शहरं
Join us  
Trending Stories
1
मतांच्या चोरीबाबत भक्कम पुरावे, निवडणूक आयोगाला तोंड लपवायला जागा उरणार नाही: राहुल गांधी
2
बिहारमध्ये ६५ लाख मतदार वगळले; नोंदणी केलेल्या मतदारांची संख्या ७.२४ कोटींपर्यंत घटली
3
कोल्हापुरात हायकोर्टाचे १८ ऑगस्टपासून ‘सर्किट बेंच’; ४० वर्षांच्या प्रदीर्घ लढ्याला अखेर यश
4
मालेगाव स्फोटप्रकरणी सिमीच्या अँगलने तपास व्हायला हवा होता; विशेष न्यायालयाने केले स्पष्ट
5
‘एफ-३५’ फायटर खरेदी प्रस्ताव रोखला; भारताचे अमेरिकेला प्रत्युत्तर, लोकसभेत सरकारची माहिती
6
आठवडाभर लांबले; भारतावरील २५ टक्के टॅरिफची अंमलबजावणी ७ ऑगस्टपासून, पाकचा कर घटवला
7
जनता दल सेक्युलरचे माजी खासदार प्रज्वल रेवण्णा दोषी, आज होणार शिक्षा; मोलकरणीचा लढा यशस्वी
8
आक्रमक खासदारांना रोखण्यासाठी थेट कमांडो; लोकशाही इतिहासातील हा एक काळा दिवस: काँग्रेस
9
युतीबाबत कुठेही भाष्य नको, महापालिका निवडणूक...; राज ठाकरे यांच्या पदाधिकाऱ्यांना कानपिचक्या
10
ST महामंडळ पेट्रोल-डिझेल विकणार; केंद्र व राज्य सरकारचा भागीदारी प्रकल्प: प्रताप सरनाईक
11
एकनाथ शिंदेंच्या त्रासाला कंटाळून नरेश म्हस्के काँग्रेसमध्ये जाणार होते!; ठाकरे गटाचा दावा
12
परवाना परत करण्याचे कारण काय? गैरकृत्य होत असल्याचे अप्रत्यक्षपणे मान्य: अनिल परब
13
कांजूर डम्पिंग ग्राउंड सुरूच राहणार; सुप्रीम कोर्टाचा मुंबई पालिकेला मोठा दिलासा
14
पाकच्या मुलीशी कॉन्स्टेबलचा विवाह राष्ट्रीय सुरक्षेला धोका; सीआरपीएफचे कोर्टात स्पष्टीकरण
15
यवत हिंसाचारात कोणाचं किती नुकसान, सध्याची परिस्थिती कशी? जाणून घ्या ताजी अपडेट्स!
16
IND vs ENG 5th Test Day 2, Stumps : दिवसभरात १५ विकेट्स! यशस्वी खेळीसह टीम इंडियाला दिलासा
17
IND vs ENG : सिराजसह प्रसिद्ध कृष्णानं मारला 'चौकार'! यजमान इंग्लंडचा पहिला डाव अल्प आघाडीसह संपला
18
IND vs ENG : मियाँ मॅजिक! ओव्हलच्या मैदानात DSP सिराजनं साजरं केलं 'द्विशतक'
19
National Film Awards: 'श्यामची आई' मराठी चित्रपटानं जिंकला राष्ट्रीय पुरस्कार, वाचा विजेत्यांची संपूर्ण यादी…
20
IND vs ENG : जो रुट अन् प्रसिद्ध कृष्णा यांच्यात राडा; भांडण सोडवायला आलेल्या पंचावर KL राहुल चिडला

Kolhapur: वळीव पावसाच्या तडाख्यात केळी बागा भुईसपाट, शाळू कोलमडला; पंचनाम्यांचे काम सुरू

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 27, 2025 17:02 IST

ऐन काढणीच्या तोंडावर पिकांचे झालेल्या नुकसानीने शेतकरी हबकून गेला

आयुब मुल्लाखोची : मंगळवारी रात्री झालेल्या जोरदार वळीव पावसाच्या तडाख्यात हातकणंगले तालुक्यातील निम्म्या गावातील शेतीचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले आहे. शाळू, मका, हरभरा, गहू भुईसपाट तर केळी अर्ध्यातूनच तुटून पडली आहे. भाजीपाला उन्मळून पडून जमीनदोस्त झाला आहे. ऐन काढणीच्या तोंडावर पिकांचे झालेले नुकसान शेतकऱ्यांना वेदना देणारे ठरले आहे. अंतिम टप्प्यातील नुकसानीने शेतकरी हबकून गेला आहे.सोमवारी पावसाने हुलकावणी दिली. मंगळवारी रात्री नऊ वाजता सुरू झालेला पाऊस सव्वातासाने थांबला. सुसाट वारे, झपाझप पडणारा धो-धो पाऊस यामुळे उभी पिके आडवी झाली. तर केळी तुटून पडली. भाजीपाला उखडून जागीच पडला. रात्री पिकांचे नुकसान झाले असेल, असा अंदाज आला होता. परंतु सकाळी शेतात पिकांची स्थिती पाहावयास गेलेला शेतकरी पिके किसलेली पाहून हतबल झाला. शासन नुकसानभरपाई देईल काय, या अपेक्षेने शेतकरी चौकशी करू लागला आहे.पेठ वडगाव सर्कलमध्ये नुकसानीचा फटका सर्वात जास्त आहे. जनावरांच्या शेडचे पत्रे हवेत उडून ते दुसरीकडे जाऊन पडले आहेत. कुंभोज, वाठार, हातकणंगले परिसरातील पिकांचेही मोठे नुकसान झाले आहे. बुवाचे वाठार येथील केळीच्या बागेचे न भरून येणारे नुकसान झाले आहे. खोची, भेंडवडे, लाटवडे, भादोले परिसरात शाळू, मका, गहू पिकांचे साठ टक्के नुकसान झाले आहे. आडसाली ऊस जमिनीबरोबर झोपला आहे.काढणीच्या काळातच पाऊसरब्बी हंगामातील निम्म्याहून अधिक पिकांची काढणी झाली असून, उर्वरित पिकांची काढणी सुरू होणार होती. त्यामुळे नुकसान जास्त झाले आहे. शाळू ५००, गहू १००, हरभरा १००, मका १५ हेक्टर तर १०० हेक्टर क्षेत्रातील केळी पिकाचे नुकसान झाले आहे. एकरी दोन ते सव्वादोन लाख रुपये नुकसान केळी पिकाचे झाले आहे. जवळपास ८०० हेक्टर क्षेत्रातील पिकांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे.

पंचनामे करण्याचे काम सुरूकुंभोज ते नीलेवडी असा पूर्व पश्चिम विभागात वळीव तुफान बरसला आहे. भादोले परिसरात गारांचाही वर्षाव झाल्याने उसाचा पाला फाटला आहे. शेतात विद्युत तारा तुटून पडल्या आहेत. झाडेही पिकात पडल्याने नुकसान झाले आहे. खासदार धैर्यशील माने, आमदार अशोकराव माने यांनी प्रशासनाला तत्काळ नुकसानीचे पंचनामे करण्यासंदर्भात सूचना दिल्या आहेत. त्याप्रमाणे पंचनामे करण्याचे काम सुरू झाले आहे.

शाळू, गहू पिके काढताना कस होणार आहे. शाळू काळा पडणार असून कापणी मशीन नेताना अडचण होणार आहे. ऐन वाळण्याच्या स्थितीत असताना शाळू, गहू, हरभरा यास ओलावा लागला आहे. त्यामुळे नुकसानीचे प्रमाण जास्त राहणार आहे. भाजीपाला तर उत्पादनाच्या अगोदरच नुकसानीचा ठरला आहे. - श्रीकांत पाटील, लाटवडे

किणीत प्राथमिक शाळेचे छप्पर उडालेकिणी : वादळी वाऱ्यामुळे किणी (ता. हातकणंगले) येथील जिल्हा परिषदेच्या प्रताप विद्यामंदिर शाळेच्या तीन खोल्यांवरील पत्र्याचे छत व घरे, जनावरांचे शेड अशा १४ ठिकाणचे पत्रे व छत उडून गेल्याने सुमारे ३५ लाखांहून अधिक रुपयांचे नुकसान झाले आहे. तर शाळेच्या ग्राऊंडवर लावलेल्या उसाच्या रिकाम्या ट्राॅल्या पलटी झाल्या. ठिकठिकाणी विजेचे खांब मोडून तारा तुटल्या आहेत. माळवाडीवरील हैदर महाबरी यांच्या सहा खोल्यांवरील सिमेंट पत्र्याचे छत उडून गेले आहे. किणी तळसंदे रोडच्या कडेला असणारी हेमंत पाटील यांची एक एकरातील केळीची बाग भुईसपाट झाल्याने चार ते पाच लाख रूपये नुकसान झाले आहे.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरRainपाऊसFarmerशेतकरी