शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
2
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
3
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
4
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
5
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
6
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
7
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
8
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
9
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी
10
भारतात द्वेषाचा वणवा पेटवण्याचं एक षड्‌यंत्र; ‘बदला’ घेण्याची घाई नको, ‘धडा’ शिकवला पाहिजे
11
नरेंद्र मोदी यावेळी बालाकोटच्याही पुढे जाणार?; पुढच्या दोन आठवड्यांत आणखी कठोर पावले
12
हम सब एक है! अतिरेकी व त्यांच्या सूत्रधारांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची मागणी
13
कृषी विकासासाठी ६५ बाजार समित्या; अद्याप राज्यातील ६८ तालुक्यांत समित्याच नाहीत
14
"आणखी किती वेळ सहन करणार..."; चिठ्ठी लिहून नवी मुंबईतील विकासकानं संपवलं आयुष्य
15
मेमध्ये जिल्हा समित्या, जूनमध्ये महामंडळे; भाजपाच्या वरिष्ठांचा कार्यकर्त्यांना शब्द
16
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
17
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
18
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

काँग्रेसच्या चुकीच्या धोरणांचे दुष्पपरिणाम भोगावे लागले, नितीन गडकरी यांची टीका 

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 4, 2024 12:00 IST

कृषी क्षेत्रात आमूलाग्र बदल घडविल्याचा दावा

हुपरी : स्वातंत्र्यानंतर देशाच्या सर्वांगीण विकासासाठी जी धोरणे तत्कालीन काँग्रेस राज्यकर्त्यांनी राबविली ती अत्यंत चुकीची होती. त्याचा दुष्परिणाम स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षातही संपूर्ण जनतेला भोगावा लागत आहे असे प्रतिपादन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केले. गेल्या १० वर्षांत कृषी क्षेत्रात आमुलाग्र बदल घडवून आणल्याचा दावाही त्यांनी केला.हातकणंगले लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार खासदार धैर्यशील माने यांच्या प्रचारार्थ हुपरी (ता. हातकणंगले) येथे आयोजित जाहीर सभेत ते बोलत होते. माजी आमदार सुरेश हाळवणकर अध्यक्षस्थानी होते.गडकरी म्हणाले, देशाच्या विकासासाठी काँग्रेसने ६० वर्षांत राबविलेली ध्येयधोरणे व आम्ही गेल्या १० वर्षांत राबविलेल्या ध्येयधोरणांची तुलना देशवासीयांनी करून देशाचे भविष्य कुणाच्या हातात सुरक्षित राहील, याचा विचार करण्याची गरज आहे. सांगली कोल्हापूर जिल्ह्यातील महापुराचे थैमान रोखण्यासाठी अनावश्यक पाणी दुष्काळी भागात वळविण्यासाठी वॉटर ग्रीड धोरण अंमलात आणण्याचा आमचा प्रयत्न सुरू आहे. तसेच जलसंवर्धन ही काळाची गरज असल्याने पाळणाऱ्या पाण्याला चालायला लावणे,चालणाऱ्या पाण्याला थांबायला लावणे व थांबणाऱ्या पाण्याला जिरविणे असा उपक्रम राबवून कृषी क्षेत्रात आमूलाग्र बदल घडवून आणला.

खासदार धैर्यशील माने म्हणाले, कोल्हापूर व सांगली जिल्ह्याला देशाच्या विकासाच्या प्रवाहात आणण्यासाठी महामार्गाची उभारणी करण्यासाठी ६२०० कोटी रुपयांचा निधी उपलब्ध झाला आहे. आमदार प्रकाश आवाडे, देशाचे भविष्य कुणाच्या हातात सुरक्षित आहे याची जाणीव प्रत्येक देशवासीयाला होण्याची गरज आहे.आमदार विनय कोरे म्हणाले, आपल्या देशाची सर्व क्षेत्रात होत असलेली प्रगती पाहवत नसणाऱ्या शत्रू राष्ट्रांच्या इशाऱ्यावर नाचणाऱ्या महाविकास आघाडीच्या नेत्यांनी देशाच्या प्रगतीत खोडा घालण्याचा उद्योग चालविला आहे.खासदार अनिल बोंडे, आमदार प्रकाश आवाडे, माजी आमदार सुरेश हाळवणकर, अशोक माने, जयदीप कवाडे, रुषभ जैन, सुभाष कागले, शिवाजी जाधव, अजित सुतार, मंगलराव माळगे, अमित गाट यांनीही मनोगत व्यक्त केले. माजी नगराध्यक्षा जयश्री गाट यांनी प्रास्ताविक केले. यावेळी महावीर गाट, राहुल आवाडे, जिल्हाप्रमुख रवींद्र माने, मुरलीधर जाधव, पुंडलिक जाधव, हिंदुराव शेळके, रजनीताई मगदूम, राजवर्धन नाईक निंबाळकर, अरुण इंगवले, अजितसिंह मोहिते, सुरज बेडगे, दिनकर ससे, दौलतराव पाटील, गजानन जाधव आदी उपस्थित होते.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरkolhapur-pcकोल्हापूरlok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४maharashtra lok sabha election 2024महाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल २०२४Nitin Gadkariनितीन गडकरीcongressकाँग्रेस