अनिल कुराडे यांना 'गुरूगौरव' पुरस्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 7, 2020 13:19 IST2020-12-07T13:17:58+5:302020-12-07T13:19:53+5:30

Teacher, Kolhapurnews, Gadhinglaj, गडहिंग्लज येथे शिवराज विद्या संकुलाचे सचिव प्रा.अनिल कुराडे यांना शारदादेवी पाटील यांच्याहस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आला. यावेळी प्राचार्य एस.एम.कदम, बाळासाहेब पाटील, बीणादेवी कुराडे, पी. डी. पाटील आदी उपस्थित होते.

'Gurugaurav' award to Anil Kurade | अनिल कुराडे यांना 'गुरूगौरव' पुरस्कार

अनिल कुराडे यांना 'गुरूगौरव' पुरस्कार

ठळक मुद्देअनिल कुराडे यांना 'गुरूगौरव' पुरस्कार कडगावच्या 'कॅ.आबा पाटील फाऊंडेशन'तर्फे सन्मान

गडहिंग्लज :कडगाव (ता. गडहिंग्लज) येथील कॅप्टन आबा पाटील फाऊंडेशनतर्फे देण्यात येणाऱ्या राज्यस्तरीय गुरुगौरव शिक्षक पुरस्काराने येथील शिवराज विद्या संकुलाचे सचिव प्रा.अनिल कुराडे यांना सन्मानित करण्यात आले.

येथील शिवराज महाविद्यालयात हा कार्यक्रम झाला.फाउंडेशनच्या अध्यक्षा शारदादेवी पाटील यांच्याहस्ते सन्मानचिन्ह, मानपत्र, शाल व श्रीफळ देऊन प्रा. कुराडे यांचा गौरव झाला.प्रा. पी. डी. पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती. अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ.एस. एम. कदम होते.
पाटील म्हणाले,प्रा. कुराडे यांच्या शैक्षणिक कामगिरीचा फौंडेशनने उचित गौरव केला आहे.

कुराडे म्हणाले, कॅप्टन आबांच्या नावच्या पुरस्कारामुळे आपणांस नवी ऊर्जा मिळाली.
यावेळी डॉ. एस. डी. पाटील, बाळासाहेब सावंत,रमजान अत्तार, यांची भाषणे झाली.
कार्यक्रमास प्राचार्या बीणादेवी कुराडे, तानाजी चौगुले, सदानंद पाटील, संतोष शहापूरकर, विजय पाटील, विक्रम शिंदे, आझाद पटेल, आदींसह सर्व विभाग प्रमुख, शिक्षक व कर्मचारी उपस्थित होते.

फौंडेशनचे संस्थापक बाळासाहेब पाटील यांनी प्रास्ताविकात फाऊंडेशनच्या कार्याचा आढावा घेतला.संतोष पाटील यांनी स्वागत केले. प्रा.डॉ.रंगराव हेंडगे यांनी आभार मानले.

महिन्याचा पगार फाऊंडेशनला..!

प्रा. कुराडे यांनी कॅ.पाटील फाउंडेशनतर्फे राबविण्यात येणाऱ्या विविध लोकोपयोगी उपक्रमासाठी आपल्या एक महिन्याच्या पगाराचा धनादेश फाऊंडेशनचे संस्थापक बाळासाहेब पाटील यांच्याकडे व्यासपीठावरच सुपूर्द केला.






अ३३ंूँेील्ल३२ ं१ीं

Web Title: 'Gurugaurav' award to Anil Kurade

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.