शहरं
Join us  
Trending Stories
1
मस्साजोगमध्ये धक्कादायक निकाल, सरपंचपदाच्या पोटनिवडणुकीत संतोष देशमुख यांच्या पत्नीचा पराभव
2
Top Marathi News LIVE Updates: उत्तर प्रदेशात अग्नितांडव! ८ फ्लॅट्स जळून खाक; आग विझवण्याचे प्रयत्न सुरू
3
वादग्रस्त 'VSR'च्या विमानातून पार्थ पवारांचा प्रवास; वाद वाढताच म्हणाले, "अशी चूक पुन्हा होणार नाही"
4
Suvendu Adhikari : "TMC कडून बोगस मतदानासाठी ७५० खोट्या बोटांची खरेदी"; सुवेंदु अधिकारींचा गंभीर आरोप
5
VIDEO: बापरे... प्रियांश आर्याचा षटकार थेट चाहत्याच्या तोंडावर आदळला, वाहू लागली रक्ताची धार
6
अधिक मास २०२६: मे मध्ये सुरू होणार अधिक मास तथा धोंड्याचा महिना; खगोलशास्त्राच्या नजरेतून पाहा 
7
Summer Vacation 2026: ट्रॅव्हलिंगदरम्यान दिसायचंय स्टायलिश आणि राहायचंय कम्फर्टेबल? पॅकिंग करताना 'या' ५ मस्ट हॅव अॅक्सेसरिज विसरू नका
8
जखमी पतीला रुग्णालयात नेण्यासाठी मागितले पैसे, नंतर पत्नीकडून रुग्णवाहिकाही स्वच्छ करून घेतली
9
Mira Road Stabbing Case: घरातल्यांनी हाकललं, बायकोनंही सोडलं; आरोपी Zaib Zuber याच्या आयुष्यात याआधी काय घडलं?
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीचे दर वाढले; लग्नसराईच्या काळात आज चांदी ११०० रुपयांनी महागली, सोन्याचे नवे दर काय?
11
एक गोळीबार अन् उडाली ‘व्हाइट हाउस’ची झोप; सत्तारचनेत 'डेझिग्नेटेड सर्व्हायव्हर' म्हणजे काय?
12
Video - EVM मध्ये बिघाड झाल्याने मतदार संतापले; भाजपा नेत्यावर हल्ला, केला लाठीचार्ज
13
पंजाबविरुद्धच्या लढतीदरम्यान ड्रेसिंग रूमध्येच केलं स्मोकिंग, रियान पराग अडचणीत, व्हिडीओ व्हायरल
14
अनिल अंबानींच्या ३०३४ कोटींच्या संपत्तीवर टाच; फ्लॅटपासून ते फार्महाऊस पर्यंत काय काय जप्त?
15
महिलांना तालावर नाचायला लावणाऱ्या औषधाबाबत गूढ; भोंदू खरात नेमकं काय प्यायला द्यायचा?
16
शेअर बाजाराची ग्रीन झोनमध्ये सुरुवात, सेन्सेक्स ३५० अंकांनी, तर निफ्टी १०० अंकांनी वधारला, 'या' शेअर्सवर आज नजर
17
ओपेक'मध्ये फूट! सौदीशी पंगा आणि इराणचा धोका; संयुक्त अरब अमिरातीने का सोडली जगाची 'तेल संघटना'?
18
PSL 2026: बाबर आझमचे वादळी शतक! तब्बल ७ वर्षांनी केला पुन्हा 'तो' पराक्रम; संघही फायनलमध्ये
19
India Heatwave Alert: उष्णतेचा दुहेरी तडाखा! दिवस आणि रात्रीही लाहीलाही; हवामान विभागाने दिला मोठा इशारा
20
डिजिटल पेमेंट, ट्रान्झॅक्शन, म्युच्युअल फंड.., १ मे पासून काय काय बदलणार? तुमच्या खिशावर होणार थेट परिणाम
Daily Top 2Weekly Top 5

हरळी बुद्रकचा नीलेश राज्यात पहिला

By admin | Updated: December 3, 2014 00:31 IST

उत्तूरचा राहूल द्वितीय : ‘पाणलोट क्षेत्र विकास’अंतर्गत शालेय चित्रकला स्पर्धा

कोल्हापूर : राज्य कृषी विभाग पाणलोट क्षेत्र विकास चळवळींतर्गत आयोजित शालेय चित्रकला स्पर्धेत प्राथमिक गटात नीलेश विनायक कांबळे (सिम्बायोसिस स्कूल, हरळी बुद्रुक, ता. गडहिंंग्लज) याने राज्यस्तरीय पहिल्या क्रमांकाचे साडेसात हजारांचे बक्षीस पटकाविले. शाहू स्मारक येथे आज, मंगळवारी हा बक्षीस वितरणाचा कार्यक्रम झाला. यावेळी सुधर्म जामसांडेकर यांची प्रमुख उपस्थिती होती. माध्यमिक गटातील साडेसात हजारांचे द्वितीय क्रमांकाचे बक्षीस राहुल निवृत्ती कोकितकर (उत्तूर विद्यालय, उत्तूर, ता. आजरा) याला देण्यात आले. प्राथमिक गटात जिल्हास्तरावर तेजस भगवान कांबळे (केंद्रीय शाळा शिवारे माणगाव, ता. शाहूवाडी), अथर्व रणधीर जाधव (आदर्श गुरुकुल विद्यालय, पेठवडगाव, ता. हातकणंगले), ओम सुनील शिंदे (सानेगुरुजी विद्यामंदिर, कुरुंदवाड, ता. शिरोळ) यांना अनुक्रमे २०००, १०००, ५०० रुपयांचे रोख बक्षीस दिले. माध्यमिक गटातील विजेते नीलेश विनायक कांबळे (सिम्बायोसिस स्कूल, हरळी बुद्रुक), प्राची विवेक देसाई (कुमार भवन, कडगाव, ता. भुदरगड), श्रेयस दीपक नागावकर (आदर्श विद्यानिकेतन, मिणचे, ता. हातकणंगले) यांना अनुक्रमे ४०००, २५००, १५०० रुपयांचे बक्षीस देण्यात आले. सुलेखा भिसे यांच्या इशस्तवनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली. सुशीला सांस्कृतिक मंडळाने ‘पाणी वाचवा, प्रदूषण थांबवा’, ‘शेतीचा अभिमान बाळगा’ या विषयांवर प्रबोधनात्मक कार्यक्रम सादर केले. कांचनताई परुळेकर यांनी स्पर्धेची माहिती दिली. डॉ. नंदकुमार कदम, एन. एस. परीट यांचे भाषण झाले. कार्यक्रमात जिल्ह्णातील ८४ विद्यार्थ्यांना ४५ हजारांची बक्षिसे देण्यात आली. रोटरी क्लब आॅफ सनराईजने सर्व विजेत्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप केले. कृषी विभागाचे अधिकारी, कर्मचारी, शिक्षक, विद्यार्थी, पालक उपस्थित होते. (प्रतिनिधी)