शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
2
Pahalgam Terror Attack: सरकारने पाकिस्तानला सडेतोड उत्तर द्यावं, पण कुठलाही निर्णय घेताना...; शरद पवार यांनी मांडले स्पष्ट मत
3
शरद पवारांच्या विधानावर CM फडणवीसांचं प्रत्युत्तर, म्हणाले- "ज्यांचे आप्तेष्ट मारले गेले..."
4
पर्यटकांना वाचवताना जीव गमावला; काश्मिरी युवकाच्या कुटुंबाला DCM शिंदेकडून ५ लाखांची मदत
5
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
6
शनिवारी शिवरात्रि स्वामी पुण्यतिथी: ५ राशींनी ‘हे’ करा, साडेसातीत दिलासा; शनिची कायम कृपा!
7
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
8
Swami Samartha: स्वामीकृपा झाल्यावर आपल्या आयुष्यात 'हे' बदल घडतात; तुम्हीदेखील अनुभवले का?
9
भारताच्या कारवाईने पाक सैन्य घाबरले; लष्करप्रमुखाचे कुटुंब खाजगी विमानाने देश सोडून पळाले
10
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
11
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...
12
दिवसभर उड्या मारतात, एका जागी बसतंच नाहीत... हायपर एक्टिव्ह मुलांशी नेमकं वागायचं तरी कसं?
13
ऐतिहासिक कामगिरीच्या उंबरठ्यावर सीएसकेचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी, एलिट लिस्टमध्ये सामील होणार
14
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
15
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
16
पहलगाम हल्ल्याचा बाजारावरही परिणाम; ९ लाख कोटींचे नुकसान, अदानी पोर्टसह 'हे' शेअर्स आपटले
17
पीएसएलमध्ये काम करणाऱ्या सर्व भारतीयांना ४८ तासांत पाकिस्तान सोडण्याचे आदेश!
18
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
19
१ वर्ष एटीएम कार्ड वापरण्यासाठी बँक किती चार्ज घेते? 'या' कार्डवर द्यावे लागत नाही पैसे
20
अमित शाहांची सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबत बैठक, पाकिस्तानी नागरिकांबद्दल दिला महत्त्वाचा आदेश

हसन मुश्रीफ गोरगरिबांच्या कल्याणासाठी झटले-शिवलिंगेश्वर महास्वामीजी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 7, 2019 23:32 IST

गेल्या पस्तीस ते चाळीस वर्षांच्या सामाजिक जीवनात आमदार हसन मुश्रीफ हे गोरगरिबांच्या कल्याणासाठी झटले, असे प्रतिपादन निडसोशी मठाचे अधिपती श्री शिवलिंगेश्वर महास्वामीजी यांनी केले. बेलेवाडी काळम्मा-धामणे ( ता. कागल) येथील सरसेनापती संताजी घोरपडे

ठळक मुद्देसरसेनापती कारखान्यात कलशारोहण, मिल रोलर पूजन उत्साहातपवित्र योगायोग.....

सेनापती कापशी : गेल्या पस्तीस ते चाळीस वर्षांच्या सामाजिक जीवनात आमदार हसन मुश्रीफ हे गोरगरिबांच्या कल्याणासाठी झटले, असे प्रतिपादन निडसोशी मठाचे अधिपती श्री शिवलिंगेश्वर महास्वामीजी यांनी केले. बेलेवाडी काळम्मा-धामणे ( ता. कागल) येथील सरसेनापती संताजी घोरपडे साखर कारखान्याच्या कार्यस्थळावर आयोजित विविध कार्यक्रमात ते बोलत होते.

यावेळी शिवलिंगेश्वर महास्वामीजींसह अलिबागचे राहुलजी पिंपळे महाराज यांच्या हस्ते कार्यस्थळावर बांधलेल्या श्री शिव दत्त मंदिराचा कलशारोहण सोहळा व मिल रोलर पूजन उत्साहात झाले. या संयुक्त कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आमदार हसन मुश्रीफ होते.

शिवलिंगेश्वर महास्वामी पुढे म्हणाले, आमदार मुश्रीफ यांचे राजकीय जीवन असो, सामाजिक कारकीर्द असो, कौटुंबिक जीवन असो, की या साखर कारखान्याच्या माध्यमातून केलेले शेतकऱ्यांच्या कल्याणाचे कार्य असो, त्यांची उभी हयातच लोकसेवेने भरलेली आहे. या पुण्याईच्या जोरावर त्यांची विजयी घोडदौड सदैव राहील.

आमदार हसन मुश्रीफ म्हणाले, गेल्या पाच वर्षांत या कारखान्याने घेतलेली गरुडझेप महाराष्ट्रासह अखंड देशात कौतुकास्पद अशीच आहे.ते पुढे म्हणाले, वयाच्या २५व्या वर्षापासून समाजकारणात एक पणती बनून कार्यरत राहिलो. जनतेच्या पाठबळावर या पणतीची पुढे मशाल झाली. यापुढेही जनतेच्या आशीर्वादाने ही पणती लोककल्याणासाठी सदैव तेवत राहील.

अध्यक्ष नवीद मुश्रीफ यांनी स्वागत केले. जनरल मॅनेजर महेश जोशी यांनी प्रास्ताविक केले. आभार लेबर आॅफिसर संतोष मस्ती यांनी मानले. विशाल बेलवळकर यांनी सूत्रसंचालन केले.यावेळी व्यासपीठावर जिल्हा परिषद सदस्य युवराज पाटील,सतीश पाटील-गिजवणेकर, मनोज भाऊ फराकटे, सूर्याजी घोरपडे, शशिकांत खोत, आदी प्रमुख उपस्थित होते.पवित्र योगायोग.....भाषणात प्रताप ऊर्फ भैया माने म्हणाले, कालच शिवजयंतीचा दिवस होता. आज साडेतीन मुहूर्तांपैकी उत्कृष्ट मुहूर्त अक्षय तृतीया आहे. तसेच बसवेश्वर जयंती आणि मुस्लिम समाजाचा पवित्र रमजान महिन्याची सुरुवातही आज होत आहे. कार्यस्थळावरील श्री शिव दत्त मंदिराचे कलशारोहण होत आहे, हा सुद्धा पवित्र योगायोगच आहे. 

टॅग्स :Hassan Mianlal Mushrifहसन मियांलाल मुश्रीफpoojaपूजा