कोल्हापूर जिल्ह्यात पावसाची उघडझाप, अद्याप ३५ बंधारे पाण्याखाली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 11, 2020 18:12 IST2020-08-11T18:11:32+5:302020-08-11T18:12:07+5:30
कोल्हापूर जिल्ह्यात मंगळवारी पावसाची उघडझाप राहिली. दिवसभरात अधूनमधून सरी कोसळत राहिल्या. सोमवार (दि. १०)च्या तुलनेत पाऊस कमी असल्याने नद्यांची पातळी घसरू लागली आहे. राधानगरी धरणाचे दोन स्वयंचलित दरवाजे अद्याप खुले असून त्यातून प्रतिसेकंद ४२५६ घनफूट पाण्याचा विसर्ग सुरू आहे.

कोल्हापूर जिल्ह्यात पावसाची उघडझाप, अद्याप ३५ बंधारे पाण्याखाली
कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यात मंगळवारी पावसाची उघडझाप राहिली. दिवसभरात अधूनमधून सरी कोसळत राहिल्या. सोमवार (दि. १०)च्या तुलनेत पाऊस कमी असल्याने नद्यांची पातळी घसरू लागली आहे. राधानगरी धरणाचे दोन स्वयंचलित दरवाजे अद्याप खुले असून त्यातून प्रतिसेकंद ४२५६ घनफूट पाण्याचा विसर्ग सुरू आहे.
जिल्ह्यात मंगळवारी सकाळपासून पावसाची भुरभुर राहिली असली तरी त्यात जोर नव्हता. गगनबावडा, शाहूवाडी, पन्हाळा, राधानगरी तालुक्यांत मात्र चांगला पाऊस झाला. धरणक्षेत्रातही पाऊस राहिल्याने राधानगरी धरणाचे दोन स्वयंचलित दरवाजे खुले आहेत.
वारणा धरणातूनही प्रतिसेकंद ४२७२ व दूधगंगेतून १८०० घनफूट पाण्याचा विसर्ग सुरू आहे. पंचगंगेची पातळी ३८.२ फुटांवर असून अद्याप ३५ बंधारे पाण्याखाली आहेत. चार राज्य, तर १० प्रमुख जिल्हा मार्ग अद्याप बंद असल्याने वाहतूक विस्कळीत आहे.