शहरं
Join us  
Trending Stories
1
ब्रेकिंग! मुंबई, ठाणे आणि नवी मुंबईचा गॅस पुरवठा खंडित; पाईपलाईनचे मोठे नुकसान, घरगुती गॅस बंद, CNG स्टेशनवर तुटवडा
2
दिल्ली ब्लास्ट : रोहतकची डॉक्टर प्रियंका शर्मा अनंतनागमधून ताब्यात, कुटुंबीयांनी काय सांगितंल?
3
भारत-पाकिस्तान हायव्होल्टेज मॅच! वैभव सुर्यवंशीचा संघ ढेपाळला; एका मागोमाग एक १० विकेट, झालेत इतकेच रन्स...
4
मोठी बातमी! लाल किल्ला स्फोटाची जबाबदारी टीआरएफने स्वीकारली; 'पहलगाम' हल्ल्याशी जोडले स्फोटाचे धागेदोरे
5
दिल्ली ब्लास्ट प्रकरणात NIA ची मोठी कारवाई, उमरच्या जवळच्या सहकाऱ्याला अटक; याच्याच नावावर होती i-20 कार
6
'विशेष मतदार यादी सुधारणा' प्रक्रियेच्या कामाच्या ताणामुळे बीएलओ अधिकाऱ्याने आयुष्य संपविले; कर्मचारी वर्गात संताप
7
नितीश कुमार उद्या राजीनामा देणार! 'मिशन कॅबिनेट'ची तयारी पूर्ण; मुख्यमंत्री कोणाचा होणार यावर मात्र...
8
तेजस्वी यांनी पराभवासाठी बहीण रोहिणीला ठरवलं जबाबदार; फेकली होती चप्पल? अशी आहे संपूर्ण इनसाइड स्टोरी!
9
पाकिस्तानच्या गोळीबार गमावला पाय; आता 'गौरी'ला मिळाले नवीन आयुष्य
10
दिल्ली ब्लास्टचे बांग्लादेश कनेक्शन उघड; मुर्शिदाबाद मार्गे भारतात आणली स्फोटके
11
युरोपने केलेली 'ही' मोठी चूक अमेरिकेला ३० वर्षांत गरीब करेल; जे पी मॉर्गनचा इशारा
12
तेजस्वी यादवांच्या अन्य तिन्ही बहिणींनी पाटणाचे घर सोडले; मोठ्या बहिणीनंतर...
13
मी दिलेला '२५ जागांचा शाप' खरा ठरला!; तेजस्वी यादवांनी तिकीट नाकारले तेव्हा रडणाऱ्या नेत्याचा दावा 
14
तेजप्रताप यादवांचा राज्यातील NDA सरकारला पाठिंबा; रोहिणी आचार्य यांना मोठी जबाबदारी देणार
15
रशिया आणि युक्रेनमध्ये मोठा करार होणार, राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्कींनी केली घोषणा; म्हणाले...
16
“जो जीता वही सिकंदर, पण सिकंदर बनायचे राज समजू शकले नाही”; बिहार निकालावर उद्धव ठाकरे बोलले
17
"सुन लो जयचंदों...! माझ्या वडिलांनी एक इशारा दिला तर...!", रोहिणी आचार्य वादावरून तेजप्रताप भडकले
18
राहुल गांधींमुळे काँग्रेसच्या तरुण खासदारांचे भविष्य धोक्यात; PM मोदींचा घणाघात...
19
लालूप्रसाद यादवांना निकामी किडनी दिली; तेजस्वी यादव अन् बहीण रोहिणी आचार्य यांच्यात तू तू मै मै, चप्पलफेक...
20
ICC WTC Points Table : टीम इंडियापेक्षा लंका भारी! दक्षिण आफ्रिकेची दुसऱ्या स्थानावर झेप
Daily Top 2Weekly Top 5

अलमट्टीप्रश्नी १० जुलैला सांगलीत पाटबंधारे कार्यालयावर भव्य मोर्चा, शेतकरी मोठ्या संख्येने सहभागी होणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 28, 2025 11:42 IST

..तर आम्ही पुरात गटांगळ्या खाऊ

कोल्हापूर : कर्नाटकातील आलमट्टी धरण उंची विरोधात सरकारची भूमिका संशयास्पद वाटत आहे. म्हणूनच, १० जुलै रोजी सकाळी ११ वाजता सांगली पाटबंधारे कार्यालयावर भव्य मोर्चा काढण्यात येईल, अशी माहिती विधान परिषदेतील काॅंग्रेसचे गटनेते आमदार सतेज पाटील यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत दिली.आलमट्टीप्रश्नी शासकीय विश्रामगृहात प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक झाली. त्यानंतर ते बोलत होते. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष माजी खासदार राजू शेट्टी, आमदार अरुण लाड, व्ही. बी. पाटील, विजय देवणे यांची प्रमुख उपस्थिती होती.आमदार पाटील म्हणाले, आलमट्टी उंची विरोधासाठी मे महिन्यात सर्व पक्षीय कृती समितीतर्फे रस्ता रोको केले. त्यानंतर राज्य सरकारने बैठक घेतली. राजकारण करण्यासाठी शासनाने आम्हाला मुंबईच्या बैठकीस निमंत्रण दिले नाही, म्हणून महाविकास आघाडीने सरकारला पत्र पाठवून आलमट्टी उंचीविरोधासाठी शासन काय करणार आहे, अशी विचारणा केली. त्यानंतरही सरकार काहीही केलेले नाही. या प्रश्नात सरकार गंभीर नाही.आता पाऊस सुरू आहे. पुराचा धोका आहे. हिप्परगी, आलमट्टी धरणावर अधिकाऱ्यांची नियुक्ती केल्याचे सांगितले जाते. पण, अधिकाऱ्यांकडून अहवाल संघर्ष समितीला मिळत नाही. वडनेर समितीचा अहवाल स्वीकारला की नाही ?, उंची वाढ विरोधासाठी शासन सर्वाेच्च न्यायालयात गेले आहे की नाही ?, या प्रश्नांची उत्तरे मिळत नाहीत. म्हणून, पाटबंधारे कार्यालयावर १० रोजी मोर्चा काढण्यात येणार आहे.शेट्टी म्हणाले, कोल्हापूर, सांगली जिल्ह्यांतील पूर येऊ नये, म्हणून हिप्परगी, आलमट्टी धरणांतील पाण्याचा विसर्ग गतीने झाला पाहिजे. याकडे शासनाने गांभीर्याने पाहिलेले नाही. शासनाला जागे करण्यासाठी रस्त्यावरची लढाई तीव्र करावी लागेल. विधानसभा अधिवेशनातही याकडे लक्ष वेधावे लागेल. यासाठी १० जुलै रोजीच्या मोर्चात शेतकऱ्यांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे.दरम्यान, आलमट्टी प्रश्नीच्या बैठकीत आमदार लाड, माजी आमदार उल्हास पाटील, कृष्णा महापूर नियंत्रण सर्जेराव पाटील, इरिगेशन फेडरेशनचे अध्यक्ष विक्रांत पाटील यांची भाषणे झाली.

..तर आम्ही पुरात गटांगळ्या खाऊपूर नियंत्रणासाठी जागतिक बँकेकडून पहिल्या टप्प्यात कर्ज मिळाले आहे. यातून कोल्हापूर, सांगली, इचलकरंजीतील गटारर्सची कामे करण्यात येणार आहे. गटर्स बांधण्यास विरोध नाही. पण, गटर्सचे बांधकाम करून पूर नियंत्रण होणार नाही. आम्ही पुरात गटागंळ्याच खाऊ, असेही शेट्टी यांनी स्पष्ट केले.