टायर फुटल्याने धान्याचा ट्रक उलटला, उत्तूर - हालेवाडी मार्गावर अपघात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 30, 2020 18:09 IST2020-05-30T18:06:36+5:302020-05-30T18:09:13+5:30
कोल्हापूर येथून आजऱ्याकडे शासकीय धान्य घेऊन जाणारा ट्रक उत्तूर-हालेवाडी फाट्यावर टायर फुटल्याने उलटला. सुदैवाने जीवितहानी झाली नाही. ट्रकचालकाला गंभीर दुखापत झाली आहे.

कोल्हापूर येथून आजऱ्याकडे शासकीय धान्य घेऊन जाणारा ट्रक उत्तूर-हालेवाडी फाट्यावर टायर फुटल्याने उलटला. (छाया : रवींद्र येसादे)
उत्तूर/कोल्हापूर : कोल्हापूर येथून आजऱ्याकडे शासकीय धान्य घेऊन जाणारा ट्रक उत्तूर-हालेवाडी फाट्यावर टायर फुटल्याने उलटला. सुदैवाने जीवितहानी झाली नाही. ट्रकचालकाला गंभीर दुखापत झाली आहे.
कोल्हापूरहून शासकीय धान्य घेउन चालक जितेश कवाडे (वय : ४० रा.कळंबा.ता.करवीर) हा एम.एच. ०९ एल.९२७३ हा ट्रक घेऊन आजऱ्याकडे जात असताना पाठीमागील चाकाचे दोन्ही टायर फुटल्याने उत्तूर-हालेवडी मार्गावर उलटला.
दरम्यान, दुसरा ट्रक मागवण्यात आला. नंतर त्यात रस्त्यावर पसरलेले धान्य भरण्यात आले. ट्रकचालकावर उत्तूरच्या प्राथमिक आरोग्य केंद्रात प्राथमिक उपचार करून नंतर उपजिल्हा रुग्णालय, गडहिंग्लज येथे दाखल करण्यात आले आहे. त्याला या अपघातात गंभीर दुखापत झाली आहे.