शेतकऱ्यांना हेक्टरी २ लाखापर्यंत मदत करा, शेतकऱ्यांची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 27, 2021 20:28 IST2021-07-27T20:24:13+5:302021-07-27T20:28:00+5:30
Framer Kolhapur : शेतकऱ्यांना हेक्टरी दोन लाखापर्यत मदत देवून वसुल पात्र रक्कमेचे कमीत कमी व्याजासह समान सात हफ्त्यामध्ये पुर्नगठण करावे, अशी मागणी होत आहे.

शेतकऱ्यांना हेक्टरी २ लाखापर्यंत मदत करा, शेतकऱ्यांची मागणी
गगनबावडा-कोल्हापूर : शेतकऱ्यांना हेक्टरी दोन लाखापर्यत मदत देवून वसुल पात्र रक्कमेचे कमीत कमी व्याजासह समान सात हफ्त्यामध्ये पुर्नगठण करावे, अशी मागणी होत आहे.
महापूरामुळे गगनबावडा तालुक्यासह जिल्ह्यातील शेतकऱ्यांची लाखो हेक्टर शेती पाण्याखाली गेलेली असून उसाच्या सुरळीत पाणी गेल्यामुळे ऊस कुजण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. त्यामुळे शेतीचे मोठ्या प्रमाणात तालुक्यात नुकसान झालेले आहे. सलग तीन वर्ष नैसर्गिक आपत्तीबरोबर महामारीमुळे गगनबावडा तालुक्यासह कोल्हापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे कंबरडेच मोडले आहे.
शेतकऱ्यांनी विकास सेवा. संस्था, राष्ट्रीयकृत बँका, खाजगी बँका , यामधून घेतलेली पिककर्ज, वाहन, घर तारण, खावटी, पाईपलाईन, किसान सहाय्य, मोटर पंप खरेदी, ठिबंक सिंचन. या कारणासाठी घेतलेली कर्ज परतफेड करणे या महापुराने शक्य नसलेने गगनबावडा तालुक्यासह कोल्हापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना हेक्टरी २ लाखापर्यंत मदत देवून शिल्लक वसूल पात्र कर्ज रक्कमेचे कमीत कमी व्याजासह समान ७ हप्तेमध्ये पुर्न घटन करून जिल्हयातील शेतकऱ्यांचा हा मुलभूत प्रश्न शासनाने सोडवावा अशी मागणी गगनबावडा तालुक्यासह जिल्ह्यातील शेतकरी वर्गातून होत आहे.
गगनबावडा तालुक्यातील शेतकरी गेली तिन वर्ष सलग आलेल्या आपत्तीमुळे पूर्णतः खचला आहे. कर्जबाजारी झाला आहे.कर्ज फेडण्यासाठी जमिनी विकणे हाच आमच्याकडे पर्याय आहे .शासनाने आम्हाला हेक्टरी २ लाखांची मदत करून राहिलेल्या कर्जाचे समान हप्ते करून द्यावे.
दिनकर पाटील, शेतकरी असळज.
जिल्हयातील शेतकरी हा पूरपरिस्थितीमुळे व महामारीमुळे संकटात सापडला असून त्यांचे जगणे मुश्कीलीचे झाले आहे. तरी त्यांना सरकारने सरसकट भरीव मदत करावी.
-विलास पाटील ( कोदेकर),
अध्यक्ष ,कोल्हापूर जिल्हा कृषी पूरक बहूउद्देशीय संस्था.