कोल्हापूर जिल्ह्यात जोरदार पावसाची हजेरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 25, 2020 15:59 IST2020-03-25T15:38:56+5:302020-03-25T15:59:20+5:30

कोल्हापूर शहरासह जिल्ह्यातील विविध भागात सोसाट्याच्या वाऱ्यांसह पावसाने जोरदार हजेरी लावली. आजऱ्यात गारपीट झाली असून वीजांच्या कडकडाटासह आजरा, उत्तर परिसरात जोरदार पाऊस झाला.

Heavy rains in Kolhapur district | कोल्हापूर जिल्ह्यात जोरदार पावसाची हजेरी

कोल्हापूर जिल्ह्यात जोरदार पावसाची हजेरी

ठळक मुद्देकोल्हापूर जिल्ह्यात जोरदार पावसाची हजेरीआंबा परीसर, आजऱ्यात गारपीट, कौलव,भोगावती परिसरात मुसळधार

कोल्हापूर : कोल्हापूर शहरासह जिल्ह्यातील विविध भागात सोसाट्याच्या वाऱ्यांसह पावसाने जोरदार हजेरी लावली.
आंबा परीसर, आजऱ्यात गारपीट झाली असून वीजांच्या कडकडाटासह आजरा, उत्तर परिसरात जोरदार पाऊस झाला.

कौलव आणि भोगावती परिसरात दुपारी विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस पडत आहे. धामोड आणि करवीर तालुक्यातील कोपर्डे, पश्चिम भागातही जोरदार पाऊस पडत आहे. कडवी खोऱ्यात दोन तास पाऊस झाला. आंबा परीसरात तुरळक गारपीट झाली. 

सांगरुळ परिसरात बुधवारी सोसाट्याच्या वाऱ्यासह आलेल्या पावसाने नागरिकांची तारांबळ उडाली. अनेक ठिकाणी वाऱ्यामुळे झाडे उन्मुळून रस्त्यावर पडली. 

पन्हाळा तालुक्यातील माजगाव परिसरात वादळी वाऱ्यासह धुव्वाधार पाऊस सुरू आहे. सोसाट्याच्या वाऱ्यासह गारांचाही मारा होत आहे. पन्हाळा पश्चिम परिसरात पावसाचे वातावरण शेतकर्‍यांची धांदल सुरू आहे. कोल्हापूर परिसरात अनेक ठिकाणी जोरदार पावसाची सुरूवात झाली आहे.

Web Title: Heavy rains in Kolhapur district