शहरं
Join us  
Trending Stories
1
रशिया, चीनची जर क्षेपणास्त्रे आली तर अमेरिका बचाव करू शकणार नाही; पेंटागनची धक्कादायक कबुली 
2
सोनम रघुवंशी जामिनावर सुटली, पण मेघालयातच अडकली; शिलॉन्ग न्यायालयाचा मोठा निर्णय
3
Top Marathi News LIVE Updates: वरूड-मोर्शी महामार्गावर भीषण अपघात, एकाच कुटुंबातील ३ जण ठार, एक जखमी
4
"हिंदू असल्याचे सांगताच त्याने हात पकडला अन्..."; मीरा रोड हल्ल्याचा धक्कादायक घटनाक्रम समोर
5
मनू भाकरला विचारला वैभव सूर्यवंशीबद्दलचा 'तो' प्रश्न; सोशल मीडियावर संतापले चाहते, काय घडलं?
6
इच्छा तिथे मार्ग! वडील गमावल्याचं दु:ख, बारावीत नापास; मेहनतीने भाजी विकणारा झाला IAS
7
“इथे व्यवसाय करायचा असेल तर मराठी येणे आवश्यकच”; मंत्री प्रताप सरनाईकांनी स्पष्टच सांगितले
8
Facebook Instagram Rules : तुमच्या मृत्यूनंतर फेसबुक-इंस्टाग्राम कोण चालवणार? मेटाचा नवा नियम; 'डिजिटल मृत्युपत्र' लिहिता येणार
9
सहा वर्षांनी...! भारत-चीन हवाई कनेक्टिव्हिटी पुन्हा सुरू! इंडिगोचे विमान ग्वांगझूमध्ये उतरले; एअर चायनाचीही दिल्ली-बीजिंग सेवा सुरू
10
पेट्रोल-डिझेल गाड्या इतिहासजमा होणार; नितीन गडकरींचा वाहन उत्पादकांना इशारा...
11
IPL 2026: अजब गजब आरोप! वैभव सूर्यवंशीच्या बॅटबद्दल बोलताना PAK एक्सपर्टने तोडले अकलेचे तारे
12
कोकणवासींना गुड न्यूज! १ मेपासून विशेष ट्रेन, वीकेंडला स्पेशल ३६ सेवा; कधीपर्यंत सुरू असेल?
13
रितेश देशमुखच्या 'राजा शिवाजी'ची क्रेझ! प्रदर्शनाआधीच हजारो तिकिटांची विक्री; वाचा रिपोर्ट
14
कंपन्या AI साठी कर्मचाऱ्यांना काढतायत नंतर पस्तावतायत! पगारापेक्षा जास्तच होतोय खर्च, काय म्हणतायत कंपन्यांचे सीईओ... 
15
तिसऱ्यांदा बोनस शेअर देणार 'ही' बँक; पाहा किती Shares मिळणार? डिविडंडचीही घोषणा
16
‘शिवाजी कोण होता?’ वाचनावरून तणाव; पोलिसांनी आंदोलन चिरडल्याचा आरोप
17
रविंद्र जडेजाची बहीण काँग्रेसच्या तिकीटावर लढली, हरली! गुजरातमध्ये १० महानगरपालिकांवर भाजपचा ताबा
18
“अरविंद केजरीवाल कार्यालयात महात्मा गांधींची प्रतिमा का लावत नाहीत”; काँग्रेसचा थेट सवाल
19
Harsha Richhariya : "एकही आरोप सिद्ध झाला तर सर्व संपत्ती..."; हर्षा रिछारियाचं सडेतोड उत्तर, दिलं थेट आव्हान
20
"माझी मुलं श्रेयस अय्यरला हाक मारताना..."; प्रिती झिंटाने IPLच्या 'सरपंच'बद्दल केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

सुसंगत म्हणणे शासनाने सादर करावे

By admin | Updated: August 27, 2015 23:57 IST

ए. बी. पाटील : सुधारित किमान वेतनप्रश्नी आंदोलनाचा इशारा

इचलकरंजी : तब्बल २९ वर्षांनी २९ जानेवारी २०१५ ला लागू करण्यात आलेल्या यंत्रमाग उद्योगातील कामगार सुधारित किमान वेतनाच्या सुसंगत म्हणणे शासनाने उच्च न्यायालयात सादर करावे अन्यथा शासनाची दमछाक होईल, असे बळकट व दणकट आंदोलन पुढील टप्प्यात करण्यात येईल, असा इशारा कामगार नेते ए. बी. पाटील यांनी दिला.उच्च न्यायालयात किमान वेतनाच्या सुनावणीमध्ये चार तारखा होऊनही शासनाने आपले म्हणणे मांडले नाही. याचा जाब विचारण्यासाठी तसेच ताबडतोब म्हणणे मांडावे यासाठी गुरुवारी येथील सायझिंग-वार्पिंग कामगार संघटनेच्यावतीने प्रांत कार्यालयावर सहकुटुंब मोर्चा काढण्यात आला. प्रांत कार्यालयात प्रांताधिकारी अश्विनी जिरंगे या उपस्थित नसल्याने संघटनेच्यावतीने प्रथम त्यांचा जाहीर निषेध करण्यात आला. २९ वर्षांनंतर किमान वेतनात सुधारणा झाली असली तरी महाराष्ट्र शासन याप्रश्नी वेळकाढूपणा करीत आहे, असा आरोपही निवेदनात करण्यात आला आहे. मोर्चाचे नेतृत्व कृष्णात कुलकर्णी, आनंदराव चव्हाण, मारुती जाधव, चंद्रकला मगदूम, आदींनी केले. (वार्ताहर)किमान वेतन घोटाळ्याच्या चौकशीची मागणीगेल्या २९ वर्षांपासून प्रलंबित असलेल्या किमान वेतनाची पुनर्रचना झाली. किमान वेतनाच्या कायद्यामध्ये दर पाच वर्षांनी सुधारणा करावी, असा अधिनियम असताना तो मोडण्यात आला आहे. त्यामुळे हा किमान वेतन घोटाळा झाल्याचे जाहीर करून याची सखोल चौकशी करावी आणि हा घोटाळा करणाऱ्या मंत्री, सचिव, आयुक्त, तसेच शासकीय अधिकारी यांच्यावर कारवाई करावी. तसेच कामगारांच्या झालेल्या पिळवणुकीचा फरकसुद्धा मिळावा, अशी मागणीही करण्यात आली.