गुडाळेश्वर पतसंस्थेला १ कोटी साडेबारा लाखांचा नफा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 5, 2021 04:21 IST2021-04-05T04:21:39+5:302021-04-05T04:21:39+5:30
पाटील पुढे म्हणाले की संस्थेकडे एकूण ठेवी ४८ कोटी १७ लाख असून संस्थेने २६ कोटी ७३ लाख गुंतवणूक केली ...

गुडाळेश्वर पतसंस्थेला १ कोटी साडेबारा लाखांचा नफा
पाटील पुढे म्हणाले की संस्थेकडे एकूण ठेवी ४८ कोटी १७ लाख असून संस्थेने २६ कोटी ७३ लाख गुंतवणूक केली आहे. संस्थेने २७ कोटी ९लाख कर्ज वाटप केले असून संस्थेचे २ कोटी ८८ लाख ३६ हजार भाग भांडवल व ५४ कोटी ८३ लाख ९३ हजार खेळते भांडवल आहे. संस्थेचा अहवाल सालात एकूण ७५ कोटी २५ लाख २९ हजार व्यवसाय झाला असून पुढील वर्षात शंभर कोटींचा टप्पा गाठण्याचे उद्दिष्ट आहे. संस्थेची ३१मार्च २०२१ अखेर २१९ कोटी १५ लाखांची उलाढाल झाली आहे. हा सर्व संस्थेचा कारभार संस्था चालक व कर्मचारी यांनी पारदर्शक व सभासदांचा विश्वास संपादन करून विकासाभिमुख केल्यामुळे संस्थेची दिवसेंदिवस प्रगतीच्या दिशेने घोडदौड सुरू आहे. संस्थेने सोने तारण ठेवून कॅश क्रेडिट व तारण कर्ज तसेच गृह कर्जावर ११ टक्के व इतर सर्व कर्जावर साडेतेरा टक्के व्याज आकारणी करण्याचा निर्णय घेतला आहे. संस्थेने RTGS,NEFT,SMS मोबाइल ॲप, वीज बिल भरण्याची सेवा सुरू केली, अशी माहिती अभिजित पाटील यांनी दिली.
यावेळी भोगावतीचे जेष्ठ संचालक व गुडाळेश्वर सहकारी समूहाचे संस्थापक ए.डी. पाटील, उपाध्यक्ष ईश्वरा पाटील, हिंदुराव पाटील, पांडुरंग जाधव, दत्तात्रय पाटील, दीपक चरापले, दत्तात्रय पोवार, डाॅ. ए.बी. माळवी, संस्था मॅनेजर डी.जी. पाटील, विठ्ठल पाटील आदी उपस्थित होते. आभार संचालक अनंत तेली यांनी मानले.