कल्याणमधील वृत्तपत्र विक्रेत्या आजीबाईंना मानव सहाय्य सेवा मंडळाकडून मदतीचा हात
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 15, 2021 18:36 IST2021-01-15T18:35:45+5:302021-01-15T18:36:14+5:30
गेल्या ७० वर्षापासून कल्याणमध्ये श्रीमती उषा पांडूरंग केतकर या ९६ वर्षाच्या आजीबाई वृत्तपत्र विक्रीचा व्यवसाय करतात. त्यांचे या वयातील कष्ट पाहून मानव सहाय्यक सेवा मंडळाच्या वतीने त्यांना जीवन गौरव सन्मान प्रदान करण्यात आला.

कल्याणमधील वृत्तपत्र विक्रेत्या आजीबाईंना मानव सहाय्य सेवा मंडळाकडून मदतीचा हात
कल्याण - गेल्या ७० वर्षापासून कल्याणमध्ये श्रीमती उषा पांडूरंग केतकर या ९६ वर्षाच्या आजीबाई वृत्तपत्र विक्रीचा व्यवसाय करतात. त्यांचे या वयातील कष्ट पाहून मानव सहाय्यक सेवा मंडळाच्या वतीने त्यांना जीवन गौरव सन्मान प्रदान करण्यात आला. यावेळी त्यांना मान्यवरांच्या हस्ते २१ हजार रुपयांचा धनादेश देण्यात आला. काल मकरसंक्रातीच्या दिवशी झालेला सन्मान आणि मिळालेली मदत हे आजीबाईंच्या चेह:यावर हास्य फुलविणारे ठरले.
केतकर आजी या महिला सक्षमीकरण आणि स्वावलंबनाच्या उत्तम उदाहरण आहेत. २१ हजाराचा धनादेश शिवसेना आमदार विश्वनाथ भोईर यांच्या हस्ते टिळक चौकात केतकर यांना सन्मापूर्वक प्रदान करण्यात आला. या प्रसंगी माजी महापौर वैजयंती घोलप, सभागृह नेते प्रकाश पेणकर, समाजसेवक प्रकाश मुथा, पत्रकार तुषार राजे, ठाणो पत्रकार विक्रेता संघाचे प्रमुख दत्ता तेली, दिनेश सोमाणी आदी मान्यवर उपस्थित होते. मानव सहाय्यक सेवा मंडळाचे अध्यक्ष शंकर आव्हा, सचिव अम्मार काझी, गिरीश लटके, कोषाध्यक्ष संजय वाजपाई, प्रा. महेंद्र भावसार, राजू गवळी, दामू काबरा, रमेश करमरकर, प्रशांत म्हात्रे आदीनी या साठी परिश्रम घेतले.