हमीदवाडा येथील एकाचा दगडाने ठेचून निघृण खून
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 17, 2018 13:56 IST2018-12-17T13:53:12+5:302018-12-17T13:56:48+5:30
गांधीनगर रेल्वे स्टेशनजवळ एकाचा दगडाने डोके ठेचून अमानुष खून झाल्याचे सोमवारी उघडकीस आले आहे. मृत व्यक्ती हमीदवाडा येथील असल्याचे निष्पन्न झाले असून गांधीनगर पोलिसांनी यासंदर्भात दोघांना ताब्यात घेतले आहे.
_201707279.jpg)
हमीदवाडा येथील एकाचा दगडाने ठेचून निघृण खून
कोल्हापूर : गांधीनगर रेल्वे स्टेशनजवळ एकाचा दगडाने डोके ठेचून अमानुष खून झाल्याचे सोमवारी उघडकीस आले आहे. मृत व्यक्ती हमीदवाडा येथील असल्याचे निष्पन्न झाले असून गांधीनगर पोलिसांनी यासंदर्भात दोघांना ताब्यात घेतले आहे.
गांधीनगर रेल्वे स्टेशनजवळ मध्यरात्रीच्या सुमारास एका व्यक्तीचा खून झाला. सोमवारी पहाटे हा प्रकार उघडकीस आला. मृत व्यक्ती हमीदवाडा येथील असून राजेंद्र कुरणे (वय ४०) असे त्याचे नाव आहे. किरकोळ कारणावरुन हा खून झाल्याचा संशय आहे. गांधीनगर पोलिस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.
सोमवारी सकाळी हा प्रकार उघडकीस आल्यानंतर गांधीनगर पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक सुशांत चव्हाण यांनी घटनास्थळाला भेट दिली. करवीरचे पोलिस उपअधिक्षक सूरज गुरव यांनीही घटनास्थळाला भेट दिली असून याप्रकरणी दोघांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.