कोडोली परिसरात विजेच्या कडकडाटासह जोरधार पाऊस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 12, 2020 10:53 IST2020-10-12T10:52:59+5:302020-10-12T10:53:56+5:30
kolhapur, rain,kodoli कोडोली व परीसरात विजेच्या कडकडासह मुसळधार पाऊसाने चांगलेच झोडपून काढले. सायकांळी पाचच्या सुमारास हलक्या स्वरूपात पाऊस पडला. तर रात्री आठ वाजता पुन्हा विजेच्या कडकडाट व वाऱ्यासह मुसळधार पाऊसाने चांगलेच झोडपून काढले.

कोडोली परिसरात विजेच्या कडकडाटासह जोरधार पाऊस
ठळक मुद्देकोडोली परिसरात विजेच्या कडकडाटासह जोरधार पाऊसविद्युत पुरवठा खंडीत
कोडोली -कोडोली व परीसरात विजेच्या कडकडासह मुसळधार पाऊसाने चांगलेच झोडपून काढले. सायकांळी पाचच्या सुमारास हलक्या स्वरूपात पाऊस पडला. तर रात्री आठ वाजता पुन्हा विजेच्या कडकडाट व वाऱ्यासह मुसळधार पाऊसाने चांगलेच झोडपून काढले.
दुपारपर्यत कडकडीत ऊन होते, दुपारनंतर ढगाळ वातावरण झाले होते. सायकांळी पाऊसाने सुरुवात केली. सध्या भात कापणीसाठी आले आहेत, वाऱ्याचे प्रमाण जोरदार असल्याने कापणीस आलेले भाताचे पिक आडवे तिडवे पडल्यामुळे हाता तोडास आलेले पिकांचे नुकसान होणार असल्याने शेतकरी वर्ग मोठया प्रमाणावर चिंताग्रस्त झाला आहे. यावेळी काही वेळा विद्युत पुरवठा खंडीत करणेत झाला होता.