शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानने पीओकेमध्ये इमरजन्सी घोषित केली, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द; काय घडतेय...
2
पहलगामनंतर काश्मीरमध्ये कडक सुरक्षा, कुपवाडामध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर दहशतवादी हल्ला
3
Pahalgam Terror Attack : हृदयस्पर्शी! गोळीबार सुरू असताना काश्मिरी मुलाने वाचवला चिमुकल्याचा जीव; Video व्हायरल
4
Pahalgam Terror Attack : "माझ्या पतीला शहीद दर्जा द्यावा, त्याने अनेकांचा जीव वाचवला"; शुभमच्या पत्नीची सरकारकडे मागणी
5
जिल्हाधिकारी पैसे घेतात, अधिकारी २% शिवाय फाइल काढत नाहीत, खासदार, आमदारांचा आरोप
6
TCS की इन्फोसिस, कोणी वाढवला सर्वाधिक पगार? आयटी क्षेत्रात कोणती कंपनी देणार जास्त नोकऱ्या?
7
अरे बापरे! प्लास्टिकच्या बॉटलमध्ये पाणी पिणाऱ्यांनो सावधान; हार्ट ॲटॅकचा मोठा धोका
8
घर खरेदीदारांच्या नुकसान भरपाईसाठी अधिकाऱ्यांची होणार नियुक्ती; राज्यभरात १२ जिल्हा नियंत्रक अधिकारी, महसूल वसुली अधिकारी
9
Pahalgam Terror Attack : Video- मोठी कारवाई! पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी ९ दहशतवाद्यांची घरं केली उद्ध्वस्त
10
इराणच्या बंदरावर भीषण स्फोट की घातपात? १४ जणांचा मृत्यू तर ७५० लोक जखमी 
11
गुजरात पोलिसांची मोठी कारवाई! अहमदाबाद, सुरतमध्ये १ हजार बांगलादेशी ताब्यात
12
पर्यटकांवरील गोळीबाराच्या व्हिडीओंमुळे बेचैनी, अस्वस्थता वाढली, देशभरात नागरिकांमध्ये चिंता
13
ईडीचे कार्यालय असलेल्या कैसर-ए-हिंद इमारतीला भीषण आग; पहाटे २.३० वाजल्यापासून अद्याप धुमसतेय...
14
पहिलाच प्रकार! बँक अकाऊंट सांभाळता सांभाळता डीमॅट अकाऊंट खाली झाले; रातोरात ५ लाखांचे शेअर वळते केले
15
पाकिस्तानी दहशतवाद्यांना आता धास्ती 'अननोन गनमॅन'ची; दोन वर्षांत २० ते २५ अतिरेक्यांचा केला खात्मा
16
आजचे राशीभविष्य, २७ एप्रिल २०२५: नव्या कार्याचा आरंभ न करणे हितावह राहील
17
बिलावल बरळले; पाणी रोखले तर भारतीयांच्या रक्ताचे पाट वाहतील
18
दहशतीच्या भयाण रात्री खुर्शीदभाईंनी आम्हा पाच कुटुंबांना दिला घरात आश्रय; आमच्यासाठी धावून आलेले देवदूतच
19
बेकायदा पार्किंगबाबत जनजागृती करा; उच्च न्यायालयाची ज्येष्ठ नागरिकांना सूचना
20
पर्यटकांना होऊ शकतो घाबरण्याचा आजार; मानसिक आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात

कोल्हापूर जिल्ह्यात जोरदार पाऊस, पंचगंगेची पातळी ३३ फुटांच्यावर; ७२ बंधारे पाण्याखाली 

By राजाराम लोंढे | Updated: July 19, 2024 16:51 IST

जिल्ह्यासाठी रेड अलर्ट, जिल्हा प्रशासनाचा नदी काठच्या गावांना सतर्कतेचा इशारा 

कोल्हापूर : जिल्ह्यात आज, शुक्रवारी दिवसभर जोरदार पाऊस कोसळत आहे. धरणक्षेत्रातही धुवांधार पाऊस सुरु असल्याने विसर्ग वाढल्याने नद्यांच्या पातळीत झपाट्याने वाढ होत आहे. दुपारी चार वाजेपर्यंत पंचगंगा ३३ फुटावरुन वाहत असल्याने जिल्ह्यातील तब्बल ७२ बंधारे पाण्याखाली गेल्या जनजीवन काहीसे विस्कळीत गेले आहे.जिल्ह्यातील चार धरणे पुर्ण क्षमतेने भरली असून प्रमुख ‘राधानगरी’ ६८, ‘वारणा’ ६६ तर दूधगंगा ५२ टक्के भरले आहे. हवामान विभागाने जिल्ह्यासाठी रेड अलर्ट दिला असून जिल्हा प्रशासनाने नदी काठच्या गावांना सतर्कतेचा इशारा दिला आहे.गुरुवार पासून जिल्ह्यात पावसाचा जोर वाढला आहे. रात्रभर जोरदार पाऊस कोसळत राहिला, शुक्रवारी सकाळ पासून त्यात वाढ होत गेली असून दिवसभर एक सारखा पाऊस कोसळत असल्याने नदी, ओढ्यांचे पाणी झपाट्याने वाढत आहे. गगनबावडा, भुदरगड, राधानगरी, आजरा, चंदगड व शाहूवाडी तालुक्यात धुवांधार पाऊस सुरु आहे.धरणक्षेत्रातही पाऊस कोसळत असल्याने राधानगरीतून प्रतिसेंकद १४००, वारणातून १५४६,. कासारीतून ५५०, कुंभीतून ३००, घटप्रभातून ६९५२ घनफुट पाण्याचा विसर्ग सुरु असल्याने पुराचे पाणी झपाट्याने वाढ आहे. पंचगंगा नदीची पातळी दिवसभरात तब्बल चार फुटाने वाढली असून दुपारी चार वाजता ३३ फुटाच्या वरुन पाणी वाहत आहे. पंचगंगा इशारा पातळीकडे (३९ फुट) आगेकुच करु लागली आहे.  विविध नद्यांवरील तब्बल ७२ बंधारे पाण्याखाली गेल्याने या मार्गावरील जनजीवन विस्कळीत झाले आहे.हवामान विभागाने कोल्हापूरसाठी रेड अलर्ट दिल्याने जिल्हा प्रशासन सतर्क झाले आहे. नदीच्या गावांना सावधनतेचा इशारा दिला आहे.

२२ खासगी मालमत्तांची पडझडजिल्ह्यात २२ खासगी मालमत्तांची पडझड झाली असून १३ लाख ८५ हजार रुपयांचे नुकसान झाल्याची माहीती जिल्हा प्रशासनाने दिली आहे.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरRainपाऊसDamधरणriverनदीWaterपाणीTrafficवाहतूक कोंडी