शहरं
Join us  
Trending Stories
1
पटनायक सरकारची 'एक्सपायरी डेट' 4 जून; पहिल्याच रॅलीत संकटमोचकावरच PM मोदींचा हल्लाबोल
2
भारतीय संघाच्या ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेच्या जर्सीचं हटके लॉचिंग! Video Viral 
3
माढ्यात धैर्यशील मोहिते पाटलांची ताकद वाढली! भालके गटाचा पाठिंबा जाहीर; समीकरणे बदलणार?
4
झटणाऱ्या हातांना मदतीचा 'हात'! लहानग्याचा VIDEO पाहून आनंद महिंद्रांची मोठी घोषणा
5
"भाजपा खूप दिवसांपासून दिवास्वप्न पाहतेय..."; नवीन पटनायक यांचा पंतप्रधान मोदींवर पलटवार
6
Amit Shah : "दीदींनी 5 वर्षे प्रचार केला तरी..."; अमित शाह यांनी ममता बॅनर्जींना दिलं जाहीर आव्हान
7
बिहार: २७ वर्षीय महिलेने एकाच वेळी ५ मुलींना दिला जन्म; डॉक्टरही अवाक्, सर्वजण सुखरूप
8
Mumbai Indians च्या खांद्यावर आठ संघांचा भार! SRH विरुद्धच्या लढतीत सर्वांना हवेत MI चे उपकार
9
“भारताचे परराष्ट्र धोरण अपयशी ठरलेय, अनेक देशांशी संबंध बिघडलेत”; प्रकाश आंबेडकरांची टीका
10
मतदानाच्या आदल्या दिवशी बारामती मतदारसंघाबाबत सुप्रिया सुळेंची निवडणूक आयोगाकडे मोठी मागणी
11
Preity Zinta powerhouse of talent, Mumbai Indians: मुंबई इंडियन्सचा 'हा' खेळाडू म्हणजे 'टॅलेंटचं पॉवरहाऊस'; प्रिती झिंटाकडून क्रिकेटरचं तोंडभरून कौतुक
12
मोदींकडून सद्भावना, उद्धव ठाकरेंसोबत भाजपाची पुन्हा युती होणार? देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
13
BANW vs INDW: ३३ व्या वर्षी भारतीय संघात पदार्पण; खेळाडूंनी केला एकच जल्लोष, यजमानांची अस्तित्वाची लढाई
14
'राम मंदिराचा निर्णय बदलणार...'; आचार्य प्रमोद कृष्णम यांचा मोठा दावा, काँग्रेसनं शाहबानो प्रकरणाप्रमाणे प्लॅन आखला!
15
नरेश गोयल यांना २ महिन्यांचा जामीन, मुंबईबाहेर जाण्यासाठीही घ्यावी लागणार परवानगी
16
भाजपाला मोठा दिलासा, दिंडोरीमध्ये बंडखोर माजी खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांनी घेतली माघार
17
पाकिस्तानची फजिती! मोहम्मद आमिर आयर्लंड दौऱ्यावर वेळेत जाणार नाही, कारण...
18
"भाजपा आता लाठ्याकाठ्यांनी तोडफोड करायला उतरलीय, अत्यंत निंदनीय आणि लज्जास्पद"
19
LSG ने काल १३ खेळाडू खेळवले! KKR लाही कसे नाही समजले? वाचा नेमके असे काय घडले  
20
माता न तू वैरिणी; नवऱ्यासोबत भांडणाचा राग, चिमुकल्याला मगरींनी भरलेल्या नदीत फेकले...

लोकसहभागातून ‘संगणक शिक्षणाची गुढी’ : गडहिंग्लज नगरपालिकेचा उपक्रम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 20, 2018 12:19 AM

राम मगदूम।गडहिंग्लज : गोरगरीब मुलांनाही संगणक हाताळायला मिळावे, त्यांनाही संगणकाचे ज्ञान मिळावे यासाठी येथील नगरपालिकेने संगणक प्रयोगशाळा उभारली आहे. नगरपालिकेच्या सावित्रीबाई फुले विद्यालयातील या प्रयोगशाळेत पालिकेच्या अन्य शाळेतील विद्यार्थ्यांनाही संगणकाचे शिक्षण मोफत दिले जाणार आहे. लोकसहभागातील या उपक्रमाद्वारे गडहिंग्लज पालिकेने ‘संगणक शिक्षणाची गुढी’ उभी केली आहे.१९७८ मध्ये गडहिंग्लज नगरपालिका शिक्षण ...

राम मगदूम।गडहिंग्लज : गोरगरीब मुलांनाही संगणक हाताळायला मिळावे, त्यांनाही संगणकाचे ज्ञान मिळावे यासाठी येथील नगरपालिकेने संगणक प्रयोगशाळा उभारली आहे. नगरपालिकेच्या सावित्रीबाई फुले विद्यालयातील या प्रयोगशाळेत पालिकेच्या अन्य शाळेतील विद्यार्थ्यांनाही संगणकाचे शिक्षण मोफत दिले जाणार आहे. लोकसहभागातील या उपक्रमाद्वारे गडहिंग्लज पालिकेने ‘संगणक शिक्षणाची गुढी’ उभी केली आहे.

१९७८ मध्ये गडहिंग्लज नगरपालिका शिक्षण मंडळाची स्थापना झाली. त्यानंतर जिल्हा परिषदेच्या गडहिंग्लज शहरातील सर्व प्राथमिक शाळा पालिकेकडे हस्तांतरित झाल्या. सध्या एका उर्दू शाळेसह सहा शाळा पालिकेतर्फे चालविल्या जातात, तर सहा अनुदानित खासगी शाळांवर शिक्षण मंडळाचे नियंत्रण आहे.

दर्जेदार आणि गुणवत्तापूर्ण शिक्षणासाठी येथील पालिकेच्या शाळा सुरुवातीपासूनच प्रसिद्ध आहेत. नगरपालिकेच्या शाळेतील विद्यार्थ्यांना पाठ्य-पुस्तके, दप्तर, गणवेश, बूट, आदी साहित्य मोफत पुरविले जाते. तथापि, इंग्रजी माध्यमाच्या शाळा आणि खासगी शाळांच्या स्पर्धेमुळे पालिकेच्या काही शाळांमधील विद्यार्थी संख्या रोडावत आहे. त्यामुळेच शहरातील गरीब मुलांच्या शिक्षणाचा आधार असणाऱ्या या शाळा टिकाव्यात, बहराव्यात यासाठी नगरपालिका धडपडत आहे.

नगराध्यक्षा प्रा. स्वाती कोरी यांनी लोकसहभागातून पालिकेच्या सर्व शाळेत डिजिटल वर्गांची सोय आणि मराठी विज्ञान परिषदेच्या सहकार्याने गडहिंग्लज सायन्स सेंटर (विज्ञान प्रयोगशाळा) सुरू केली आहे. त्यापाठोपाठ संगणक प्रयोगशाळा सुरू करून त्यांनी पालिकेच्या शाळा सक्षम करण्याचे कृतिशील पाऊल पुढे टाकले आहे.माजी विद्यार्थिनीकडून मोफत धडेस्व. बंडोपंत तथा पिंटू बाळासाहेब मोरे यांच्या नावाने उभारण्यात आलेल्या सावित्रीबाई फुले विद्यालयाच्या संगणक कक्षात तब्बल १२ संगणक उपलब्ध आहेत. या शाळेसह नगरपालिकेच्या अन्य शाळांच्या विद्यार्थ्यांसाठीही संगणक प्रशिक्षणाचे खास वेळापत्रक तयार केले आहे. येत्या जूनपासून त्याची अंमलबजावणी होणार आहे. संगणकशास्त्राची पदवी प्राप्त माजी विद्यार्थिनी प्रीती शिवाजी पाटील यांनी विद्यार्थ्यांना मोफत शिकविण्याची जबाबदारी घेतली आहे. 

गुढीपाडव्यानिमित्त आमच्या शाळेतील पहिलीच्या वर्गात तब्बल २१ मुलांनी प्रवेश घेतला. यापूर्वी केवळ दोन-चार विद्यार्थीच प्रवेश घेत. मात्र, डिजिटल क्लासरूम व कॉम्प्युटर लॅबची सोय झाल्याने पहिलीच्या प्रवेशाला यावर्षी पालकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.- विठ्ठल देसाई, मुख्याध्यापक, सावित्रीबाई फुले विद्यालय, गडहिंग्लज.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरdigitalडिजिटलSchoolशाळा