शहरं
Join us  
Trending Stories
1
१५ मिनिटाच्या अंतरासाठी ५-६ तास कोंडीत; प्रवाशांचे अताेनात हाल, विदारक स्थितीत मुंबईकर अडकले
2
ठाकरेंच्या खेळीनं विधानपरिषद निवडणुकीत ट्विस्ट; काँग्रेस देणार उमेदवार, दोन्ही NCP साधणार डाव?
3
बंगालची ‘ममता’ कमळावर, तामिळनाडूवर द्रमुकचीच सत्ता; एक्झिट पोलचा अंदाज, ४ मे रोजी मतमोजणी
4
"हे खूप भयंकर आहे.... कृपया मदत करा"; अभिनेत्री सोनाली कुलकर्णीही पाच तास कोंडीत
5
IPL 2026 : MI चा संघर्ष संपता संपेना! तरीही स्वबळावर Playoffs ची आशा जिवंत; जाणून घ्या समीकरण
6
२ वर्षांचं प्रेम, लग्नाला प्रेयसीच्या आईचा विरोध; संतापलेल्या प्रियकरानं दोघांना संपवलं, मग...
7
‘apk’ फाइलचे देशभरातील सर्व्हर मुंबई पोलिसांनी केले ‘शटडाउन’; १० वी नापास आरोपी निघाले मास्टरमाइंड
8
मुंबईतील दहशतवादी हल्लाप्रकरणी अन्सारीला हायकोर्टाचा दिलासा नाही; पोलिस क्लिअरन्सची मागणी फेटाळली
9
"अवघ्या दहा फुटांवर होता मृत्यू आणि मी जिवंत परत आलो...; विकासाच्या नावाखाली जातोय बळी" 
10
ठेकेदाराच्या निष्काळजीपणाने चव्हाण कुटुंबाचा 'आधार' गेला; क्रेन पडून पोलिसाचा मृत्यू
11
Ryan Rickelton Record : MI कडून जे रोहित-सचिनलाही जमलं नाही, ते रिकल्टननं करून दाखवलं!
12
दोन राज्यांत सत्तांतर! तिसऱ्या तामिळनाडूच्या एक्झिट पोलमध्ये काय? अभिनेता विजयची धमाकेदार एन्ट्री होण्याचे संकेत
13
कोण आहे Allah Ghazanfar? अभिषेक शर्माचं वादळ रोखत ईशान किशनला गोल्डन डकवर धाडलं तंबूत!
14
MI vs SRH : वानखेडेवर Ryan Rickelton ची विक्रमी सेंच्युरी! तिलक वर्मासह जयसूर्याचा विक्रम मोडला
15
'No more Mr. Nice Guy', बंदुकीसह फोटो पोस्ट करत डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला पुन्हा धमकी
16
आसाममध्ये भाजपा हॅटट्रिक करणार, काँग्रेस वनवास अद्यापही कायम; Exit Pollचे कल काय सांगतात?
17
“छत्रपती शिवाजी महाराजांची बदनामी मान्य आहे का? एकनाथ शिंदे गप्प का?”: हर्षवर्धन सपकाळ
18
Exit Poll: पश्चिम बंगालमध्ये ममता दीदींसोबतच खेला होणार; भाजपा... पाहा एक्झिट पोलचा सर्वात मोठा कल!
19
AI VS Humans : एआय की माणूस, कोण स्वस्त? दिग्गज टेक कंपनी NVIDIA सगळंच सांगितलं!
20
‘ही’ आहे पाकिस्तानची हायस्पीड ट्रेन, किती वेगाने जाते? वंदे भारत ट्रेनला देते का टक्कर? पाहा
Daily Top 2Weekly Top 5

हेल्मेट वापराचे बंधपत्र सक्तीचे

By admin | Updated: January 23, 2015 00:40 IST

माझ्या स्वत:च्या तसेच माझ्यामागे बसलेल्या व्यक्तीच्या सुरक्षिततेसाठी मी सदर तरतुदीचे पालन करीन,

कोल्हापूर : दुचाकी वाहन चालविताना हेल्मेट परिधान करण्याविषयी अप्पर परिवहन आयुक्त सतीश सहस्त्रबुद्धे यांनी नवीन लायसेन्स व गाडीची नोंदणी करताना हेल्मेट वापराविषयीचे बंधपत्र सक्तीचे केले आहे. या निर्णयाची अंमलबजावणी आज, गुरुवारपासून राज्यातील सर्व प्रादेशिक परिवहन कार्यालयांत सुरू झाली. हेल्मेट वापरण्याविषयी जागृती कमी पडत असल्याने राज्यात दिवसें-दिवस दुचाकीस्वारांचे अपघातात मृत्यू होण्याचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे वाढत्या अपघातांना आळा घालण्यासाठी सुरक्षित ड्रायव्हिंग व दुचाकी नवीन घेताना हेल्मेटही देण्याचे प्रस्ताव डिलरांकडून दिले जात आहेत. मात्र, हेल्मेट न वापरण्याचा एक ट्रेंड कोल्हापुरात आहे. आम्ही काय पुणे, नागपूर, मुंबई अशा मोठ्या शहरांत राहतो काय? असा सवाल उलटा विचारला जात आहे. कोल्हापूर तर छोटे शहर आहे. त्यामुळे हेल्मेट वापरत नाही, असे अनेकांचे उत्तर असते.बंधपत्र असे१९८८ च्या कलम १२९ अन्वये दुचाकी चालवताना वाहनचालकाने तसेच त्याचा मागे बसलेल्या व्यक्तीने वाहन चालविले जात असताना स्वत:च्या सुरक्षिततेसाठी हेल्मेट वापरणे बंधनकारक आहे. या बंधपत्रात माझ्या स्वत:च्या तसेच माझ्यामागे बसलेल्या व्यक्तीच्या सुरक्षिततेसाठी मी सदर तरतुदीचे पालन करीन, असे या बंधपत्रात लिहून घेतले जाते. नवीन दुचाकी खरेदीदारांना व लायसेन्स काढणाऱ्यांना हेल्मेट कायम वापरणार म्हणून कार्यालयातर्फे बंधपत्र घेतले जात आहे. विमा कंपन्यांनी दुचाकीचा विमा देताना हेल्मेट घातले होते का याची शहानिशा करून क्लेम द्यावा. त्यामुळे तरी हेल्मेट घातले जाईल. - राजेंद्र वर्माउपप्रादेशिक परिवहन अधिकारी, वाढत्या वाहनसंख्येमुळे वारंवार अपघात होत आहेत. याशिवाय महामार्गावर जाताना हेल्मेट घालणे सक्तीचे आहे. याशिवाय हेल्मेटमुळे धुरळ्यापासून बचाव होतो तसेच अपघात झाल्यास डोके शाबूत राहते. त्यामुळे मी कायम हेल्मेट वापरतोच.- एम. एम. पाटील, बुजवडे