शहरं
Join us  
Trending Stories
1
RR vs KKR सामना रद्द! समान १७ गुण असूनही SRH क्वालिफायर १ साठी पात्र, जाणून घ्या कारण
2
इराणचे राष्ट्रपती रईसी यांची हत्या? अमेरिकेने व्यक्त केला संशय, बोलावली तातडीची बैठक 
3
विराट, सिराज, संजू T20 World Cup मधील भारताच्या एकमेव सराव सामन्याला मुकणार
4
EVM वर ८ वेळा मतदान करताना दिसला तरुण, व्हिडीओ व्हायरल, राहुल गांधींनी दिला सक्त इशारा
5
राहुल गांधी, राजनाथ सिंह, श्रीकांत शिंदे, स्मृती इराणी...पाचव्या टप्प्यातील हायप्रोफाईल लढती
6
मतदानापूर्वी नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाचा वाहतुकीबाबत महत्त्वपूर्ण निर्णय
7
उत्तर प्रदेशात भाजप किती जागा जिंकणार? राहुल गांधींनी थेट आकडाच सांगितला...
8
RR vs KKR सामन्याचा ग्राऊंड रिपोर्ट! मॅच रद्द झाल्यास असं असेल Playoffs चं वेळापत्रक 
9
'देशात परिवर्तन अटळ! महाराष्ट्रातून भाजप आणि मित्रमंडळीचा सुपडा साफ होणार', नाना पटोलेंचा दावा
10
पद्मश्री पुरस्कारानंतर राजकारणातील प्रतिष्ठित पुरस्कार जिंकण्याचं कंगना याचं स्वप्न; म्हणाल्या...
11
राज्यात महाविकास आघाडीच्या ४० पेक्षा जास्त जागा येतील, बाळासाहेब थोरातांना विश्वास
12
इराणच्या राष्ट्रपतींना घेऊन जाणारं हेलिकॉप्टर क्रॅश, बचाव पथक रवाना
13
'...तर मी तेव्हाच मुख्यमंत्री झालो असतो', छगन भुजबळ यांचा मोठा गौप्यस्फोट
14
सनरायझर्स हैदराबादचा दणदणीत विजय, पण क्वालिफायर १ ची जागा RR vs KKR सामन्यावर अवलंबून
15
"एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाला संजय राऊतांचाच विरोध होता", अजित पवार गटाचा पलटवार
16
मुस्लिम कट्टरतावाद्यांच्या मतांसाठी संतांचा अपमान..; PM मोदींचा ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
17
‘मोदींचं गुणगान गाऊन योगींकडून भगव्या वस्त्राचा अपमान, भगवे कपडे घालून संतांसारखे…’ नाना पटोलेंचा सल्ला
18
"भाजपला डिस्टर्ब करू नका, निवडणूक संपताच...", हिमंता यांचा माजी IPS अधिकाऱ्याला इशारा
19
आमदार पी.एन. पाटील यांची प्रकृती बिघडली; खासगी रुग्णालयात दाखल, तातडीने शस्त्रक्रिया सुरु
20
ऑल दी बेस्ट, रोहित अँड... ! Mumbai Indians च्या अपयशानंतर असं का म्हणाल्या नीता अंबानी?

जिल्ह्यात पावसाची उघडझाप, सर्वाधिक गगनबावड्यात ६०.५० मिलिमीटरची नोंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 15, 2020 5:28 PM

कोल्हापूर जिल्ह्यात सोमवारी दिवसभर पावसाची उघडझाप राहिली. अधूनमधून पावसाची रिपरिप सुरू असली तरी दुपारच्या टप्प्यात खडखडीत ऊन पडले होते. सोमवारी सकाळी आठ वाजता संपलेल्या चोवीस तासांत सर्वाधिक पाऊस गगनबावडा तालुक्यात ६०.५० मिलिमीटरची नोंद झाली आहे.

ठळक मुद्देजिल्ह्यात पावसाची उघडझापसर्वाधिक गगनबावड्यात ६०.५० मिलिमीटरची नोंद

कोल्हापूर : जिल्ह्यात सोमवारी दिवसभर पावसाची उघडझाप राहिली. अधूनमधून पावसाची रिपरिप सुरू असली तरी दुपारच्या टप्प्यात खडखडीत ऊन पडले होते. सोमवारी सकाळी आठ वाजता संपलेल्या चोवीस तासांत सर्वाधिक पाऊस गगनबावडा तालुक्यात ६०.५० मिलिमीटरची नोंद झाली आहे.मान्सून सक्रिय झाला असून, शेतीला हवा तसाच पाऊस पडत आहे. खरीप पिकास उगवणीसाठी हा पाऊस पोषक असून ऊन, पाऊस होत असल्याने पिकांच्या वाढीस चांगला आहे. रविवारी रात्री जिल्ह्यात पावसाची रिपरिप सुरू होती. सोमवारी सकाळी पण काही ठिकाणी जोरदार सरी कोसळल्या. मात्र, अकरापासून उघडीप राहिली.

अधूनमधून एक-दोन सरी वगळता दिवसभर उघडीप राहिली. सोमवारी सकाळी आठ वाजता संपलेल्या चोवीस तासांत जिल्ह्यात सरासरी १४.६४ मिलिमीटर पाऊस झाला. यामध्ये सर्वाधिक पाऊस गगनबावडा तालुक्यात ६०.५० मिलिमीटरची नोंद झाली.धरणक्षेत्रातही चांगला पाऊस सुरू असल्याने धरणाच्या पाणीपातळीत वाढ होत आहे. ओढे, नाले वाहू लागल्याने नद्यांच्या पातळीत झपाट्याने वाढ होत आहे. राधानगरी व वारणा धरणांत २४ तासांत एक दशलक्ष घनमीटर पाण्याची वाढ झाली, तर काळम्मावाडी धरणात तब्बल ३.३९ दशलक्ष घनमीटरने पाणी वाढले. 

टॅग्स :Rainपाऊसkolhapurकोल्हापूर