भुदरगड तालुक्यात जोरदार पाऊस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 18, 2018 19:32 IST2018-11-18T19:31:05+5:302018-11-18T19:32:35+5:30
गारगोटी : भुदरगड तालुक्यात आज काही ठिकाणी तुरळक तर काही ठिकाणी जोरदार पाऊस झाला. अचानक आलेल्या या पावसाने तारांबळ ...

भुदरगड तालुक्यात जोरदार पाऊस
गारगोटी : भुदरगड तालुक्यात आज काही ठिकाणी तुरळक तर काही ठिकाणी जोरदार पाऊस झाला. अचानक आलेल्या या पावसाने तारांबळ उडाली. ऊसतोडणीसाठी आलेल्या मजुरांना पावसात भिजावे लागले. मात्र हा पाऊस रब्बी पिकांसह ऊस लागणींना पोषक आहे.
गेल्या तीन चार दिवसांपासून तालुक्यात ढगाळ हवामान निर्माण झाले होते. थंडीचे दिवस असतांना देखील सकाळी ढगाळ वातावरण, दुपारी उकाडा व अचानक पाऊस असे समिश्र वातावरण निर्माण झाले आहे. आज, रविवारी दुपारी चारच्या सुमारास भुदरगड तालुक्यामध्ये काही ठिकाणी विजेच्या कडकडाटासह पावसाच्या सरी कोसळल्या.