हनुमाननगरजवळ सुमारे साडेतीन लाखांचा गुटखा जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 10, 2020 06:15 PM2020-10-10T18:15:09+5:302020-10-10T18:16:19+5:30

crimenews, kolhapurnews, police निर्मिती कॉर्नर ते हॉकी स्टेडियम दरम्यान हनुमाननगरकडे जाणाऱ्या ओढ्यानजीक रस्त्यावर जुना राजवाडा पोलिसांनी एका मोटारीतून बेकायदेशीर विक्रीसाठी आणलेला गुटखा पकडला. पोलिसांनी गुटखा, सुगंधी सुपारी व तंबाखूसह मोटार असा सुमारे तीन लाख ६७ हजार ८५० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. या प्रकरणी विजय ठाकूरदास चंदवाणी (वय ४०, रा. १७३२/०४, मोहिते मळा, गांधीनगर) याला अटक केली.

Gutkha worth Rs 3.5 lakh seized near Hanuman Nagar | हनुमाननगरजवळ सुमारे साडेतीन लाखांचा गुटखा जप्त

हनुमाननगरजवळ सुमारे साडेतीन लाखांचा गुटखा जप्त

Next
ठळक मुद्देहनुमाननगरजवळ सुमारे साडेतीन लाखांचा गुटखा जप्त विक्रीसाठी कोल्हापुरात आणताना कारवाई : मोटारकारही जप्त; चालक अटकेत

कोल्हापूर : निर्मिती कॉर्नर ते हॉकी स्टेडियम दरम्यान हनुमाननगरकडे जाणाऱ्या ओढ्यानजीक रस्त्यावर जुना राजवाडा पोलिसांनी एका मोटारीतून बेकायदेशीर विक्रीसाठी आणलेला गुटखा पकडला. पोलिसांनी गुटखा, सुगंधी सुपारी व तंबाखूसह मोटार असा सुमारे तीन लाख ६७ हजार ८५० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. या प्रकरणी विजय ठाकूरदास चंदवाणी (वय ४०, रा. १७३२/०४, मोहिते मळा, गांधीनगर) याला अटक केली.

संपूर्ण महाराष्ट्रात गुटखाविक्रीस बंदी आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण देशात राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन कायदा लागू आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी बंदी आदेशही लागू केला आहे. अशा परिस्थितीत महाराष्ट्रात सुगंधी सुपारी, गुटख्याला बंदी आहे. तरीही एका मोटारीतून कोल्हापुरात विक्रीसाठी गुटख्याचा साठा येणार असल्याची माहिती पोलीस निरीक्षक प्रमोद जाधव यांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी सापळा रचला.

यावेळी संशयावरून एका मोटारकारची तपासणी केली. त्यावेळी त्याच्या मोटारीत गुटख्याचा साठा सापडला. पोलिसांनी मोटारीसह गुटखा, सुगंधी सुपारी असा सुमारे सुमारे तीन लाख ६७ हजार ८५० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. कारचालक विजय चंदवाणी यालाही अटक केली. पुढील तपास उपनिरीक्षक योगेश पाटील करीत आहेत.

Web Title: Gutkha worth Rs 3.5 lakh seized near Hanuman Nagar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.