शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
4
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
5
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
6
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
7
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
8
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
9
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
10
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
11
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
12
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
13
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
14
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
15
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
16
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
17
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
18
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
19
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
20
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
Daily Top 2Weekly Top 5

'शक्तिपीठ' दलालांचा महामार्ग, श्रमिक संघटनेचा आरोप; कोल्हापुरात १८ जूनला भव्य मोर्चा

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 11, 2024 15:25 IST

कोल्हापूर : देवाच्या नावाने दलाल, भांडवलदार आणि कंत्राटदारांचा फायदा करण्यासाठी विनाशकारी शक्तिपीठ महामार्ग विरोधात ‘श्रमिक’ संघटना उतरली असून हा ...

कोल्हापूर : देवाच्या नावाने दलाल, भांडवलदार आणि कंत्राटदारांचा फायदा करण्यासाठी विनाशकारी शक्तिपीठ महामार्ग विरोधात ‘श्रमिक’ संघटना उतरली असून हा महामार्ग देवाचा नव्हे, दलालांचा महामार्ग असल्याचा आरोप श्रमिक संघटनेने केला आहे. या महामार्गाविरोधात मंगळवार, १८ जूनला जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात येणार असल्याचे महासंघाचे अध्यक्ष अतुल दिघे यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत सांगितले.महाराष्ट्र राज्य सर्व श्रमिक महासंघाच्या महाराष्ट्र राज्य श्रमिक शेतकरी संघटनेने पुकारलेल्या या आंदोलनातकोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यातील शेतकरी सहभागी होणार आहेत. १८ जूनला सकाळी ११ वाजता दसरा चौकातून या मोर्चाला प्रारंभ होणार आहे. जिल्हाधिकारी अमोल येडगे यांना प्रत्यक्ष भेटून या महामार्गामुळे शेतकऱ्यांचे होणारे नुकसान पटवून देण्यात येणार आहे. यावेळी दोन्ही श्रमिक संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते.हा प्रवेश नियंत्रित मार्ग असल्यामुळे स्थानिक जनतेला याचा काहीही उपयोग होणार नाही. स्थानिक वाहने, रिक्षा, ट्रॅक्टर, मोटारसायकल, बैलगाडी या मार्गावर नेणे किंवा थांबवणे धोकादायक असल्यामुळे त्याचा स्थानिकांना उपयोग नाही. स्थानिकांना कोणताही रोजगार उपलब्ध होणार नाही. अशा रस्त्यावर वेग वाढवण्यासाठी तो एका पातळीवर करण्यासाठी खुदाई आणि भराव केला जातो. या रस्त्यामुळे गावाच्या शिवाराचे, रानाचे, माळाचे दोन भाग होतील.ज्याच्या शिवाराचे दोन भाग होतील त्याला एका बाजूने दुसऱ्या बाजूला जायचे तर मोठा फेरा काढावा लागतो किंवा आपली जमीन कोणाला तरी कमी भावाने विकून टाकावी लागते. या रस्त्याला समपातळीत आणण्यासाठी जे भराव केले जातील त्यामुळे ओढा, ओघळातील पाणी रानात शिरेल व आजूबाजूच्या शेतकऱ्यांची पिके धोक्यात येतील असा आरोप दिघे यांनी केला. हा विकासाचा नसून विनाशाचा रस्ता आहे, म्हणून याला श्रमिक विरोध करत आहे. या पत्रकार परिषदेला प्रकाश कांबरे, गोपाळ पाटील, अनंत कुलकर्णी, सुनील बारवाडे, प्रकाश जाधव, प्रकाश पाटील उपस्थित होते.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरhighwayमहामार्गagitationआंदोलन