शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

सकल मराठा समाजाचा एल्गार सुरूच बेमुदत ठिय्या आंदोलन : धनंजय महाडिक, मिणचेकरांसह विविध संघटनांचा पाठिंबा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 29, 2018 00:59 IST

मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी सकल मराठा क्रांती ठोक मोर्चातर्फे दसरा चौकात सुरू असलेल्या बेमुदत ठिय्या आंदोलनाचा एल्गार शनिवारी पाचव्या दिवशीही सुरू राहिला. यावेळी खासदार धनंजय महाडिक, आमदार डॉ. सुजित मिणचेकर, माजी आमदार संजय घाटगे यांच्यासह

कोल्हापूर : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी सकल मराठा क्रांती ठोक मोर्चातर्फे दसरा चौकात सुरू असलेल्या बेमुदत ठिय्या आंदोलनाचा एल्गार शनिवारी पाचव्या दिवशीही सुरू राहिला. यावेळी खासदार धनंजय महाडिक, आमदार डॉ. सुजित मिणचेकर, माजी आमदार संजय घाटगे यांच्यासह विविध संघटनांनी आंदोलनस्थळी भेट देऊन पाठिंबा दिला.

जिल्ह्याच्या विविध भागांतून रॅलीद्वारे मराठा बांधवांसह विविध संघटनांचे कार्यकर्ते घोषणा देत आंदोलनस्थळी येऊन पाठिंबा देत होते. ‘एक मराठा...लाख मराठा...’ अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला. दिवसभरात आंदोलनस्थळी खासदार धनंजय महाडिक यांनी ताराराणी आघाडीच्या नगरसेवकांसमवेत भेट देऊन पाठिंबा दिला. याचबरोबर आमदार डॉ. सुजित मिणचेकर, माजी आमदार संजय घाटगे, माजी जिल्हा परिषद सदस्य महेश चव्हाण, एस. आर. पाटील, देवानंद कांबळे, शिरोलीचे सरपंच शशिकांत खवरे यांच्यासह चिखली ग्रामस्थ, दैवज्ञ समाज, कोल्हापूर मंडप डेकोरेटर्स असोसिएशन, आश्रय अपंग व सामाजिक बहुउद्देशीय संस्था (सादळे), सर्व जातिधर्म वधूवर सूचक संस्था, कोल्हापूर जिल्हा मोटार ड्रायव्हिंग स्कूल, कोल्हापूर जिल्हा व्यापारी व उद्योजक महासंघ, महाराष्टÑ रिक्षाचालक सेना, शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान, खाटीक समाज, राजर्षी शाहू लघु उद्योजक असोसिएशनने पाठिंबा दिला.

आंदोलनात इंद्रजित सावंत, दिलीप देसाई, सचिन तोडकर, शाहीर दिलीप सावंत, वसंतराव मुळीक, फत्तेसिंह सावंत, अ‍ॅड. गुलाबराव घोरपडे, प्रा. जयंत पाटील, राजू लिंग्रस, हर्षल सुर्वे, प्रसाद जाधव, जयदीप शेळके, किशोर घाटगे, संदीप पाटील, उमेश पोवार, उदय लाड, स्वप्निल पार्टे, जयकुमार शिंदे, आदी सहभागी झाले होते.कोल्हापूर जिल्हा स्वातंत्र्यसैनिक संघटनेचा पाठिंबाआंदोलनाला कोल्हापूर जिल्हा स्वातंत्र्यसैनिक संघटनेसह सर्वाेदय मंडळ, जिल्हा खादी व ग्रामोद्योग संघाच्या बैठकीत पाठिंबा जाहीर करण्यात आला. यावेळी अध्यक्ष सुंदर देसाई, प्राचार्य व्ही. डी. माने, भीमराव पवार, प्रा. डी. डी. चौगले, प्रा. आशा कुकडे, सविता देसाई, पी. के. पाटील, आदी उपस्थित होते.निपाणीच्या मराठा समाजाचा पाठिंबानिपाणी (जि. बेळगाव) येथील सकल मराठा समाजातर्फे कोल्हापुरात मराठा आरक्षणासाठी सुरू असलेल्या बेमुदत ठिय्या आंदोलनाच्या समर्थनार्थ निपाणी बंद करून भव्य मोर्चा काढण्यात आला. त्यानंतर दसरा चौकातील आंदोलनस्थळी येऊन सकल मराठा समाजकल्याण संस्थेचे अध्यक्ष रवींद्र शिंदे यांनी मराठा समाजाच्या वतीने पाठिंब्याचे पत्र दिले.महिलांची रॅली आजमराठा आरक्षणासाठी सुरू असलेल्या बेमुदत ठिय्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी मराठा समाजातील महिलांच्या वतीने आज, रविवारी शहरातून मोटारसायकल रॅली काढण्यात येणार आहे. सकाळी ११ वाजता दसरा चौकातून या रॅलीला सुरुवात होणार आहे.संभाजीराजे आज आंदोलनस्थळीसंसदेत भूमिका मांडल्यानंतर खासदार संभाजीराजे आज, रविवारी कोल्हापुरात येत असून सकाळी ११ वाजता ते आंदोलस्थळी भेट देणार आहेत.

टॅग्स :Sharad Pawarशरद पवारkolhapurकोल्हापूरmarathaमराठा