पालकमंत्र्यांनी बगलबच्यांच्या माध्यमातून उत्तर देणे बंद करावे : सुनील कदम : टाकीचे काम इतके वर्षे का रेंगाळले याचे उत्तर द्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 2, 2021 04:19 IST2021-01-02T04:19:45+5:302021-01-02T04:19:45+5:30
कोल्हापूर : ज्यांना बाजार समितीमध्ये मुदतवाढ मिळाली नाही तेथून हाकलून दिले, अशा मोहन सालपे यांच्यासारख्या बगलबच्च्यांच्या माध्यमातून उत्तरे न ...

पालकमंत्र्यांनी बगलबच्यांच्या माध्यमातून उत्तर देणे बंद करावे : सुनील कदम : टाकीचे काम इतके वर्षे का रेंगाळले याचे उत्तर द्या
कोल्हापूर : ज्यांना बाजार समितीमध्ये मुदतवाढ मिळाली नाही तेथून हाकलून दिले, अशा मोहन सालपे यांच्यासारख्या बगलबच्च्यांच्या माध्यमातून उत्तरे न देता कसबा बावड्यातील पाण्याच्या टाकीचे काम चौदा वर्षे का रखडले, हीच तुमची कार्यतत्परता का, अशी विचारणा माजी महापौर सुनील कदम यांनी गुरुवारी येथे केली.
ते म्हणाले, स्वत:च्या दीडशे कोटींच्या हॉटेलचे काम दीड वर्षांत झाले परंतु जनतेच्या पाण्याच्या टाकीचे काम होण्यास इतकी वर्षे का लागली, त्याचे उत्तर पालकमंत्र्यांनी अगोदर द्यावे. ‘विरोधात जाणाऱ्यांचा मी कार्यक्रम करतो,’ ही पालकमंत्र्यांची भाषा मंत्र्यांना शोभणारी नाही. महापालिकेची निवडणूक डोळ्यांसमोर ठेवून आरोप करणाऱ्या पालकमंत्र्यांनी याच महापालिकेवर महाडिक यांची १८ वर्षे सत्ता होती हे विसरू नये. स्वीकृत नगरसेवक असलेल्या मोहन सालपे यांनी महापालिका सभागृहात कधी तोंड उघडले नाही, ज्यांना बाजार समितीचे सचिव म्हणून मुदतवाढ मिळाली नाही, अशा बगलबच्यांना त्यांनी आरोप करण्यासाठी पुढे करू नये.
यावेळी भगवान काटे, नगरसेवक सत्यजित कदम उपस्थित होते.
-