शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापूर जिल्ह्यात धरणक्षेत्रात जोरदार पाऊस, पंचगंगेची पातळी २१ फुटावर; नऊ बंधारे पाण्याखाली

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 10, 2023 13:13 IST

नऊ बंधारे पाण्याखाली गेल्या या मार्गावरील वाहतूक काहीसी विस्कळीत झाली

काेल्हापूर : जिल्ह्यातील काळम्मावाडी धरण वगळता बहुतांशी धरणात ३५ टक्यांपेक्षा अधिक पाणीसाठा झाला आहे. जिल्ह्यात रविवारी पावसाची उघडझाप सुरू असली तरी धरणक्षेत्रात जोरदार पाऊस कोसळत आहे. पंचगंगेची पातळी २१ फुटावर गेल्याने नऊ बंधारे पाण्याखाली गेले आहेत.यंदा जून महिना कोरडा गेल्याने जिल्ह्यातील सर्वच धरणांनी तळ गाठला होता. त्यामुळे पाऊस कधी सुरु होणार आणि धरणात पाणी साठणार कधी? याची चिंता सगळ्यांनाच लागली होती. गेल्या दहा-बारा दिवसांपासून जिल्ह्यात पाऊस सुरू आहे. त्यामुळे हळूहळू धरणातील पाण्याची पातळी वाढू लागली आहे. रविवारी सकाळी आठ वाजेपर्यंत बहुतांशी धरणातील पाणीसाठा ३५ टक्क्यांपेक्षा अधिक आहे. काळम्मावाडी धरणात आतापर्यंत १४ टक्के पाणीसाठा आहे.दरम्यान, रविवारी सकाळपासून पावसाचा जोर कमी झाला आहे. अधूनमधून जोरदार सरी कोसळत आहेत. जिल्ह्याच्या पश्चिमेकडील तालुक्यात सतत पाऊस आहे. धरणक्षेत्रात जोरदार पाऊस कोसळत आहे. राधानगरी धरणातून प्रतिसेंकद ७०० घनफूट पाण्याचा विसर्ग सुरू असल्याने भोगावती नदीच्या पाण्याला काहीसी फुग आली आहे.

पंचगंगेची पातळी वाढत असून रविवारी ती २१ फुटापर्यंत पोहचली होती. नऊ बंधारे पाण्याखाली गेल्या या मार्गावरील वाहतूक काहीसी विस्कळीत झाली असून पर्यायी मार्गाने वाहतूक सुरू करण्यात आली आहे. रोप लागणीला अपेक्षित असाच पाऊस होत असल्याने ज्या शेतकऱ्यांचा तरवा तयार आहे, त्यांची रोप लागणीसाठी धांदल उडाली आहे.

कोदे ९३ टक्के भरलेजिल्ह्यात सर्वप्रथम चंदगड तालुक्यातील घटप्रभा धरण १०० टक्के भरले होते. त्यानंतर गगनबावडा तालुक्यातील कोदे धरण ९३ टक्के भरले असून येत्या दोन दिवसात तेही पूर्ण क्षमतेने भरू शकते.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरRainपाऊसriverनदीDamधरण