Gunaratna Sadavarte: गुणरत्न सदावर्तेंना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 25, 2022 11:55 IST2022-04-25T11:55:13+5:302022-04-25T11:55:39+5:30

कोल्हापूर : मराठा समाज व मागासगर्वीय समाज यांच्यात जातीय तेढ निर्माण करणारे चिथावणीखोर वक्तव्य केल्याप्रकरणी कोल्हापूर पोलिसांनी अ‍ॅड. गुणरत्न ...

Gunaratna Sadavarten remanded in judicial custody for 14 days | Gunaratna Sadavarte: गुणरत्न सदावर्तेंना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी

Gunaratna Sadavarte: गुणरत्न सदावर्तेंना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी

कोल्हापूर : मराठा समाज व मागासगर्वीय समाज यांच्यात जातीय तेढ निर्माण करणारे चिथावणीखोर वक्तव्य केल्याप्रकरणी कोल्हापूर पोलिसांनी अ‍ॅड. गुणरत्न सदावर्तेंनी अटक केली आहे. सदावर्ते यांच्या पोलिस कोठडीची मुदत आज, सोमवारी संपली. आज, त्यांना कसबा बावडा येथील न्यायालयात हजर करण्यात आले. यावेळी न्यायालयाने सदावर्ते यांना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली.

दरम्यान, सदावर्ते यांच्या जामिनासाठी कोल्हापूर न्यायालयात अर्ज दाखल करण्यात आला आहे. तर सदावर्तेंचा ताबा घेण्यासाठी आता पुणे पोलीस कोल्हापुरात दाखल झाले आहेत.

सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षणाबाबत दिलेल्या निर्णयानंतर ॲड. गुणरत्न सदावर्ते यांनी मीडियाला मुलाखत दिली होती. या मुलाखतीत मराठा व मागासवर्गीय समाज यांच्यात जातीय तेढ निर्माण होईल असे चिथावणीखोर वक्तव्य केल्याने सकल मराठा मोर्चाचे समान्वयक दिलीप पाटील यांनी ॲड. सदावर्ते यांच्याविरोधात शाहूपुरी पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती.

Web Title: Gunaratna Sadavarten remanded in judicial custody for 14 days