शहरं
Join us  
Trending Stories
1
लष्कर-ए-तोयबाचा कमांडर साजिद जट्टने रचला पहलगाम हल्ल्याचा कट; NIA चा खुलासा
2
फुटबॉल जगतातील दिग्गजाला जय शाह यांनी दिलं खास निमंत्रण; मेस्सी म्हणाला, "मी नक्कीच पुन्हा येईन!"
3
उधमपूरमध्ये जैश-ए-मोहम्मदच्या दहशतवाद्यांसोबत चकमक; सुरक्षा दलाने संपूर्ण परिसराला घेरले
4
IPL 2026 Auction : खर्चासाठी MI च्या पर्समध्ये फक्त पावणे तीन कोटी; तरीही ते निवांत कारण...
5
शाब्बास पोरा! ४० लाखांचं पॅकेज सोडून वडिलांचं स्वप्न केलं साकार; आधी IPS, मग झाला IAS
6
रणजित गायकवाड यांची हल्ल्यानंतर १० दिवसांनी मृत्यूशी झुंज अपयशी, त्याच दिवशी आरोपी गजाआड
7
"बांग्लादेशींना महाराष्ट्रात आणून सत्ताधाऱ्यांच्या जवळचे लोक ड्रग्स कारखाने चालवत आहेत..."
8
उद्धव-राज ठाकरे एकत्र आले अन् काँग्रेसही सोबत गेली तर..? देवेंद्र फडणवीसांचे स्पष्ट उत्तर
9
सुट्टी नाही! रोहित-विराटसाठीच नव्हे तर BCCI नं गिल आणि सूर्यासाठीही केली 'या' गोष्टीची सक्ती
10
भयंकर! बॉयफ्रेंडसाठी नवऱ्यासह मुलाला सोडलं, 'त्याने'च तिला संपवलं, अंगावर काटा आणणारी घटना
11
बंपर गिफ्ट...! या मल्टीबॅगर कंपनीनं १-२ नव्हे, वाटले तब्बल 24 बोनस शेअर, लोकांना केलं मालामाल; दिलाय 6100% हून अधिक परतावा
12
"विवाहित महिलांनी घरात...", विजयाच्या नशेत केरळच्या सीपीएम नेत्याचं वादग्रस्त विधान; उडाला गोंधळ
13
महालक्ष्मी रेसकोर्सवर साकारणार भव्यदिव्य सेंट्रल पार्क; आराखड्याचे महापालिकेकडून सादरीकरण
14
"मतदार याद्यांमधले घोळ आम्हीही दाखवले, पण..."; महापालिका निवडणुकांच्या घोषणेवर CMचे विधान
15
रेखा झुनझुनवालांकडे या कंपनीचे तब्बल ५ कोटींहून अधिक शेअर; ₹३०० पार जाणार स्टॉक, एक्सपर्ट्सचा दावा
16
Photo: 'या' वर्षातील बेस्ट बजेट स्मार्टफोन, किंमत १५ हजारांपेक्षा कमी, यादीत मोठे ब्रँड्स
17
Wedding Ritual: लग्नाआधीची विचित्र प्रथा, वरच्या कुटुंबाचं रक्षण करण्यासाठी वधूला करावं लागतं 'हे' काम
18
Municipal Election 2026 Dates: 'महा'संग्रामाचा शंखनाद! BMCसह राज्यातील २९ महापालिकांसाठी १५ जानेवारीला मतदान, १६ जानेवारीला निकाल
19
"हा प्रकार केवळ बेजबाबदारपणा नसून..."; उद्धवसेनेचं राज्य निवडणूक आयुक्तांना खरमरीत पत्र
20
पंतप्रधान मोदींमुळेच CBSE च्या पुस्तकात छत्रपतींचा २१ पानांचा जाज्वल्य इतिहास - देवेंद्र फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

दीड महिन्याने कोल्हापूरला परत येणार, सगळी तयारी झाली पाहिजे; अमित शाहांचा भाजप कार्यकर्त्यांना आदेश

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 20, 2023 11:25 IST

‘बूथ जिता, तो चुनाव जिता’ असे सांगून शाह यांनी यावेळी निवडणूक जिंकण्यासाठी आवश्यक गोष्टींचा ऊहापोह करताना जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी प्रयत्न करण्याचे आवाहन केले.

कोल्हापूर : कोणत्याही परिस्थितीमध्ये लोकसभेला जिंकण्यासाठी बूथ, शक्ती केंद्र, संपर्क आणि प्रवास यांवर भाजप नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी संपूर्ण लक्ष केंद्रित करावे. मी दीड महिन्याने पुन्हा येणार असून यावेळी सर्व तयारी झालेली हवी, असे सांगत भाजपचे नेते केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी रविवारी संध्याकाळी भाजप कार्यकर्त्यांचा तास घेतला.भाजपची जाहीर सभा झाल्यानंतर शेजारीच असलेल्या भाजपच्या नूतन कार्यालयामध्ये त्यांनी सुमारे ३५ मिनिटे कार्यकर्त्यांशी संवाद साधला. ‘बूथ जिता, तो चुनाव जिता’ असे सांगून शाह यांनी यावेळी निवडणूक जिंकण्यासाठी आवश्यक गोष्टींचा ऊहापोह करताना अल्पसंख्याक समाजाशी संपर्क वाढवणे, त्यांना शासनाच्या योजना सांगणे, त्यांचा लाभ मिळवून देणे आणि शासकीय योजना सर्व जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी प्रयत्न करण्याचे आवाहन केले.शाह म्हणाल्या, कृषिसेवा संस्था स्थापन करण्यासाठी भाजप कार्यकर्त्यांनी लक्ष द्यावे. त्या माध्यमातून घराघरांपर्यंत पोहोचण्यासाठी प्रयत्न करा. संपर्कासाठी कोणत्याही परिस्थितीत कमी पडू नका.लोकसभा प्रवास योजनेचे संयोजन बाळा भेगडे यांनी स्वागत केले. यावेळी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, मंत्री चंद्रकांत पाटील, खासदार धनंजय महाडिक, शिवप्रकाश, मकरंद देशपांडे, आमदार गोपीचंद पडळकर, सुरेश हाळवणकर, समरजित घाटगे, राहुल चिकोडे, नाथाजी पाटील, विठ्ठल पाटील यांच्यासह भाजपचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते. त्याआधी उत्तम कांबळे आणि प्रा. शहाजी कांबळे यांनी शहा यांचे स्वागत केले.उभे करून विचारणायावेळी शाह यांनी शाहूवाडी मतदारसंघातील मंडल अध्यक्ष सचिन शिपुगडे यांना उभे करून बूथविषयक माहिती विचारली व त्यांच्याकडून खातरजमा करून घेतली.युवकाचा गोंधळशाह यांची बैठक आत सुरू असताना बाहेर रस्त्यावर त्यांना भेटण्यासाठी आलेल्या सांगली जिल्ह्यातील वांगी येथील एका युवकाने आपल्यावर अन्याय झाल्याचे सांगत आरडाओरडा सुरू केला. तो सध्या वाघोली येथे राहतो. मात्र त्याला पोलिसांनी तातडीने बाजूला नेले.शाह रवाना, फडणवीसांचा मुक्कामया बैठकीनंतर शाह हे विमानाने दिल्लीला रवाना झाले; तर फडणवीस हे भोजनासाठी खासदार महाडिक यांच्या घरी गेले. तेथून ते हॉटेलवर परतले. या ठिकाणी गायिका पद्मजा फेणाणी-जोगळेकर यांनी त्यांची सदिच्छा भेट घेतली.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरAmit Shahअमित शाहBJPभाजपाElectionनिवडणूक