शहरं
Join us  
Trending Stories
1
अजितदादांचा आत्मविश्वास दुणावला; पहिल्यांदाच सांगितला सुनेत्रा पवारांच्या मताधिक्याचा आकडा!
2
'डिप्रेशनमध्ये मी तेव्हा आयुष्य संपवून टाकणार होतो'; जो बायडेन यांचा धक्कादायक खुलासा
3
अरविंद केजरीवाल यांनी सर्वोच्च न्यायालयात सादर केले ५३ पानी उत्तर, EDच्या आरोपांचा घेतला समाचार
4
' माझी कामं स्वतःच्या प्रचार पुस्तिकेत छापली'; सुप्रिया सुळेंची नक्कल करत अजित पवारांची टीका
5
सिट्रॉएन, महिंद्रानंतर होंडाची बारी; अमेझला 2019 मध्ये 4 स्टार, 2024 मध्ये दोन स्टार
6
T20 WC 2024: हर्षा भोगलेंनी निवडला भारतीय संघ; KL राहुलला वगळलं, नव्या चेहऱ्यांना संधी
7
"शिवरायांच्या गादीविरोधात प्रचार करण्यासाठी मोदी कोल्हापुरात’’, संजय राऊत यांची बोचरी टीका 
8
रत्नागिरी: प्रचार ऐन रंगात आला, अन् ठाकरेंच्या जिल्हा प्रमुखाला तडीपारीची नोटीस
9
FD Vs NSC: नॅशनल सेव्हिंग सर्टिफिकेट की ५ वर्षांची एफडी; ₹२ लाखांच्या गुंतवणूकीवर कुठे जास्त फायदा?
10
ऑनलाइन केक मागवला पण OTP देणे पडले महागात; खाते झाले रिकामे, नेमकं झालं काय?
11
काँग्रेसचा प्रचार यापुढे करणार नाही, नसीम खान यांची घोषणा; मुंबईत काँग्रेसला आणखी एक धक्का!
12
Crypto Investment : लोकांमध्ये पुन्हा Cryptocurrency ची क्रेझ, का वाढतंय आकर्षण?
13
'विशाल पाटलांबाबतची खेळी जयंत पाटलांकडून'; भाजपच्या माजी आमदाराचा खळबजनक दावा
14
एकनाथ शिंदेच जणू! महेश मांजरेकरांच्या 'जुनं फर्निचर' मधील या अभिनेत्याला ओळखलंत का?
15
Vastu Shastra: पाण्याचा माठ, टाकी घराच्या 'या' दिशेला असेल तर; पाण्यासारखा वाया जाईल पैसा!
16
शाहू महाराज एका पक्षाच्या दावणीला बांधले गेले; मोदींच्या सभेपूर्वी राजेश क्षीरसागरांचा हल्लाबोल
17
Tarot Card: केलेल्या मेहनतीचे फळ मिळण्याचा काळ; टॅरो कार्डच्या मदतीने वाचा साप्ताहिक भविष्य!
18
Virat Kohli ने ३ नंबर 'या' फलंदाजासाठी सोडावा, स्वत: चौथ्या क्रमांकावर बॅटिंगला यावं, Harbhajan Singh चा सल्ला
19
इथे २८७ धावाही Safe नाहीत! गोलंदाजांची केविलवाणी अवस्था, भारताला कसा सापडणार 'बॉलिंग'स्टार?
20
राहुल गांधींच्या DNA वर प्रश्नचिन्ह उपस्थित करत आक्षेपार्ह टीका करणाऱ्या LDF च्या आमदारावर गुन्हा दाखल

पाण्याचा वेढा पडणाऱ्या गावांच्या मदतीसाठी यंत्रणा तयार ठेवा : रेखावार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 20, 2021 6:33 PM

Kolhapur Flood collcator : सध्या जिल्ह्यात पाऊस चांगला होत असून अतिवृष्टी व पूरपरिस्थिती निर्माण झाल्यास पाण्याचा वेढा पडण्याची शक्यता असलेल्या गावांना मदत पोहोचवण्यासाठी गावनिहाय आराखडा तयार ठेवा. बाधित होणाऱ्या गावांतील नागरिकांना आधीच सुचना द्या, त्यांच्यासाठी पुरेसे अन्नधान्य व औषधसाठा उपलब्ध ठेवा, एकही जनावर वाहून जाऊ नये असे काटेकोर नियोजन करा, छावणीतील जनावरांसाठी पुरेसे पशुखाद्य, ओला व सुका चारा, औषधसाठा तयार ठेवा अशा सुचना जिल्हाधिकारी राहूल रेखावार यांनी मंगळवारी दिल्या.

ठळक मुद्देपाण्याचा वेढा पडणाऱ्या गावांच्या मदतीसाठी यंत्रणा तयार ठेवा : रेखावार संभाव्य पुरस्थिती आढावा बैठकीत सुचना

कोल्हापूर : सध्या जिल्ह्यात पाऊस चांगला होत असून अतिवृष्टी व पूरपरिस्थिती निर्माण झाल्यास पाण्याचा वेढा पडण्याची शक्यता असलेल्या गावांना मदत पोहोचवण्यासाठी गावनिहाय आराखडा तयार ठेवा. बाधित होणाऱ्या गावांतील नागरिकांना आधीच सुचना द्या, त्यांच्यासाठी पुरेसे अन्नधान्य व औषधसाठा उपलब्ध ठेवा, एकही जनावर वाहून जाऊ नये असे काटेकोर नियोजन करा, छावणीतील जनावरांसाठी पुरेसे पशुखाद्य, ओला व सुका चारा, औषधसाठा तयार ठेवा अशा सुचना जिल्हाधिकारी राहूल रेखावार यांनी मंगळवारी दिल्या.जिल्हाधिकारी कार्यालयातील ताराराणी सभागृहात आयोजित संभाव्य पूरपरिस्थितीच्या आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजयसिंह चव्हाण, निवासी उपजिल्हाधिकारी भाऊ गलांडे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता संभाजी माने, महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त नितीन देसाई, पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता रोहित बांदिवडेकर, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी प्रसाद संकपाळ तसेच विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.जिल्हाधिकारी रेखावार म्हणाले, पावसाळ्याच रस्ते व पूल पाण्याखाली जाऊन वाहतुकीला अडथळा होतो, त्या परिस्थितीतही काही नागरिक पूल ओलांडण्याचा प्रयत्न करतात व अपघाताची शक्यता असते त्यामुळे पुराचे पाणी आलेले रस्ते बॅरिकेटस लावून बंद करावेत, व वाहतूक पर्यायी मार्गाने वळवावी. जिल्ह्यातील पाझर तलाव सुस्थितीत असल्याची खात्री करा.

महावितरण विभागाने आवश्यक साहित्याची देखभाल, दुरुस्ती करुन घ्यावी. गरजेनुसार मनुष्यबळ व अधिकचे साहित्य तयार ठेवावे. अतिवृष्टी व वादळी वाऱ्यामुळे वीज पुरवठा खंडित झाल्यास त्वरित वीज पुरवठा पूर्ववत करण्यासाठी आवश्यक साधनसामग्री व मनुष्यबळ तयार ठेवा.पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे म्हणाले, पुरबाधित गावात महसूल, पोलीस, आरोग्य व अन्य संबंधित विभागांनी समन्वयाने काम करावे. मुख्य कार्यकारी अधिकारी संजयसिंह चव्हाण यांनी आपत्कालीन परिस्थितीत नागरिकांना लगेच मदत मिळवून देण्याच्या दृष्टीने जिल्हा परिषदेच्या विविध विभागांनी केलेल्या तयारीची माहिती दिली.

आपत्ती व्यवस्थापन अधिकारी प्रसाद संकपाळ यांनी जिल्हा प्रशासनाच्यवतीने करण्यात येत असलेल्या तयारीची माहिती दिली. तसेच महसूल, सार्वजनिक बांधकाम, जलसंपदा, आरोग्य, कृषी, महानगरपालिका, जिल्हा परिषद, महावितरण, महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ, बीएसएनएलच्या अधिकाऱ्यांनी आपापल्या विभागाने केलेल्या तयारीची सादरीकरणाद्वारे माहिती दिली. 

टॅग्स :Kolhapur Floodकोल्हापूर पूरcollectorजिल्हाधिकारीkolhapurकोल्हापूर