सेवानिवृत्ती दिवशी मिळणार ग्रॅच्युईटी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 06:59 IST2021-02-05T06:59:13+5:302021-02-05T06:59:13+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क यड्राव : देशभक्त रत्नाप्पाण्णा कुंभार पंचगंगा सहकारी साखर कारखान्याने कामगारांच्या सेवानिवृत्ती दिवशीच त्यांना ग्रॅच्युईटी देण्याचा निर्णय ...

सेवानिवृत्ती दिवशी मिळणार ग्रॅच्युईटी
लोकमत न्यूज नेटवर्क
यड्राव : देशभक्त रत्नाप्पाण्णा कुंभार पंचगंगा सहकारी साखर कारखान्याने कामगारांच्या सेवानिवृत्ती दिवशीच त्यांना ग्रॅच्युईटी देण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे कामगारांमधून आनंद व्यक्त होत आहे. कारखाना व्यवस्थापनाने घेतलेल्या या निर्णयाबद्दल कामगार संघटनेकडून पदाधिकाऱ्यांचा सत्कार करण्यात आला.
देशभक्त रत्नाप्पाण्णा कुंभार पंचगंगा सहकारी साखर कारखाना लि., गंगानगर इचलकरंजी लिज युनिट रेणुका शुगर व्यवस्थापन व कारखाना संचालक मंडळामध्ये झालेल्या चर्चेमध्ये कारखान्याचा सेवक ज्यादिवशी सेवानिवृत्त होईल, त्याचदिवशी ग्रॅज्युईटी रकमेचा धनादेश त्याच्या हातात देण्याचा निर्णय घेण्यात आला. पंचगंगा साखर कारखान्याचे अध्यक्ष पी. एम. पाटील, रेणुका शुगरचे जनरल मॅनेजर प्रकाश सावंत, सिनियर अॅडमिन मॅनेजर संजय किल्लेदार व कारखान्याचे कार्यकारी संचालक नंदकुमार भोरे यांनी या निर्णयात महत्त्वाची भूमिका बजावल्याने या सर्व पदाधिकारी व मान्यवरांचा सत्कार पंचगंगा सहकारी साखर कामगार संघटनेकडून करण्यात आला.
संघटनेचे अध्यक्ष आझाद शेख यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. यावेळी उपाध्यक्ष बापूसाहेब उपाध्ये, सचिव दीपक साखरे, खजिनदार जालिंदर पाटील, पापालाल मुल्लाणी, शांतीनाथ पाटील, श्रीशैल व्हसमणी, जगन्नाथ भुई व कामगार उपस्थित होते. सूत्रसंचालन प्रकाश कांबळे यांनी केले तर बापूसाहेब उपाध्ये यांनी आभार मानले.
फोटो - ०३०२२०२१-जेएवाय-०५
फोटो ओळी - गंगानगर येथे कारखान्याचे अध्यक्ष पी. एम. पाटील, रेणुका शुगर्सचे प्रकाश सावंत, संजय किल्लेदार, नंदकुमार भोरे यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी आझाद शेख यांच्यासह संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते.