शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
3
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
4
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
5
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
6
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
7
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
8
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
9
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
10
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
11
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
12
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
13
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
14
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
15
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
16
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
17
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
18
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
19
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
20
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
Daily Top 2Weekly Top 5

अजित पवार, अशोक चव्हाणांच्या बंडानंतर खोक्यांची भाषा बंद का?; गुलाबराव पाटील यांचे तडाखेबंद भाषण

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 17, 2024 12:07 IST

'..तेव्हा संजय राऊत नावाचं कार्टून जन्माला आलं नव्हतं'

कोल्हापूर : आम्ही सत्तेतून बाहेर पडलो आणि एकनाथ शिंदे यांच्यासोबत आलो. तेव्हा ५० खोके घेतल्याचा दिवसरात्र आराेप झाला. मग तुमच्यासोबत जे सत्तेत होते ते अजित पवार आणि अशोक चव्हाण भाजपसोबत आल्यावर खोक्यांची भाषा का बंद झाली? असा खडा सवाल विचारत राज्याचे पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी महाअधिवेशनात ‘हाय व्होल्टेज’ भाषण केले. पाटील यांच्या या तडाखेबंद भाषणावेळी प्रचंड टाळ्या, शिट्ट्यांनी उपस्थितांनी त्यांना प्रतिसाद दिला.पाटील म्हणाले, सर्व जाती-धर्मातील लोकांना सोबत घेऊन जाणारे बाळासाहेबांचे हिंदुत्व होते. मात्र, काहींनी त्यांच्याबद्दल अपप्रचार केला. बाळासाहेबांनी सर्वसामान्य लोकांना मोठं केलं आहे. बाळासाहेबांनी स्वतः कधीही पद घेतलं नाही. राम मंदिर व्हावं हे बाळासाहेबांचं स्वप्न होतं. ते स्वप्न नरेंद्र मोदींनी पूर्ण केलं आणि म्हणूनच एकनाथ शिंदेंनी त्यांची विचारधारा स्वीकारून उठाव केला. ज्या काँग्रेसला शिव्या देण्यात आमचं आयुष्य गेलं. ज्या काँग्रेसने आमची बरबादी केली, खुनाचे गुन्हे दाखल केले, बाळासाहेबांच्या खऱ्या वारसदारांनी त्याच काँग्रेससोबत 'आय लव्ह यू' केलं.

पिल्लूच्या सभेला ५०० माणसंआदित्य ठाकरे यांना टोला लगावताना पाटील म्हणाले, साहेबांचं पिल्लू काल जळगावला आले होते. त्यावेळी फक्त ५०० लोक होते. गर्दी तुमच्यामुळे होत नव्हती. आम्ही रक्ताचे पाणी करून ती जमवत होतो. आम्ही खेड्यातले वाघ तुमच्यासोबत होतो, म्हणून ती गर्दी होत होती.

हा सोट्या ४१ मतं घेणार आणि..१९९२ ची घटना घडली, त्यावेळी आम्ही तिघे भाऊ आणि आमचा बाप त्यावेळी जेलमध्ये होतो. तेव्हा संजय राऊत नावाचं कार्टून जन्माला आलं नव्हतं. आमची ४१ मते या सोट्यांनी घ्यायची आणि खासदार व्हायचं आणि रोज आमच्याच नावाने शिमगा करायचा. हिंमत असेल तर राजीनामा दे, अशा शब्दांत पाटील यांनी राऊत यांच्या हल्ला चढवला.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरPoliticsराजकारणGulabrao Patilगुलाबराव पाटीलAshok Chavanअशोक चव्हाण