शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

शक्तिपीठाबाबत सरकारच्या वल्गनाच, महामार्ग अशक्यच; राजू शेट्टी यांची भूमिका

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 7, 2025 18:58 IST

सरकारने फेरविचार करावा - सतेज पाटील 

कोल्हापूर : शक्तिपीठ महामार्ग जाणाऱ्या बारा जिल्ह्यांत बैठका घेतल्या आहेत, शेतकऱ्यांचा तीव्र विरोध असून सरकारने कितीही वल्गना केल्या तरी महामार्ग होणे अशक्यच असल्याची माहिती स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी दिली. शक्तिपीठाबाबत सरकारने फेरविचार करावा, असे काँग्रेसचे विधानपरिषदेतील गटनेते आमदार सतेज पाटील यांनी सांगितले.समृध्दी महामार्ग शेवटच्या टप्याच्या लोकार्पण सोहळ्यावेळी समृध्दी महामार्गाचे काम लवकरच करू, असे सुतोवाच सरकारच्या वतीने करण्यात आले. याबाबत, राजू शेट्टी यांना विचारले असता, ते म्हणाले, शेतकऱ्यांना सरकारची मखलाशी समजल्याने ते सर्व्हे करण्यासही विरोध करत आहेत. ड्रोनव्दारे सर्व्हे केले तर ड्रोन पाडण्याचा इशारा शेतकरी देत असल्याने मोजणी यंत्रणा ठप्प आहे. सुरुवातीला देवाधर्माचे नाव केले आता सरकार विकासाची भाषा करत आहे. हे आता शेतकऱ्यांच्या लक्षात आले आहे.सरकारने फेरविचार करावा - पाटील आमदार सतेज पाटील म्हणाले, शक्तिपीठ महामार्गालाकोल्हापूरसह सर्वच जिल्ह्यांतील शेतकऱ्यांचा विरोध आहे. लोकभावनेचा आदर करुन सरकारने फेरविचार करावा. तेच पैसे ग्रामीण भागातील रस्त्यासाठी खर्च केले तर अधिक चांगले होईल. शासनाला आम्ही पर्यायी मार्ग सुचवले आहेत. त्याचा विचार करून शक्तिपीठचा अट्टाहास सोडावा. आमच्या माहितीनुसार कामे पूर्ण करुनही ८० हजार कोटी रुपयांची बिले थकीत आहेत. संबंधितांना हे पैसे दिले तर इतर कामांना गती येईल. शक्तिपीठऐवजी आम्ही पर्यायी रस्ते सुचवले आहेत, त्याचा विचार केला तर शेतकऱ्यांच्या दृष्टीने चांगले होईल.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरShaktipeeth Mahamargशक्तिपीठ महामार्गRaju Shettyराजू शेट्टीSatej Gyanadeo Patilसतेज ज्ञानदेव पाटीलGovernmentसरकारMahayutiमहायुती