वळवाच्या पावसाने कोल्हापूरकरांची उडाली दाणादाण, झाडांसह फलक कोसळले
By राजाराम लोंढे | Updated: May 20, 2025 19:33 IST2025-05-20T19:33:20+5:302025-05-20T19:33:46+5:30
कोल्हापूर : कोल्हापूर शहरात आज, मंगळवारी सायंकाळी सोसायटीच्या वाऱ्यासह वळीवाने अर्धा तास झोडपून काढले. ढगफुटी सारखा पाऊस झाल्याने रस्त्यावर ...

वळवाच्या पावसाने कोल्हापूरकरांची उडाली दाणादाण, झाडांसह फलक कोसळले
कोल्हापूर : कोल्हापूर शहरात आज, मंगळवारी सायंकाळी सोसायटीच्या वाऱ्यासह वळीवाने अर्धा तास झोडपून काढले. ढगफुटी सारखा पाऊस झाल्याने रस्त्यावर पाणीच पाणी होऊन ठिकाणी वाहतूक विस्कळीत झाली. जोरदार वाऱ्यामुळे अनेक ठिकाणी झाडांसह जाहीरातींचे फलक कोसळले. काही ठिकाणी दुकानाच्या समोर उभा केलेले स्टँड फलक उडून गेले.
गेली तीन-चार दिवस शहरात कमी अधिक प्रमाणात पाऊस होत आहे. मात्र, मंगळवारी सायंकाळी साडे चारला पावसाला सुरुवात झाली. सुरुवातीला रिपरिप राहिली मात्र, त्यानंतर सोसाट्याच्या वाऱ्यासह जोरदार पाऊस सुरु झाला. ढगफुटी सारखा पाऊस झाल्याने सगळीकडे पाणीच पाणी झाले. शाहूपुरी, राजारामपुरी, ताराराणी पुतळा, लक्ष्मीपुरी, मिरजकर तिकटी या परिसरात रस्त्यावर पाणी तुंबल्याने वहातूक विस्कळीत झाली.
सुमारे अर्धा तास पावसाने झोडपून काढले. पाऊस इतका जोरदार होता, वाहन चालकांना हेडलाईट लावूनच पुढे जावे लागत होते. वाऱ्यामुळे शहरासह उपनगरात विविध ठिकाणी रस्त्यावर पडल्याने वाहतुकीची कोंडी झाली. वीजेचे खांब कोसळले, तारा तुटल्या.