आरोग्य निरीक्षकाचे महिला अधिकाऱ्याशी असभ्य वर्तन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 17, 2020 17:04 IST2020-03-17T17:01:22+5:302020-03-17T17:04:22+5:30

महानगरपालिकेच्या आरोग्य विभागातील एका आरोग्य निरीक्षकाकडून सहकारी महिला आरोग्य निरीक्षकाबरोबर असभ्य वर्तन केल्याचा प्रकार मंगळवारी कपीलतिर्थ मार्केट परिसरात घडला. याबाबत संबंधित महिला अधिकाऱ्याने महापौर निलोफर आजरेकर व कर्मचारी संघाचे अध्यक्ष संजय भोसले यांच्याकडे तक्रार केली आहे.

Health inspector's rude behavior with a female officer | आरोग्य निरीक्षकाचे महिला अधिकाऱ्याशी असभ्य वर्तन

आरोग्य निरीक्षकाचे महिला अधिकाऱ्याशी असभ्य वर्तन

ठळक मुद्देआरोग्य निरीक्षकाचे महिला अधिकाऱ्याशी असभ्य वर्तनमहापौरांसह कर्मचारी संघाकडे तक्रार

कोल्हापूर : महानगरपालिकेच्या आरोग्य विभागातील एका आरोग्य निरीक्षकाकडून सहकारी महिला आरोग्य निरीक्षकाबरोबर असभ्य वर्तन केल्याचा प्रकार मंगळवारी कपीलतिर्थ मार्केट परिसरात घडला. याबाबत संबंधित महिला अधिकाऱ्याने महापौर निलोफर आजरेकर व कर्मचारी संघाचे अध्यक्ष संजय भोसले यांच्याकडे तक्रार केली आहे.

आरोग्य विभागातील एक निरीक्षक आपला अवमान तसेच मानहानी होईल, लज्जा उत्पन्न होईल असे बोलतो. अन्य कर्मचाऱ्यांनाही तो अर्वाच्च भाषेत शिवीगाळ करतो. त्याचे वर्तन अतिशय उद्धट, उर्मट आहे अशी सर्वसाधारण तक्रार या महिला आरोग्य निरीक्षकाची आहे.

मंगळवारी सकाळी या अधिकाऱ्याने आधी मोबाईलवर वाद घातला, नंतर समक्ष कार्यालयात येऊन अन्य कर्मचाऱ्यांसमोर आपला अपमान केला, असेही या महिला आरोग्य निरीक्षकाची तक्रार आहे.

 

 

Web Title: Health inspector's rude behavior with a female officer