शहरं
Join us  
Trending Stories
1
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीची निवडणूक बिनविरोध करावी; शरद पवारांचा सल्ला
2
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
3
पाकिस्तानचा पोपट झाला, युद्धविरामाच्या अटींबाबत शाहबाज शरीफ यांचा दावा जेडी वेन्स यांनी फेटाळला
4
Gold Silver Price Today: बाजार उघडताच सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; Silver ₹४,७०० नं स्वस्त, Gold चे दर काय?
5
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
6
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
7
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
8
Post Office च्या 'या' स्कीममध्ये व्याजाद्वारेच मिळतील ४.४० लाख; ३०० रुपयांच्या बचतीतून तयार होईल १५ लाखांचा फंड
9
Share Market: शेअर बाजारात घसरण: सेन्सेक्स ५०० हून अधिक अंकांनी घसरला, निफ्टी २३,९०० च्या खाली
10
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
11
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
12
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
13
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
14
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
15
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
16
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
17
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
18
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
19
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
20
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापूर जिल्ह्यात पावसाचा जोर वाढणार, पाच दिवस मुसळधार; २८ बंधारे पाण्याखाली

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 5, 2024 14:45 IST

गगनबावडा तालुक्यात सर्वाधिक पाऊस

कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यातील एकूण २८ बंधारे पाण्याखाली आहेत. जिल्ह्यात काल दिवसभरात गगनबावडा तालुक्यात सर्वाधिक ४४.१ मिमी पाऊस पडल्याची नोंद झाली आहे. राधानगरी धरणात ३.१२ टीएमसी पाणीसाठा असून धरणातून १२०० क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे. जिल्ह्यात आज, शुक्रवार दि. ५ जुलैपासून पुढील पाच दिवस म्हणजे १० जुलैपर्यंत मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता आहे.गेल्या १० दिवसांपासून हलकासा का होईना पण पावसाचा जोर वाढला आहे, परंतु रविवार दि. ७ जुलैपासून तो काहीसा कमी होत असला तरी तेथे मध्यम पावसाची शक्यता आहे. जिल्ह्यात काल दिवसभरात गगनबावडा तालुक्यात सर्वाधिक ४४.१ मिमी पाऊस पडल्याची नोंद झाली आहे.जिल्ह्यात २४ तासात पडलेला एकूण पाऊस मिमी मध्ये पुढीलप्रमाणे - हातकणंगले- १.२ मिमी, शिरोळ -०.८ मिमी, पन्हाळा- १०.२ मिमी, शाहुवाडी- १८.८ मिमी, राधानगरी- १३.३ मिमी, गगनबावडा- ४४.१ मिमी, करवीर- ३.३ मिमी, कागल- ३.१ मिमी, गडहिंग्लज- ४.५ मिमी, भुदरगड- १६.९ मिमी, आजरा- १०.२ मिमी, चंदगड- १६.६ मिमी असा एकूण ९ मिमी पाऊस पडल्याची नोंद आहे.२८ बंधारे पाण्याखाली पंचगंगा नदीवरील- शिंगणापूर, राजाराम, सुर्वे, रुई, इचलकरंजी, तेरवाड व शिरोळ,वारणा नदीवरील- चिंचोली, भोगावती नदीवरील- हळदी, राशिवडे व सरकारी कोगे, कासारी नदीवरील- यवलूज, पुनाळ तिरपण, ठाणे आळवे व वालोली, घटप्रभा नदीवरील- पिळणी, बिजूर-भोगोली, हिंडगांव, कानडे-सावर्डे, अडकूर, कानडेवाडी व तारेवाडी,  हिरण्यकेशी नदीवरील - साळगांव, ताम्रपर्णी नदीवरील- कुर्तनवाडी, हल्लारवाडी, काकर व माणगाव, दुधगंगा नदीवरील- दत्तवाड असे 28 बंधारे पाण्याखाली आहेत.जिल्ह्यातील धरणांमध्ये पाणीसाठा राधानगरी ३.१२ टीएमसी, तुळशी १.४८ टीएमसी, वारणा १३.८५ टीएमसी, दूधगंगा ६.५३ टीएमसी, कासारी १.०३ टीएमसी, कडवी १.४१ टीएमसी, कुंभी ०.९७ टीएमसी, पाटगाव १.९० टीएमसी, चिकोत्रा ०.५२ टीएमसी, चित्री ०.७९ टीएमसी, जंगमहट्टी ०.६८ टीएमसी, घटप्रभा १.५६ टीएमसी, जांबरे ०.८२ टीएमसी, आंबेआहोळ ०.९३ टीएमसी, सर्फनाला ०.१५ टीएमसी व कोदे लघु प्रकल्प ०.१५ टीएमसी इतका पाणीसाठा आहे. जांबरे मध्यम प्रकल्प आज दि. ५ जुलै २०२४ रोजी पहाटे २ वाजता पूर्ण क्षमतेने भरला आहे.बंधाऱ्यांची पाणी पातळी पुढीलप्रमाणे 

राजाराम २६ फूट, सुर्वे २५.२ फूट, रुई ५५.२ फूट, इचलकरंजी ५२.४ फूट, तेरवाड ४३.३ फूट, शिरोळ ३६.३ फूट, नृसिंहवाडी ३३.६ फूट, राजापूर २२.८ फूट तर नजीकच्या सांगली १० फूट व अंकली १२.७ फूट अशी आहे.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरRainपाऊसDamधरणWaterपाणी