शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेच्या एका जागेसाठी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये ४ नावांवर चर्चा, विक्रम काकडे यांचं नाव आघाडीवर
2
'चंद्रकांता' फेम भरत कपूर यांचं निधन, वयाच्या ८६ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास; अभिनयाचा चार दशकांचा प्रवास थांबला
3
"न कळत सारं घडलं..." लाजिरवाण्या पराभवानंतर अक्षर पटेल झाला 'कावरा बावरा', म्हणे...
4
वेगळ्या घोषणेची गरज नाही, भारत आधीपासूनच हिंदूराष्ट्र - सरसंघचालक मोहन भागवत
5
Bhuvneshwar Kumar : स्विंगचा किंग भुवीची पॉवरप्लेमध्ये कमाल! एकाच डावात दोन खास विक्रमांना गवसणी
6
मुंबई सीएसएमटीवरून सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा घसरला, सुदैवाने सर्व प्रवासी सुरक्षित!
7
चंद्रपुरातील किडनी विक्री प्रकरणात रविंद्रपाल सिंग यांना जामीन नाहीच, हायकोर्टाचा निर्णय; सखोल तपासासाठी अर्ज फेटाळला
8
एमआयडीसीतील फॅक्टरींमध्ये अनेक कामगारांचे पोलिस व्हेरिफिकेशनच नाही; ना कागदपत्र, ना कुणाची नोंद
9
Virat Kohli New Record : किंग कोहलीचा 'विराट' पराक्रम! IPL मध्ये ९००० धावांसह रचला नवा विक्रम
10
२६ कामगारांचा बळी घेणाऱ्या एसबीएल कंपनीतील पाच पदाधिकाऱ्यांना दणका; उच्च न्यायालयाचा अटकपूर्व जामिनास नकार
11
यवतमाळ जिल्हा बँकेचे मुदतवाढ मिळालेले संचालक मंडळ अखेर बरखास्त; उपनिबंधकांकडे कारभार, संचालक मंडळाच्या मनसुब्यावर पाणी 
12
विदर्भातील सहा शहरांमध्ये ‘सन’ताप कायम, आणखी २४ तास उष्णतेची लाट; मात्र अर्धे जिल्हे अवकाळीच्या सावटात
13
DC vs RCB : हिशोब चुकता! दिल्ली कॅपिटल्सच्या घरच्या मैदानात रॉयल चॅलेंजर्सनं ३९ चेंडूत संपवली मॅच
14
Top Marathi News Live: मुंबई सीएसएमटीवरुन सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा पुणे स्थानकात घसरला
15
"५१ अंशांच्या उन्हातही काही होणार नाही, माझ्या गाडीत AC चालत नाही"; ज्योतिरादित्य शिंदेंनी सांगितला उष्णतेच्या लाटेपासून बचावाचा देशी उपाय!
16
महाराज आला रे! मोठ्या धक्क्यातून सावरण्यासाठी Mumbai Indians नं खेळली 'ही' चाल
17
१ मे पासून LPG गॅसचे नियम बदलणार? सिलिंडर हवा असेल तर 'DAC' कोड द्यावा लागणार; पाहा नवे बदल
18
DC vs RCB: ८ धावांत ६ विकेट्स! भुवी-हेजलवूडमध्ये विकेट घेण्याची स्पर्धा; दिल्लीकरांसाठी भयावह स्वप्न
19
भसाभस वाढतंय वीज बिल... एसी सोबत पंखा किती फायदेशीर? फक्त AC च्या 'या' आकड्याकडे लक्ष द्या; सरकारनं दिला खास 'मंत्र'
20
वॉशिंग मशीन लावून झाल्यानंतर ४० मिनिटांनी अंघोळ करायचे लक्षात ठेवा...; नाहीतर ठरू शकते जीवघेणे!
Daily Top 2Weekly Top 5

महास्वच्छता मोहिमेची शतकाकडे वाटचाल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 07:09 IST

कोल्हापूर : महापालिकेच्या दर रविवारी होणाऱ्या स्वच्छता मोहिमेची शतकाकडे वाटचाल सुरू आहे. ९२ व्या रविवारी झालेल्या महास्वच्छता अभियानामध्ये एक ...

कोल्हापूर : महापालिकेच्या दर रविवारी होणाऱ्या स्वच्छता मोहिमेची शतकाकडे वाटचाल सुरू आहे. ९२ व्या रविवारी झालेल्या महास्वच्छता अभियानामध्ये एक टन कचरा व प्लास्टिक गोळा करण्यात आला. महापालिका प्रशासक डॉ. कादंबरी बलकवडे यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या मोहिमेत सामाजिक संघटनांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला.

डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी यांनी महापालिकेत आयुक्त म्हणून रुजू झाल्यानंतर पहिल्या रविवारपासून शहरात स्वच्छता मोहीम सुरू केली. या मोहिमेचे सर्वच क्षेत्रांतून कौतुक झाले. विशेष म्हणजे सामाजिक संघटना, संस्था यांनी सहभाग नोंदविला. डॉ. कलशेट्टी यांच्या बदलीनंतर प्रशासक डॉ. कादंबरी बलकवडे यांनी ही मोहीम सुरू ठेवली आहे. रविवारी झालेली स्वच्छता मोहीम ९२ वी ठरली. यावेळी स्वरा फौंडेशनचे अध्यक्ष प्रमोद माजगांवकर, वृक्षप्रेमी संस्था यांच्यासह मुख्य आरोग्य निरीक्षक जयवंत पवार, विभागीय आरोग्य निरीक्षक राहुल राजगोळकर, स्वरा फाउंडेशनचे प्राजक्ता माजगावकर, डॉ. अविनाश शिंदे, आयुष शिंदे, विश्वजित पाटील, सनमेश कांबळे, अमृता वास्कर, आदी उपस्थित होते.

चौकट

स्वच्छता केलेला परिसर

डी मार्ट ते फुलेवाडी मेनरोड, कळंबा फिल्टर हाऊस ते कळंबा जेल रोड, क्रीडा संकुल ते पद्मावती मंदिर रोड, रिलायन्स मॉल मागील बाजू संपूर्ण, पंचगंगा घाट संपूर्ण परिसर, शेंडापार्क ते सायबर चौक, कावळा नाका ते शिरोली नाका, महावीर कॉलेज ते डीएसपी चौक परिसर

महापालिकेची यंत्रणा

तीन जेसीबी, सहा डंपर, दोन आरसी गाड्या, तीन औषध फवारणी यंत्र, १३० महापालिकेचे कर्मचारी.

फाेटो : ३१०१२०२१ कोल केएमसी स्वच्छता न्यूज १

ओळी : कोल्हापूर महापालिकेच्यावतीने रविवारी शहरात स्वच्छता मोहीम राबविली. यावेळी सामाजिक संघटनांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला.