Kolhapur: व्यासपीठावर बसणाऱ्यांनीच पाठीत खंजीर खुपसला, नंदिनी बाभूळकरांचा ‘मविआ’तील विरोधकांवर घणाघात
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 30, 2025 18:49 IST2025-07-30T18:48:07+5:302025-07-30T18:49:55+5:30
गद्दारांशी पुन्हा संगत नको !

Kolhapur: व्यासपीठावर बसणाऱ्यांनीच पाठीत खंजीर खुपसला, नंदिनी बाभूळकरांचा ‘मविआ’तील विरोधकांवर घणाघात
गडहिंग्लज : इंडिया आघाडी, महाविकास आघाडी म्हणणाऱ्यांनी विधानसभा निवडणुकीत आमच्यासोबत, आमच्या व्यासपीठावर राहून ज्यांनी आमच्या पाठीत खंजीर खुपसला. मी कांही मदर टेरेसा नाही, त्यांना कुठेही थारा मिळू देणार नाही, असा इशारा डॉ. नंदिनी बाभूळकर यांनी दिला.
कानडेवाडी येथे राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष कार्यकर्त्यांच्या बैठकीत त्या बोलत होत्या. लोकसभा निवडणुकीत शाहू छत्रपती यांच्या विजयासाठी आपण जीवाचे रान केले. मात्र, आमची वेळ आल्यावर कांहीही कारण नसताना ते विरोधात गेले, त्यांना त्यांची जागा दाखवल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला.
बाभूळकर म्हणाल्या, अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत विधानसभेला आपण ५० हजार मते घेतली, असेच एकसंघ राहिलो तर नवे कार्यकर्ते जोडले जातील. जि. प. व पं. स. निवडणुकीत आपल्या कार्यकर्त्यांना नक्कीच यश मिळेल.
यावेळी आजरा साखर कारखान्याचे अध्यक्ष मुकूंद देसाई, ‘गोकुळ’चे माजी संचालक रामराज कुपेकर, उदय जोशी, अमर चव्हाण, दशरथ कुपेकर, राजेश पाटील-औरनाळकर, शिवाजी सावंत, शिवाजी माने, नारायण चव्हाण, मल्लिकार्जून तेली, कार्तिक कोलेकर, अनिल पाटील यांचीही भाषणे झाली.
बैठकीस बाळासाहेब कुपेकर, शिवप्रसाद तेली, बी. डी. पाटील, अशोक पाटील, तानाजी शेंडगे, हसन बाणदार, राकेश पाटील, गणेश फाटक आदींसह चंदगड, गडहिंग्लज व आजरा तालुक्यातील प्रमुख कार्यकर्ते उपस्थित होते.
गद्दारांशी पुन्हा संगत नको !
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांसह गोकुळ व जिल्हा बँकेच्या निवडणुकीत कुणासोबत जायचे? यासंबंधीचा निर्णय घेण्याचे सर्वाधिकार नंदाताईंनाच देण्याचा निर्णय बैठकीत झाला. कुणाशीही युती करा. परंतु, विधानसभेला गद्दारी करणाºयांशी पुन्हा संगत नको, असा सल्लाही कांही कार्यकर्त्यांनी यावेळी दिला.