शहरं
Join us  
Trending Stories
1
Pune Accident: टपरीवर चहा पिणाऱ्या १२ विद्यार्थ्यांना भरधाव कारने उडवले; पुण्याच्या सदाशिव पेठेतील घटना
2
सायरन वाजला, स्ट्रेचरवर लोकांना आरोग्य कर्मचारी घेऊन जाऊ लागले; पाकिस्तानच्या सीमेजवळ असलेल्या राज्यांमध्ये मॉक ड्रिल
3
तिघांची एकत्र चौकशी करायची आहे; निलेशसहीत सासरा, दीर यांनाही ३ जूनपर्यंत पोलीस कोठडी
4
'आम्ही त्यांना बोलावले नाही, शाहिद आफ्रिदी अन् उमर गुल स्वतःहून आले'; आयोजकांनी मागितली माफी
5
IPL 2025 Orange Cap Race : जे विराटला जमणार नाही ते सूर्याला सहज शक्य होईल, पण...
6
मामाच्या नावाने हगवणेंनी स्वतःचे खिसे भरले; कस्पटेंकडून रुखवतासाठी १ लाखांचा चेक अन् ५० हजार घेतले
7
Shubman Gill: हार्दिकसोबत मतभेद झाल्याच्या चर्चांवर गिलने सोडले मौन; इंस्टाग्राम स्टोरीमध्ये लिहिले...
8
IPL Qualifier 2: आतापर्यंत फक्त ४ फलंदाजांनी साधलाय 'शतकी' डाव!
9
बापरे! मॅरेज ब्युरो चालवणाऱ्या महिलेने क्लाएंटसोबत लावलं स्वत:च्या नवऱ्याचं लग्न, घेतले ७ लाख
10
जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती एलॉन मस्क यांचे वडील अयोध्येत येणार; राम लल्लांचे दर्शन घेणार
11
पोहताना दमछाक होऊन ४ शाळकरी मुलांचा तळ्यात बुडून मृत्यू; नातेवाईकांनी फोडला टाहो, चाकणमधील घटना
12
अवघ्या ३१ व्या वर्षी बॉलिवूड अभिनेत्याने केली होती आत्महत्या, गर्लफ्रेंडला पोलिसांनी ठोकलेल्या बेड्या
13
Viral Video: ढोल- ताशाच्या तालावर महिलांचा हटके डान्स, थेट जमिनीवर लोळल्या; व्हिडीओ व्हायरल!
14
राहुल गांधींना धक्का, मानहानीच्या खटल्यात ती मागणी करणारी याचिका कोर्टाने फेटाळली
15
पुन्हा थैमान घालणार कोरोना? देशभरात 24 तासांत 685 नवे रुग्ण, 4 जणांचा मृ्त्यू; सक्रिय रुग्णांचा आकडा 3395 वर!
16
...अन् पोलिसवाल्यानं भरून काढली 'आर्मी मॅन'ची कमी! कोण आहे भालाफेकमधील भारताचा नवा 'बाहुबली'?
17
पाकिस्तानने भारताची ६ लढाऊ विमाने पाडली? सीडीएस अनिल चौहान यांनी सगळंच सांगितलं
18
Devendra Fadnavis : "अहिल्यादेवी होळकर यांच्या जीवनावर चित्रपट तयार करणार"; देवेंद्र फडणवीसांची मोठी घोषणा
19
भाजपाकडून राज्यातील उर्वरित जिल्हाध्यक्षांची घोषणा, २२ नेत्यांकडे महत्त्वपूर्ण जबाबदारी 
20
'लँड फॉर जॉब' प्रकरणी लालू प्रसाद यादवांना झटका! दिल्ली उच्च न्यायालयाने कारवाईला स्थगिती देण्यास नकार दिला

Gokul Milk : 'गोकुळ'मधील पेच सुटला; अध्यक्षपदी हसन मुश्रीफांचे चिरंजीव नाविद मुश्रीफ यांची निवड

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 30, 2025 16:08 IST

Gokul Milk : नविद मुश्रीफ यांच्या नावाला अंतर्गत विरोध करण्यात आला होता. पण आता अध्यक्षपदासाठी त्यांच्याच नावावर शिक्कामोर्तब करण्यात आला आहे.

Gokul Milk : मागील काही दिवसांपासून कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ अर्थात 'गोकुळ'च्या अध्यक्षपदाची राजकीय वर्तुळात चर्चा सुरू आहे. राज्याच्या वरिष्ठ नेत्यांनी हस्तक्षेप केल्यामुळे पेच निर्माण झाला होता. दरम्यान, आता गोकुळच्या अध्यक्षपदाचा पेच सुटला आहे. वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांचे चिरंजीव गोकुळ संचालक नाविद मुश्रीफ यांची अध्यक्षपदी निवड करण्यात आली.

बिहारमध्ये आश्रय मिळेना म्हणून दिल्लीत थाटला संसार; ३८ बांगलादेशी घुसखोर पोलिसांच्या ताब्यात

नाविद मुश्रीफ यांच्या नावाला अंतर्गत विरोध करण्यात आला होता. पण आता अध्यक्षपदासाठी त्यांच्याच नावावर शिक्कामोर्तब करण्यात आला आहे. काही दिवसांपासून गोकुळचे संस्थापक आनंदराव पाटील चुयेकर यांचे चिरंजीव शशिकांत पाटील चुयेकर यांच्या नावाची चर्चा सुरू होती. पण, मधल्या काळात झालेल्या राजकीय हालचालींमुळे आता मुश्रीफ यांचे नाव समोर आले.  गुरुवारी जिल्हा बँकेच्या अध्यक्षांच्या दालनामध्ये अडीच तास बैठक झाली. या बैठकीमध्ये नेत्यांनी चर्चा करत यामध्ये नाव ठरवत बंद लिफाफ्यातून ज्येष्ठ संचालक माजी अध्यक्ष विश्वास पाटील यांच्याकडे ते नाव सुपूर्द केले होते.तो लिफाफा आज खोलण्यात आला. यानंतर नाविद मुश्रीफ यांची अध्यक्षपदी निवड झाल्याचे जाहीर करण्यात आले. 

वरिष्ठ नेत्यांचा हस्तक्षेप

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा निरोप आल्यानंतरच राजीनामा देऊ, अशी भूमिका अरुण डोंगळे यांनी घेतली होती. तर,  मंगळवारी मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांना भेटून वस्तुस्थिती सांगू व डोंगळेंसह सगळ्यांना मान्य होईल असा अध्यक्षपदाचा चेहरा ठरवल्याचेही मंत्री मुश्रीफ यांनी सांगितल्याने ‘तो’ चेहरा कोण? याविषयी उत्सुकता लागली होती. महायुती म्हणून अध्यक्षपदासाठी ज्येष्ठ संचालक विश्वास पाटील, अजित नरके, नविद मुश्रीफ, प्रा. किसन चौगले यांच्या नावाची चर्चा होती. विश्वास पाटील हे इच्छुक नाहीत, तर ‘नाविद’ अध्यक्ष होणार नाही, हे मंत्री मुश्रीफ यांनी स्पष्ट केले होते.  

टॅग्स :Gokul Milkगोकुळkolhapurकोल्हापूर