कोल्हापूर जिल्ह्यात जोरदार पाऊस, दिवसभर उघडझाप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 5, 2021 19:08 IST2021-01-05T19:02:58+5:302021-01-05T19:08:05+5:30
Rain Kolhapur-कोल्हापूर जिल्ह्यात मंगळवारी जोरदार पाऊस झाला. दिवसभर उघडझाप राहिली असली तरी ढगाळ हवामान कायम राहिले. अवकाळी पावसाने भाजीपाल्याचे मोठे नुकसान झाले असून गुऱ्हाळघरे, साखर कारखान्यांची ऊस तोडणीची कामे ठप्प झाली आहेत.

कोल्हापूर जिल्ह्यात जोरदार पाऊस, दिवसभर उघडझाप
कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यात मंगळवारी जोरदार पाऊस झाला. दिवसभर उघडझाप राहिली असली तरी ढगाळ हवामान कायम राहिले. अवकाळी पावसाने भाजीपाल्याचे मोठे नुकसान झाले असून गुऱ्हाळघरे, साखर कारखान्यांची ऊस तोडणीची कामे ठप्प झाली आहेत.
अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने गेली दोन दिवस महाराष्ट्रात हवामानात बदल झाला आहे. सोमवारी दिवसभर ढगाळ हवामानासह काही ठिकाणी जोरदार पाऊस कोसळला. मंगळवारी सकाळ पासूनच ढगाळ वातावरणासह पाऊस सुरू झाला.
तासभर पाऊस झाल्यानंतर काहीसी उसंत घेतली. दहानंतर सुर्यनारायणाने दर्शन दिले पण त्यानंतर पुन्हा ढगाळ वातावरणासह आकाश गच्च झाले. अवकाळी पावसाने भाजीपाल्यासह रब्बी पिकांचे नुकसान झाले आहे.