इचलकरंजी : पुढील निवडणुका बॅलेट पेपरवर होणार असल्याचे आमदार राहुल आवाडे यांनी जाहीर केले आहे. कोणताही भक्कम आधार नसताना केलेले हे विधान म्हणजे आमदार निवडणूक आयुक्त झाले की काय, असा प्रश्न शहरवासीयांना न पडेल तर नवलच, अशी टीका काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस शशांक बावचकर यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केली आहे.पत्रकात, आमदार आवाडे यांनी मतचोरी व मतचोरीचे प्रकार समजून घ्यावेत व यातील विधानसभा निवडणुकीत कोणते प्रकार अवलंबले गेले, याचे आत्मपरीक्षण करावे. नव्याने ६ जलकुंभ उभारून तो पंचगंगेचे बळकटीकरण करून शहराचा पाणीप्रश्न व पाणीटंचाई म्हणजे भूतकाळ ठरेल, असे सांगणे हास्यास्पद आहे. केवळ शासनाने मंजूर केलेल्या सुळकूड योजनेला बगल देण्याचे कारस्थान आहे. दोन वर्षांपूर्वी तत्कालीन आमदारांनी दसरा मेळाव्यात शहराला दररोज पाणी देण्याची घोषणा केली होती. त्याचा जाब नागरिकांनी विचारला, तर या विषयाचे भांडवल केले जाते, असे लोकप्रतिनिधींना वाटते. यापुढे केवळ विकासाच्या भूलथापा देऊन जनतेची दिशाभूल करण्याऐवजी मूळ प्रश्नांची सोडवणूक करावी. महापालिकेच्या माध्यमातून चाललेला भ्रष्टाचार थांबवावा, असे म्हटले आहे.
Web Summary : Shashank Bawachkar criticizes MLA Awade's ballot paper announcement, questioning his authority. He urges introspection on past election malpractices and accuses Awade of undermining the Sulkud water scheme with new promises.
Web Summary : शशांक बावचकर ने विधायक आवाडे की बैलेट पेपर घोषणा की आलोचना की और उनकी प्रामाणिकता पर सवाल उठाया। उन्होंने पिछले चुनाव में कदाचार पर आत्मनिरीक्षण करने और नए वादों के साथ सुलकूद जल योजना को कमजोर करने का आरोप लगाया।