शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
4
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
5
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
6
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
7
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
8
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
9
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
10
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
11
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
12
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
13
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
14
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
15
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
16
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
17
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
18
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
19
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
20
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापूर: शाहूवाडी तालुक्यात अतिवृष्टी; कडवी, कासारी धरणातून पाण्याचा विसर्ग सुरु, नद्यांचे पाणी पात्राबाहेर

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 8, 2022 16:03 IST

नद्यांचे पाणी पात्राबाहेर पडल्याने नदीकाठी पूरसदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे

अनिल पाटीलसरुड : शाहूवाडी तालुक्यातील कडवी व कासारी धरण क्षेत्रात अतिवृष्टी झाली असून आज, सोमवारीही या परिसरात पावसाचा जोर कायम आहे. दरम्यान कडवी धरण ९० टक्के तर कासारी धरण ८१ टक्के भरले आहे. अतिवृष्टीमुळे दोन्ही धरणातील पाणी साठ्यात झपाट्याने वाढ झाल्याने नदी पात्रात पाण्याचा विसर्ग सुरु केला आहे.गेल्या २४ तासात दोन्ही धरण क्षेत्रात अतिवृष्टी झाली आहे. कडवी धरण क्षेत्रात १२० मि. मी. तर कासारी धरण क्षेत्रात १५८ मि. मी. इतक्या पावसाची नोंद झाली आहे. सध्या कडवी धरणात २. २५ टीएमसी व कासारी धरणात २. २४ टीएमसी इतका पाणीसाठा झाला आहे. पावसाचा जोर कायम राहिल्याने पाण्याची मोठी आवक होत असून धरणातील पाणी पातळीमध्ये झपाट्याने वाढ होत आहे.नद्यांचे पाणी पात्राबाहेरपरिणामी कडवी धरणातुन १८० क्युसेक तर कासारी धरणातुन ५५० क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरु केला आहे. संततधार पावसामुळे व धरणातील पाण्याच्या विसर्गामुळे कडवी तसेच कासारी नद्यांचे पाणी पात्राबाहेर पडुन या दोन्ही नदीकाठी पूरसदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे. आजअखेर कडवी धरण क्षेत्रात २१४४ मि. मी . तर कासारी धरण क्षेत्रात २७९० मि . मी. इतक्या पावसाची नोंद झाली आहे.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरshahuwadi-acशाहूवाडीRainपाऊसDamधरणriverनदी