शहरं
Join us  
Trending Stories
1
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
2
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
3
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
4
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
5
राज्यात 20 ते 22 एप्रिल दरम्यान वादळी पावसाची शक्यता, 'या' जिल्ह्यांना इशारा, शेतकऱ्यांना आवाहन 
6
"अभी तो मैं जवान हूँ..." फिटनेस किंग कोहलीची कमाल! २१ मीटर धावत येऊन KL राहुलच्या खेळीला लावला ब्रेक
7
क्रूरतेचा कळस! सख्ख्या भावावर कुऱ्हाडीने वार; मृतदेहाचे केले ९ तुकडे, थरकाप उडवणारी घटना
8
मोठी कारवाई! नोएडा हिंसाचार प्रकरणातील मास्टरमाइंड आदित्य आनंदला तामिळनाडूतून अटक
9
WWE नाही मनमाडच्या स्थानकावरील Video! अंगावर शहारे येतील, रेल्वेच्या ओव्हरहेड इलेक्ट्रिक खांबावर चढला माथेफिरू 
10
नाशिक TCS प्रकरण: निदा खान मुंब्र्यातील हॉस्पिटलमध्ये दोनदा आलेली; डॉक्टरांचा मोठा खुलासा, अटकपूर्व जामिनासाठी धडपड
11
जितेश शर्माला आपल्या क्रिजमध्ये पाहून क्रुणाल पांड्या गोंधळला; Run Out झाल्यावर रागही काढला (VIDEO)
12
होर्मुझच्या सामुद्रधुनीत जहाजांवर गोळीबार! इराणचा आक्रमक पवित्रा; पुन्हा युद्धाची ठिणगी?
13
आता क्युबाकडे मोर्चा वळला? अमेरिकेच्या सर्वात महागड्या ड्रोनने ६ तास घिरट्या घातल्याने खळबळ; काय आहे अमेरिकेचा गेमप्लॅन?
14
बँक ऑफ महाराष्ट्रावर दरोडा, १५ कोटी लुटीचं बिहार कनेक्शन; ५ सशस्त्र गुन्हेगारांनी २० मिनिटांत डाव साधला
15
लहानपणी वडिलांना गमावलं, आईनं शाळेत झाडू मारून शिकवलं; आज मुलगा शिक्षण मंत्रालयात बनला अधिकारी
16
JNPT बंदरात भीषण स्फोट! केमिकल प्लांटमध्ये ब्लास्ट; धुराचे लोट लांबपर्यंत
17
लोकसभेतील ५४३ जागांसाठी का लागू होऊ शकत नाही महिला आरक्षण, सरकार अन् विरोधकांचे दावे काय?
18
"जितेंद्र शेळके यांचा मृत्यू अपघात की घातपात?" अंजली दमानिया यांनी उपस्थित केले खळबळजनक प्रश्न
19
छत्तीसगढप्रकरणी अनिल अग्रवालांवर FIR, समर्थनार्थ उतरले नवीन जिंदल; म्हणाले, "ही दु:खद..."
20
तुम्हालाही रात्री २-३ वाजता अचानक खूप भूक लागते, रोजची सवय की शरीर देतंय धोक्याचा इशारा?
Daily Top 2Weekly Top 5

कॉलेजचा शिपाईच बनला केंद्राध्यक्ष

By admin | Updated: October 5, 2014 23:04 IST

निवडणूक कार‘भार’ : निवृत्त शिक्षकांनाही आदेश

दत्तात्रय पाटील - म्हाकवे -विधानसभा निवडणुकीसाठी शासकीय यंत्रणेकडून जय्यत तयारी सुरू आहे. त्यादृष्टीने प्रत्येक गावातील मतदान केंद्रावर केंद्राध्यक्ष, मतदान अधिकाऱ्यांच्या नेमणुका केल्या आहेत; परंतु निवडणूक विभागाने शाळा, कॉलेजातील शिपायाला केंद्राध्यक्ष, तर शिक्षक, प्राध्यापकांना मतदान प्रतिनिधी म्हणून नेमणुका दिल्या आहेत. निवृत्त शिक्षकांना नेमणुका केल्याचे दूरध्वनीद्वारे कळविले आहे. त्यामुळे याबाबत आश्चर्य व्यक्त होत आहे.प्रत्येक मतदान केंद्रावर एक केंद्राध्यक्ष, तीन मतदान प्रतिनिधी, एक शिपाई अशा यंत्रणेमार्फत नेमणुका केल्या जातात. मतदान केंद्रावर पारदर्शीपणा आणण्यासाठी केंद्राध्यक्ष दक्ष आणि अनुभवी असणे आवश्यक आहे; परंतु यंत्रणेच्या घोळामुळे काही ठिकाणी शिपायांना केंद्राध्यक्ष म्हणून, तर प्राध्यापकांना दोन नंबरचे मतदान प्रतिनिधी म्हणून नेमणुका केल्या आहेत. त्याचबरोबर सेवानिवृत्त शिक्षकांच्याही मतदान केंद्रावर नेमणुका झाल्या आहेत. त्यांना त्यांच्या भ्रमणध्वनीवर संपर्क करून याबाबत माहिती दिली जात आहे. आपण सेवानिवृत्त झालो असल्याचे संबंधित शिक्षकांनी सांगण्याचा प्रयत्नही केला. मात्र, निवृत्त झाल्याच्या पुराव्यासह समक्ष भेटण्याच्या सूचना त्यांना दिल्या आहेत. काही सेवानिवृत्त शिक्षक परजिल्ह्यात आहेत. त्यांना विनाकारण निवडणूक यंत्रणेकडे हेलपाटे मारावे लागणार असल्याने त्यांच्यातून नाराजीचे सूर उमटत आहेत.तलाठ्यांमार्फत केंद्राची घरपोच माहितीमतदारांना मतदान केंद्रासह त्यांच्या मतदार यादीतील अनुक्रमांक, केंद्रक्रमांक, आदींची माहिती असलेल्या चिठ्ठ्या (स्ट्रीप) आता तलाठी, कोतवालामार्फत वाटप करण्यात येणार आहेत. त्यावर संबंधित मतदाराच्या फोटोचाही समावेश आहे. केंद्रावरील मतदान प्रतिनिधीकडे ही माहिती उपलब्ध करून दिली आहे. त्यामुळे दुबार, बोगस मतदानाला आळा बसणार आहे.