शहरं
Join us  
Trending Stories
1
“उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांसोबत केले, तेच आदित्य करताहेत”; शिंदेंच्या नेत्यांनी इतिहास काढला
2
Latest Marathi News LIVE Updates: भीषण अपघात! पंजाबमध्ये भाविकांनी भरलेली बस उलटली
3
Heatwave Alert: सावधान...! उष्णतेच्या लाटेसारखी स्थिती; विदर्भात ४२, मराठवाडा, मध्य महाराष्ट्रात ३८-४० तर कोकणात ३४-३६ अंश सेल्सिअसची नोंद
4
"तर महाराष्ट्राला मोठी किंमत चुकवावी लागेल"; विजय वडेट्टीवार यांचा महायुतीला सूचक इशारा
5
'या' दिग्गज टेक कंपनीकडून भारतीय कर्मचाऱ्यांना मोठं गिफ्ट: ५ लाखांपासून १ कोटीपर्यंत मिळणार बोनस
6
आता प्रवासावेळी टायर फाटलं तरी टेन्शन नाही...! या नव्या SUV ची जोरदार चर्चा; फीचर्सही भन्नाट
7
Home Decoration: मातीची गरज नाही, फक्त हवी काचेची बरणी आणि रोपटं! 'वॉटर गार्डनिंग'ने बदला घराचा लूक
8
छ. संभाजीनगर, वाठार, पेठवडगाव, जयसिंगपूर ४ बस स्थानकांचे उद्घाटन; प्रताप सरनाईकांचा दौरा
9
पाकिस्तान कोणता खेळ खेळतंय? इराण युद्ध काळात तुर्की, सौदी अन् कतारला चाललेत PM शहबाज शरीफ
10
'देखणी नवरी मिळेल' सांगितलं अन् ७ हजार जणांना लुटलं; लोकांना फसवणाऱ्या मॅट्रिमोनियल साईटचा असा झाला गेम!
11
अमरावतीत 'योगी स्टाईल' कारवाई! अश्लील व्हिडीओ प्रकरणातील आरोपी अयानला दणका, घरावर बुलडोझर
12
होर्मुझनंतर आता 'मलक्का'वर अमेरिकेची नजर; ट्रम्प यांची नवी खेळी! भारतासाठी ठरणार गेमचेंजर?
13
“सुनेत्रा काकींना ९९% मतदान होईल, अजितदादांना स्मरून मतदान करा”; रोहित पवार प्रचाराला लागले
14
आदित्य ठाकरे आता उद्धवसेनेचे कार्याध्यक्ष होणार?; संजय राऊतांचे सूचक विधान, चर्चांना उधाण
15
कोविड लसींच्या सक्तीमुळे शेन वॉर्नचा मृत्यू, मुलाचा खळबळजनक दावा
16
Vastu Tips: घरात ठेवलेली रोपं केवळ शोभेची वस्तू नाहीत, ती निर्माण करतात 'लाईव्ह एनर्जी'; वाचा वास्तू रहस्य
17
चीनला इराणकडून तेल खरेदी करू देणार नाही; ट्रम्प यांच्या निकटवर्तीयाने दिली मोठी धमकी
18
मोबाईल दुकानदार होता टार्गेट, बळी गेला व्यापाऱ्याचा; कोल्हापुरात खंडणीसाठी बॅटरीचा शॉक देऊन हत्या
19
ट्रम्प यांना बाजूला सारले, युरोपीयन NATO देशांची वेगळी चूल; अमेरिकेला एकटे पाडायची तयारी
20
पुन्हा इराण युद्धासारखं संकट आलं तरी होणार नाही तेल-गॅसची टंचाई; सरकारचा 'मास्टर प्लॅन', सुरू केली मोठी तयारी
Daily Top 2Weekly Top 5

वरद पाटीलच्या हत्येमागे असणाऱ्या क्रूरकर्म्याला फाशी द्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 23, 2021 04:26 IST

उदगाव : निव्वळ अंधश्रद्धेच्या आहारी जाऊन निष्ठुर क्रूरकर्म्याने वरद पाटीलचा खून केला आहे. कागल तालुक्यातील सोनाळी गावात घडलेल्या घटनेबाबत ...

उदगाव : निव्वळ अंधश्रद्धेच्या आहारी जाऊन निष्ठुर क्रूरकर्म्याने वरद पाटीलचा खून केला आहे. कागल तालुक्यातील सोनाळी गावात घडलेल्या घटनेबाबत नागरिकांत घबराट निर्माण झाली आहे. स्वत:च्या अपत्य प्राप्तीसाठी सात वर्षीय बालकाचा नरबळी हे घृणास्पद कृत्य आहे.

त्यामुळे उदगाव (ता. शिरोळ) येथे ग्रामस्थांनी वरद पाटील या बालकाला येथील छत्रपती संभाजी महाराज चौकात मेणबत्या लावून श्रद्धांजली वाहिली व संशयिताला तात्काळ फाशीची शिक्षा द्यावी, अशी अपेक्षा व्यक्त केली.

यावेळी उपसरपंच रमेश मगदूम म्हणाले, सोनाळी (ता. कागल) येथे वरद पाटील या सात वर्षीय बालकाचा वैद्य याने अंधश्रद्धेच्या आहारी जाऊनच नरबळी दिला आहे. याची सखोल चौकशी व्हावी व फाशीची शिक्षा मिळावी. नराधम वैद्य याची केस कोणत्याही वकिलाने घेऊ नये, असा ठराव ग्रा.पं.मध्ये करण्यात येईल. सर्वच ग्रामपंचायतींनी असा ठराव करून निषेध व्यक्त करावा, असेही मगदूम यांनी सांगितले. यावेळी अमोल माने, लाजम मुजावर यांनी संशयित वैद्य याची सखोल चौकशी करावी व अशा घटना पुन्हा होऊ नयेत यासाठी त्याला फाशी द्यावी, अशी मागणी केली.

यावेळी नंदकुमार पुजारी, शांतीनाथ वठारे, अभिनंदन पाटील, अनिल चिवटे, अनिकेत रजपूत, प्रदीप मगदूम, सौरभ पुजारी, गणेश कोरे यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.

फोटो - २२०८२०२१-जेएवाय-०६

फोटो ओळ- उदगाव (ता. शिरोळ) येथे सोनाळी येथील वरद पाटील या बालकाला श्रद्धांजली वाहण्यात आली.