कोल्हापूर जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 18, 2020 18:14 IST2020-04-18T18:11:14+5:302020-04-18T18:14:27+5:30
कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यात जोरदार पावसाची हजेरी, जिल्ह्यात ठिकठिकाणी वादळी पाऊस झाला. विजांच्या कडकडाटासह टपोऱ्या गारा पडत होत्या. जवळजवळ ...

कोल्हापूर जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस
ठळक मुद्देकोडोली परीसरात वादळी वाऱ्यासह पाऊससिद्धनेर्ली मध्ये वादळी पावसाचा प्रचंड नुकसान, घरांचे पत्रे ,कौलारू उडाले
कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यात जोरदार पावसाची हजेरी, जिल्ह्यात ठिकठिकाणी वादळी पाऊस झाला. विजांच्या कडकडाटासह टपोऱ्या गारा पडत होत्या. जवळजवळ तासभर पडलेल्या या पावसामुळे अनेक ठिकाणी झाडे उन्मळून पडली. कसबा बावडा येथील राजाराम सहकारी साखर कारखान्याच्या तीन धुराड्यापैकी एक धुराडे या पावसामुळे कोसळले.कारखाना बंद असल्याने जीवितहानी झाली नाही. कसबा बावडा येथील राजाराम साखर कारखान्यांच्या तीन धुराड्या पैकी एक धुराडे कोसळले.. कारखाना बंद असल्याने जिवीत हानी टळली.