मोरेवाडीत सरसावले मदतीचे हात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 2, 2021 04:23 IST2021-04-02T04:23:51+5:302021-04-02T04:23:51+5:30
पाचगाव : मोरेवाडी (ता. करवीर )येथील एकाच ठिकाणी असलेल्या १४ गवताच्या गंजींना २३ मार्च रोजी लागलेल्या आगीत ...

मोरेवाडीत सरसावले मदतीचे हात
पाचगाव : मोरेवाडी (ता. करवीर )येथील एकाच ठिकाणी असलेल्या १४ गवताच्या गंजींना २३ मार्च रोजी लागलेल्या आगीत शेतकऱ्यांचे गवत जळून मोठे नुकसान झाले होते. त्यामुळे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीसाठी अनेकजण धावले असून या शेतकऱ्यांना चारा उपलब्ध करुन देण्यात आला आहे. पाचगावचे लोकनियुक्त सरपंच संग्राम पाटील, शिवसेना करवीर तालुका प्रमुख विराज पाटील,मोरेवडीचे माजी सरपंच दत्तात्रय भिलुगडे, भिकाजी गाडगीळ अशा अनेकांनी एक हात मदतीचा या उक्तीप्रमाणे सढळ हाताने मदत केली. यावेळी सरपंच संग्राम पाटील म्हणाले, जगाचा पोशिंदा म्हणून शेतकऱ्याची ओळख आहे,हाच शेतकरी आपल्या जनावरांवर अवलंबून आहे. त्यांनी उन्हातान्हात काबाडकष्ट करून जमवलेल्या चारा एका क्षणात नाहीसा झाला. त्यामुळे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना आम्ही मदत देऊन त्यांच्या पाठीशी राहिलो.
फोटो: ०१ पाचगाव चारामदत
ओळ : मोरेवाडी येथील शेतकऱ्यांना चारा वाटप करताना पाचगावचे सरपंच संग्राम पाटील,उपसरपंच भाग्यश्री दळवी,नारायण गाडगीळ,संजय पाटील,अमर मोरे तसेच शेतकरी व सर्व ग्रामपंचायत सदस्य.