकणी पुरस्कारप्राप्त सह्यगिरी महिला बचत गटाच्या अध्यक्षा सायली लाड, शुभांगी वायकूळ यांचा गौरव करताना सभापती हंबीरराव पाटील. डावीकडून अनिल वाघमारे, दत्ता पवार, विजय खोत उपस्थित होते.