शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
3
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
4
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
5
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
6
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
7
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
8
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
9
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
10
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
11
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
12
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
13
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
14
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
15
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
16
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
17
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
18
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
19
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
20
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
Daily Top 2Weekly Top 5

महामार्ग सहापदरीकरणाची लगीनघाई

By admin | Updated: June 29, 2015 00:26 IST

प्रशासन हतबल : भूसंपादनाअगोदरच प्राधिकरणाने काम घेतले हाती

दत्ता यादव - सातारा  -विकासप्रक्रिया कधीही थांबू शकत नाही, हे तत्व असलेल्या राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने सहापदरीकरणाचे काम हाती घेतले; परंतु रस्त्याचे काम सुरू झाले असले तरी अद्याप काही जमिनी संपादन होऊन शासनाच्या ताब्यात मिळालेल्या नसल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. त्यामुळे हे सहापदरीकरणाचे काम मे २०१६ पर्यंत लांबण्याची शक्यता नाकारता येत नाही. नागरिकांकडून होणाऱ्या तक्रारी आणि सुनावणीमध्ये प्रशासनाचा वेळ जात असल्याने सहापदरीकरणाचे काम कासवगतीने सुरू आहे.पूर्वीचा हायवेचा जो प्लॅन होता, त्यावेळी फारसे उड्डाणपूल नव्हते. सहापदरीकरण सुरू झाल्यानंतर शासनाच्या लक्षात आलं की, जिथं-जिथं गावाचा नाका, अ‍ॅप्रोच आहे, त्या ठिकाणी आता पूल बांधणे गरजेचे आहे. वास्तविक दुपदरी किंवा चारपदरीचे काम सुरू करताना त्याचवेळी पूल उभारणे गरजेचे होते. मात्र महामार्ग प्राधिकरणाने यामध्ये रस दाखविला नाही. सध्या सहापदरीकरणाचे काम हाती घेतले असले तरी अनेक ठिकाणच्या जमिनीचे अद्याप संपादन झालेले नाही. त्यामुळे प्रशासन अक्षरश: मेटाकुटीला आले आहे. लोकांचा विरोध होत असल्यामुळे शासनाची भूमिका महत्त्वाची असते. या ठिकाणी पूल होणे गरजेचे आहे. या ठिकाणी अपघात होतात. त्याची कारणे लोकांना सांगितली जातात. हायवेचे मेजर ट्राफिक उड्डाणपुलावरून जाते. बाकीची रहदारी पुलाच्या खालून असते. दुचाकी, पादचाऱ्यांना उड्डाणपुलाच्या खालचा रस्ता महत्त्वाचा दुवा असतो. लोकांना हे सर्व समजावून सांगितलं आणि त्यांनी ऐकलं नाही तर शेवटी कायद्याचा वापर करून त्या ठिकाणी विकास करण्याची भूमिका प्रशासनाने घेतली आहे. परंतु नागरिकांच्या कलेने आणि कायदा व सुवस्था अबाधित राखून प्रशासनाला भूसंपादन करावे लागणार आहे. उड्डाणपूल बांधताना प्रशासनापुढे अनेक अडचणी येत आहेत. भूसंपादनाला शेतकऱ्यांचा विरोधभूसंपादनाची प्रक्रिया कायदेशीर केल्याशिवाय हायवेचे काम सुरूच करता येत नाही. भूसंपादनामध्येच प्रशासनाचा जास्त वेळ जात आहे. सुरुवातीला शेतकऱ्यांना तीन नोटिसा देण्यात आल्या आहेत. परंतु अद्याप काही शेतकऱ्यांनी महामार्ग प्राधिकरणाला जमिनी ताब्यात दिल्या नाहीत. पूर्वी भूसंपादन झाले होते, त्यावेळी आमची जमीन गेली आहे, आत्ता पण आमचीच जमीन घेताय. आता आम्ही जगणार कसं? असा सवाल लोकांकडून केला जात आहे. यामध्ये शासनाचा आणि ज्यांच्या जमिनी आहेत, त्यांचाही दोष नाही. शेतकऱ्यांची जमीन आतल्या बाजूला असती तर आम्ही तुमच्याकडे कशाला आलो असतो, असे प्रशासनाचे म्हणणे आहे, तर विकास करायचा आहे त्यामुळे भूसंपादन करावेच लागणार, अशी सक्तीची भूमिका प्रशासनाला अखेर घ्यावी लागणार आहे.